ओढ तुझी लागली भाग 60
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
मीनलच्या पाठवण्याची वेळ झाली. आरती तिच्या सोबत होती. मीनल काकूं जवळ खूप रडत होती.
" काकू आपल्या जवळ राहणार आहेत मीनल. इतका त्रास करून घेवू नकोस. चल आता."
बाकीच्यांना भेटून आरती तिला रूम मधे घेवून आली. "दादा लक्ष दे हिच्या कडे." तिने मीनलला पाणी दिलं.
ते लगेच घरी यायला निघाले.
ते लगेच घरी यायला निघाले.
आरतीने पुढे जावून स्वागताची तयारी केली. राहुल मीनलला ओवाळल. माप ओलांडून दोघ आत आले. ते सोफ्यावर बसले होते. आरती बाकीचे आवरत होते . वीर घरच्यांसोबत हॉल मधून घरी गेला होता. तो उद्या पूजेला येणार होता. आज मीनल आरती सोबत होती.
हॉल मध्ये सगळे बसले होते. राहुल मीनलचा अंगठी शोधायचा खेळ झाला. त्यात मीनल जिंकली.
" वहिनी तू आपली लाज राखली. आज तू हरली असती तर काही खर नव्हत." वरुण बोलला.
सगळे मीनलच्या बाजूने होते. आरती राहुल दादाला सपोर्ट करत होती. " आम्ही उगीच मीनलला जिंकू दिल. खर तर आमच चालणार आहे या पुढे. हो ना मीनल वहिनी ."
मीनल लाजली.
लगेच दोघांची हळद उतरवली. त्या दोघां सोबत सगळे खूप पाणी पाणी खेळले.
जेवण झाल आरती, मीनल एका खोलीत होत्या. मीनलने साडी बदलून ड्रेस घातला होता. तिने तिच्या आईला नुकताच फोन केला. त्या दोघी झोपणार तेवढ्यात दार वाजल. राहुल वरुण आले होते.
आरतीला माहिती होत हा प्रकार. वीर असा त्रास देत होता नवीन लग्न झालं होत तेव्हा. एन्जॉय करू द्या यांना. ती हसत होती. राहुलला बघून मीनल लाजून अर्धी झाली होती.
"वहिनी आम्ही तुला भेटायला नाही आलो. आरती ठीक आहे का ते बघायला आलो आहोत." वरुण बोलला.
आरती हसत होती. राहुल मीनल जवळ बसला.
"चल वरुण थोड खालून पाणी पिऊन येवू." आरती वरुण खाली निघून गेले.
राहुलने मीनलला मिठीत घेतल. दोघ बराच वेळ बोलत बसले होते.
"झाल का तुमच मला झोप येते आहे. मी आत येते. " आरती केव्हाची बाहेर उभी होती. " तुम्ही दोघ टेरेस वर जा ना."
"नाही नको मी झोपते. उद्या पूजा आहे लवकर उठाव लागेल." मीनल बोलली.
राहुल जड पावलांनी त्याच्या रूम मधे गेला. दोघी झोपल्या. सकाळी लवकर पूजेची तयारी झाली. आरतीने मीनलला छान तयार केल. वीर लवकर आला होता. दुपारच जेवण झाल की आरती त्याच्या सोबत घरी जाणार होती.
खुप छान पूजा झाली. जोडी छान दिसत होती. जेवायचा बेत छान होता. जेवण झाल. आरती तीच सामान भरत होती.
"आरती तू थांब ना." मीनल आग्रह करत होती.
सगळे वीर कडे बघत होते.
"नाही मी आता आरतीला घरी घेवून जाणार. झाल ना तुमच लग्न. एकमेकांसोबत रहा आता. माझ्या बायकोला द्या." वीर बोलला. आरती लाजली होती. बाकी सगळे खूप हसत होते. आजी सुद्धा हसत होत्या.
"आम्ही कोणा सोबत राहू?" वरुण, राकेश, प्रकाश विचारात होते.
"तुम्ही बॉइज एकमेकां सोबत वेळ घालवा. "
" आरती तू नाही तर करमणार नाही मला . "मीनलने तिला मिठी मारली.
" तू दादा सोबत रहाशील. बघ आमची आठवण ही येणार नाही. "
आज मीनल ही घरी जाणार होती. उद्या सरला ताई तिला घ्यायला जाणार होत्या. मग ती राहुल सोबत लगेच फिरायला जाणार होती.
वीर आरती निघाले. रस्त्यात आरती खूप बोलत होती.
" आरती आपण फिरायला जावू. आधी आजीला मामा कडे सोडू. तिथे एक दिवस राहू. नंतर मग जवळ हिल स्टेशन आहे. तिथे आपली खूप मोठी जागा आहे. तिथे राहू छान."
हो चालेल. दोघ खुश होते. काय काय करू या ते ठरवत होते
" घरचे सगळे येतील का?"
"नाही आपण दोघच जावू. मला तुझ्या सोबत रहायच आहे. आरती तिकडे साडी नेसशील का? "
" हो ते मुव्ही सारख करायच का? डोंगरावर गाणे गात फिरायच. पदर हवेत उडतो तो सीन. "
" आहेच तू तेवढी सुंदर. एखाद्या हेरॉईन सारखी."
दोघ बोलत बोलत घरी आले.
" आता खाली बोलत बसू नकोस लगेच वर ये. "
" वीर काहीही. एवढ काय? मी फक्त तीन चार दिवस माहेरी गेली होती. तू अति करतोस. "
हॉल मध्ये शनाया आणि आजी बसल्या होत्या. आरती तिच्या जवळ बसली.
"खूप धावपळ झाली ना लग्नात? "
" हो पण खूप छान झाल लग्न."
"वहिनी तू राहुल दादा, मीनल साठी किती छान पोस्ट लिहिली आहेस गर्ल्स ग्रुप वर. किती छान लिहितेस तू. "
" हो का बघू. " वीर वाचत होता." हे तू लिहिल आरती?"
" हो वहिनी खूप छान लिहिते."
"नाही तिला इंट्रेस्ट नाही. "
" नाही दादा ती लिहिते. तिने मला सांगितल."
आरती घाबरली. काय झालं हे. ओह माय गॉड. काय करू.
शनायाचा फोन आला. ती आत निघून गेली. आरती गप्प उभी होती. वीर तिच्या कडे बघत होता. "तुझा फोन दे इकडे आरती."
तिने फोन दिला. नोट पॅड मध्ये खूप लिहिल होत. अतिशय सुंदर लेख होते. वीरने ओळखल हे लिखाण.
" वीर मला बोलायच आहे तुझ्याशी."
त्याने हाताने थांब सांगितल. त्याने बघितल दोन सीम कार्ड होते. दुसरा नंबर वरून स्वतः च्या मोबाईल वर फोन केला. अनुश्री नाव येत होत. त्याला धक्का बसला. तो आरती कडे बघत होता.
"वीर एक मिनिट मी काय म्हणते आहे."
त्याने तिच्या कडे बघितल नाही. तो वरती निघून गेला. आरती तिथे किती वेळ उभी होती. तिने किचन मधे जावुन पाणी पील. मग ती रूम मधे आली.
वीर टीव्ही बघत होता.
" वीर मी काय म्हणते."
त्याने लक्ष दिल नाही.
"सॉरी ना वीर. मी तुला सांगणार होते. प्लीज बोल तुला राग आला आहे मला माहिती आहे. माझ्या वर राग काढ. मी तुला सांगणार होते. "
वीर उठून निघून गेला. आरती रडत होती. काय होवुन बसल हे. मी स्वतः सांगण्याआधी त्याला समजल. चुकीच झाल. किती प्रेम करतो तो माझ्या वर. विश्वासाने त्याने तो सागर आहे हे मला सांगितल आणि मी काय केल. काय करू आता. कस नीट करू.
दिवसभर तो घरी आला नाही. आरतीने दोन तीन फोन केले. काही उपयोग झाला नाही.
रात्री जेवताना वीर राहुल सरां सोबत कामाच बोलत होता. तो लवकर रूम मध्ये आला नाही. आरती वाट बघत होती. खूप दमली होती ती. तिथे सोफ्यावर झोप लागून गेली.
रात्री तिने बघितल वीर काॅटवर झोपला होता. त्याने मला तिकडे नेल नाही की अंगावर पांघरुन दिल नाही. ती त्याच्या जवळ जावून झोपली. थोड्या आवाजाने वीर उठला तो तिकडे तोंड फिरवुन झोपला. तिला जवळ घेतल नाही.
आरतीने त्याला मिठी मारायचा प्रयत्न केला. त्याने हात झटकला. "वीर प्लीज बोल ना. हे बघ माझी चूक झाली." ती रडत होती. तिला नंतर झोप लागली नाही. नुसती बसुन होती ती.
वीर सकाळी लवकर ऑफिसला निघून गेला. चहा ही घेतला नाही. आरती आवरून थोड्या वेळाने बाहेर आली.
"वीर कुठे आहे?" आजी विचारत होत्या.
"ते गेले ऑफिसला मीटिंग होती. " थोड्या वेळाने ती निघाली.
" वीर सॉरी. मला माहिती आहे हा तुझ्या साठी मोठा धक्का आहे. मी मुद्दामून नाही केल. यात माझा काहीही हेतू नव्हता. मी सांगणार होते तुला. पण त्या आधी तुला वेगळया पद्धतीने समजल. प्लीज बोल माझ्याशी. तुला वाटल तर ओरड. मी काही म्हणणार नाही. मी त्याच पात्रतेची आहे. चुकीच केल मी. जेव्हा तू सांगितल तू सागर आहे तेव्हा एक गम्मत म्हणून मी तुला सांगितल नाही माझ्या बद्दल. आता वाटल होत सांगाव. मी नीट वेळ बघून सांगणार होते. त्या आधी अस झाल. मी हा अबोला सहन नाही करू शकत. प्लीज उत्तर दे. " तिने मेसेज केला. तिच्या डोळ्यात पाणी होत.
ऑफिस मधे आल्यावर ती बघत होती वीर कुठे आहे. किती वेळ झाला तरी त्याने बघितल नव्हता मेसेज . मला ब्लॉक केल की काय? काय होवुन बसल हे.
नीता आली बाकीचे आले. " भावाच्या लग्नाची मिठाई कुठे आहे मॅडम? तोंड काय अस केल? लग्नाला गेली होतीस की कुठे लढाईला."
आरती काही म्हटली नाही. ती फक्त फोन कडे बघत होती. वीर प्लीज रीप्लाय कर.
"काय झालं आरती. मला सांगण्यासारख आहे का?"
काही नाही ...आरती गप्प होती.
"भांडण झाल?"
ती हो म्हटली.
"लग्नात का ? नातेवाईक असतात असे. चांगला कार्यक्रम खराब करतात. " नीता चिडून बोलत होती.
" नाही लग्न छान पार पडल. माझा दादा वहिनी फिरायला जाणार आहेत आज."
"मग कोणाशी. वीर?"
आरती हो म्हटली.
"कठिण आहात तुम्ही. "
"माझी चूक आहे नीता. काय करू मी."
"तू सॉरी बोलली का?"
हो.
मग?
" तो ऐकत नाही. काय करू. "
"मला माहिती नाही काय झाल. तू केबिन मधे जावुन भेट. प्रेमाने बोल. ऑफिस मधे जास्त बोलणार नाही ते सर तुला. "
" नको भीती वाटते. "
ट्रेनिंग सुरू झाल. लंच ब्रेक मध्ये वीरचा काहीच मेसेज आला नाही. आरतीचा मेसेज त्याने बघितल नव्हता.
सरला ताई, सतीश राव दुपारी मीनलला घ्यायला गेले. तिकडे जेवण झाल. गप्पा झाल्या." आम्ही निघतो आता."
ते मीनलला घेवून घरी आले.
ते मीनलला घेवून घरी आले.
मीनल राहुलने बॅग पॅक केल्या. वरुण तिला त्रास देत होता. "वहिनी आम्ही पण येतो ना. प्लीज हो म्हण. दादाला सांग. आम्ही काही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. आमच आमच फिरू."
प्रकाश ही हो म्हटला. मीनल खूप हसत होती.
" नको रे वरुण तिला त्रास देवू. जा इथून ." सरला ताईंनी तिची बाजू घेतली. ते थोड्या वेळाने फिरायला निघाले.
पाच वाजता आरती घरी जात होती. हर्षल समोरून आला ." वीर आहे केबिन मधे. "
आरती नुसती हो बोलली. ती घरी निघून आली.
शनाया तिची वाट बघत होती. "वहिनी सॉरी मी काल गडबड केली का?"
"नाही शनू ठीक आहे. मी सांगायला हव होत वीरला की मी लिहिते."
"दादा काय म्हटला? ओरडला का?"
" नाही काहीच नाही म्हटला. उलट ओरडला असता तर बर वाटल असत. "
आता?
" माहिती नाही काय होईल. "
" सॉरी वहिनी. "
" ठीक आहे शनु. "
आरती रूम मधे बसलेली होती. मीनल आणि दादाचा फोन आला. खूप खुश होते ते. दोघ फिरायला निघाले होते. "तुम्ही दोघ चला आमच्या सोबत."
"नाही नको तुम्ही जावून या. एन्जॉय करा. " आरती त्या दोघां साठी खुश होती.
"आम्ही काही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही मॅडम. " मीनल मुद्दाम चिडवत होती. तिला माहिती होत आरती, वीर खूप प्रेमात आहेत.
"मीनल नको उगीच का आम्ही सोबत. कबाब मे हड्डी. तुम्ही एन्जॉय करा. "
राहुल दादा ही बोलत होता." चल मी बोलतो वीर सोबत. "
" नको तुम्ही छान फिरून या. पुढच्या वेळी येवू आम्ही. एन्जॉय करा फोटो पाठवा." त्यांनी फोन ठेवला.
काल पासुन वीरने मला जवळ घेतल नाही की थोड ही बोलला नाही. काय करू.
दार वाजल वीर आत आला. आरती उठून त्याला भेटली. ती रडत होती. वीर सॉरी. बोल ना माझ्याशी.
त्याने तिला बाजूला केल. तो आवरायला आत निघून गेला.
जेवण झाल. ते दोघ एका रूम मधे होते पण अबोला होता.
"जावू दे घेवू दे त्याला वेळ. वाईट वाटल असेल त्याला."
आरतीने आता त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला नाही.
आरतीने आता त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला नाही.
तीन चार दिवस असे गेले.
आज ऑनलाईन मीट होती. सगळे जॉईन झाले होते. वीर पण जॉईन झाला . तो बघत होता आरती येते का. ती जॉईन झाली नव्हती.
"अनु कुठे आहे?" सगळे विचारात होते. ती का आली नाही? कोणी तरी बोलवा तिला . अनुला मेसेज करा.
एका मुलीने मेसेज केला. आरती आत बसलेली होती.
"काय झाल आज तू जॉईन नाही झाली."
"नाही मी ग्रुप सोडते आहे."
"काय झाल? "
अनुने तिला मेसेज केला. फोन बंद केला.
नको ते लिखाण. माझा काॅन्फीडन्स गेला आहे. काही नको मला आता. वीर नीट व्हायला हवा.
ती मुलगी ग्रुप वर आली." शाॅकींग न्यूज आहे अनुने लिखाण सोडल. या पुढे ती काहीच लिहिणार नाही. ती ग्रुप ही सोडणार आहे. या पुढे ती ऑनलाईन मीट साठी येणार नाही. "
काय झालं? सगळे विचारात होते.
"नक्की तिला कोणी तरी काही बोलल असेल? "
" काय झाल असेल? घरचे ओरडले असतिल का?"
"काय लोक असतात. का त्रास देतात तिला. इतक सुंदर लिहिते ती. अस लिखाण नको सोडायला. "
" काय झाल असेल नेमक काय माहिती. कोणी तरी उद्या तिला फोन करा."
"कोणी तरी मनवा तिला. असे चांगले लेखक निघून जातात. "
" माझा तर मूड गेला. अनु नाही तर काय अर्थ आहे या ऑनलाईन मीटला. "
खुप मेसेज येत होते. आरती ऑफ लाइन होती. काहीही करा आता लिहायच नाही. दोन चार दिवसांनी वीर सोबत बोलून बघू. तो बोलला तर ठीक नाही तर काय करायचं ते ठरवाव लागेल. आई कडे जावसं वाटत पण आता दादाच लग्न झाल. ते लोक खूप आनंदात आहेत. कस जाणार तिकडे. काय करू मी. काही सुचत नाही. बायकांना स्वतःच घर नसत हेच बरोबर आहे. ती रडत होती. तिने चेंजिंग रूम मधे झोपून घेतल.
मेसेज वाचून वीर शॉक झाला होता. आरती सॉरी खूप त्रास करून घेते आहे ती. माझ खूप प्रेम आहे तिच्यावर.
तो आत आला. त्याने लाइट ऑन केला. आरती उठून बसली. तो तिच्या जवळ येवून बसला. तिचे डोळे पुसले. तिने एकदम त्याला मिठी मारली. दोघ काही बोलत नव्हते. दोघ रडत होते. दोघांनी एकदम सॉरी बोलल.
"चल तिकडे झोप माझ्याजवळ."
आरती पुढे कॉटवर वीर जवळ झोपली. तो तिच्या केसातून हात फिरवत होता. दोन दिवसात किती चेहरा उतरला हिचा. आरतीला आता बर वाटत होत. दोघ गप्प होते.
"सॉरी आरती. आपण एकमेकांवर चीडायच नाही."
"माझ्या मुळे झाल हे वीर. मी तुझी माफी मागते. वीर मी चुकले. "
" तुझा विश्वास आहे ना माझ्या वर आरती?"
"हो खूप विश्वास आहे. मी तुझ्या सोबत कंफर्टेबल आहे. अगदी काहीही मी तुला मागू शकते. सांगू शकते. फक्त ही चूक झाली. या पुढे अस होणार नाही. आता माझ्या कडे लपवण्या सारख काही नाही. "
" आरती तू लिखाण बंद करू नकोस. तू खूप हुशार आहेस छान लिहितेस. प्लीज तुझा निर्णय मागे घे."
" आता मला तुझ्या सोबत रहायच वीर. बाकी काही नको. गैरसमज होतात. मला भीती वाटते तुझ्या पासून दूर जायची. मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत . आता मी काहीही करणार नाही. फक्त तू म्हणशील ते ऐकेल."
"हो ना मग मी सांगतो माझ्या साठी लिही. "
" आता मला फक्त तुझ्या जवळ झोपू दे." वीरने तिला मिठीत घेतल. आरती शांत झोपली होती.
