ओढ तुझी लागली भाग 61 अंतिम
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
सकाळी आरती वीर फिरून आले. "आटोप वीर सोबत जायच ना ऑफिसला?"
"हो . आरती इकडे ये. हे घे." त्याने तिला चॉकलेट दिले. आरती खुश होती. "अरे वाह थँक्स."
"थॅंक्स नको प्रॉमीस कर तू लिखाण सोडणार नाही."
"तुला काही प्रोब्लेम नाही ना?"
" नाही अजिबात नाही. मला स्वतःला तुझे लेख विचार खूप आवडतात."
" तू माझ्याशी बोलत का नव्हता? "
" मला वेळ हवा होता. धक्का बसला होता. तुला दुखवण्या पेक्षा शांत होतो मी. "
" चुकल माझ. "
" ठीक आहे. एवढा मोठा गुन्हा नाही झाला. विसरुन जा. "
दोघ खाली आले. दोघांना प्रेमाने बोलताना बघून शनायाला बरं वाटलं. यापुढे कोणाच्या मध्ये करायचं नाही.
ऑफिसमध्ये पण आरती खूप खुश होती.
" मिटलं का भांडण." नीताने तिच्या कडे बघत विचारल.
" हो बाई. "
" बर झालं तू अशी गप्प रहात होती मला आवडत नव्हत. "
" सर आले ट्रेनिंग सुरू झाल."
यापुढे कोणापासून कुठलीच गोष्ट मी लपवून ठेवणार नाही. थोडक्यात झालं. वीर चांगलं आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही. आरती विचार करत होती.
दुपारी लंच टाइम नंतर सगळे बोलत बसले होते. सुरेश सर अजून आलेले नव्हते. वीर ट्रेनिंग हॉल मध्ये आला. सगळे उठून उभे राहिले. "बसा. आरती एक मिनिट."
बाकीचे बघत होते. आरती उठून बाजूला गेली.
मुल कुजबुज करत होते हे ओळखतात का एकमेकांना. नीता काही म्हटली नाही.
"आपल्याला मामा कडे जायच तर तू सुट्टीच विचार."
"नाही वीर आता लग्ना साठी सुट्टी घेतली होती. मला ओरडतील ते सर."
"दोन दिवस घे सुट्टी. रविवारी आपण वापस येवू."
ते दोघ बोलत असतांना सुरेश सर आले. "सर एक मिनिट ते मला वीर सोबत बाहेर जायच आहे सुट्टी हवी होती."
ते सर ही हसत होते. "ठीक आहे जा पण अस नेहमी चालणार नाही. हो नंतर आल्यावर थोडा वेळ जास्त थांबून ट्रेनिंग कम्प्लीट करायच. नाहीतर सही मिळणार नाही."
हो.
ते सर आत गेले. वीर आरती दोघ खुश होते. मी जाते.
बाकीचे मुल विचारत होते." काय काम होत तू ओळखते का त्या सरांना?"
"हो ते माझे मिस्टर आहेत. "
" काय ओह माय गॉड. " सगळ्यांना समजल आरती वीरची बायको आहे.
दुसर्या दिवशी ते मामाच्या गावाला जायला निघाले. आजी सोबत होत्या. नंदिनी मॅडमनी खूप सामान दिलं होतं. वीर कार मध्ये बॅग ठेवत होता.
आजी कार मधे मागे बसल्या. तिथुन ते फिरायला जाणार होते म्हणून बाकीच्या कोणाला सोबत घेतल नव्हतं. रस्त्यात खूप मजा येत होती. विर खूप बोलत होता. जोक करत होता आजी आरती हसत होत्या.
" आजी आता तू कधी येशील? "
"येईल लवकर."
"मला करमणार नाही."
"माहिती आहे मला तुझ्या साठी लवकर येईल मी बेटा."
रस्त्यात त्यांनी थांबून एका ठिकाणी चहा घेतला. तीन तासात ते मामाच्या घरी पोहोचले. मामा मामींनी पुढे येऊन स्वागत केलं. त्यांना खूपच आनंद झाला होता. छान जेवण तयार होतं. हात पाय धुऊन लगेच त्यांनी जेवण केलं.
हॉलमध्ये सगळे बोलत बसले होते. आजी त्यांच्या रूम मध्ये आराम करायला निघून गेल्या. आरतीने फिरून पूर्ण घर बघितलं. त्यांच पण घर खूप मोठ होतं. ती मामी गप्पा मारत बसल्या. संध्याकाळी ते मंदिरात गेले तिथून आल्यावर त्यांनी छान स्वयंपाक केला होता. आरती होती मदतीला.
वीर आरती आवरत होते.
"यावेळी अगदी एक दिवस राहिले तुम्ही पुढच्यावेळी असं चालणार नाही. " मामा बोलले.
"हो पुढच्या वेळी एक आठवड्याच्या सुट्टीवर येवू."
आरती आणि वीर फिरायला निघाले. दोघ खूप खुश होते कार थोडी पुढे गेल्यानंतर आरती अजून वीरच्या जवळ सरकून बसली. दोघं खूप खुश होते. दोन तासाने ते हिल स्टेशन वर पोहोचले. त्यांच्या प्रॉपर्टीत पाहिले फोन करून सांगितल होत. खूप सुंदर बंगला होता .
"तुम्ही कधी घेतला आहे हा बंगला?"
" ह्या जागेत बाबांनी पूर्वीच इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आहे. आरती आपल्याला पण आई-बाबांसारखंच करायचं आहे खूप मेहनत घ्यायची आहे."
"हो वीर नक्की."
दोघांनी आत मध्ये सामान ठेवलं. बाहेर अतिशय अल्हाददायक वातावरण होतं ."चल फिरून यायचं का की आराम करते ."
दोघं हातात हात घालून फिरायला निघाले. जागोजागी छोटे छोटे स्टॉल होते. तिथे बरेच लोक फिरायला आलेले होते." मस्त सूप पिते का? "
हो.
दोघांनी स्वीट कॉर्न सूप घेतलं.
"राहुल मीनल आले का घरी?"
"हो आले ते. आपल्याला पण म्हणत होते तुम्ही पण चला फिरायला."
" नको त्यांच्यासोबत मोकळं वाटलं नसतं."
हो ना.
थोडं फिरून दोघं वापस आले. रात्री छान गरम गरम जेवण होतं. जेवण करून दोघेजण वरती बेडरूम मध्ये आले. वीर टीव्ही बघत होता. आरती मोबाईल मध्ये मेसेज बघत होती. दोघी घरी तिने थोडसं बोलून घेतलं.
वीर पुरे आता टीव्ही बघणं चल झोप ना. वीर च्या चेहर्यावर हसू आलं. त्याने लाइट बंद केला. आरतीला जवळ घेतल.
दुसऱ्या दिवशी सकाळी वीर आरतीला उठवत होता.
"मी अजिबात उठणार नाही खूप थंडी आहे."
"याच थंडीत फिरायला जायची मजा आहे उठ लवकर. आपण येताना छान चहा पिऊ."
दोघं फिरायला निघाले. अतिशय शांत वातावरण होतं. धुक पडलेलं होतं. छान लांब पर्यंत ते चक्कर मारून आले. येतांना आरतीचे पाय दुखत होते. रस्ता सरळ नव्हता चढउतार होता. त्यांनी छान गरम चहा घेतला.
काका विचारत होते." नाश्त्याला काय करू? इडली करू का? "
" चालेल आवडते आम्हाला दोघांना."
आज ते आजूबाजूचा परिसर फिरायला गेले होते. खूप मजा आली. खूप सुंदर होते ते हिल स्टेशन सगळीकडे निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेली होती. सुंदर नानाविध प्रकारची दुर्मिळ फुल वनस्पती आजूबाजूला होती. हे बघू का ते बघू असं होत होतं. एक एक स्पॉट सुंदर होता. आज त्यांनी बाहेर जेवण घेतलं. संध्याकाळी सुंदर बगीच्यात ते आरामात बसले होते. अतिशय प्रसन्न वाटत होतं. मुलं आजूबाजूला खेळत होते. गार्डनमध्ये कारंजे होते. सात-साडेसातला ते वापस रूमवर आले खूप दमले होते जेवण करून झोपले.
दुसऱ्या दिवशी त्यांनी आरामात आवरल. वीरने संध्याकाळी आरती साठी छान सरप्राईज ठेवला होत. त्यासाठी त्याने हॉटेलमध्ये टेबल बुक केलं होतं. आरती सुंदर लाल साडी घालून तयार होती. त्याच्यावर स्लीवलेस ब्लाउज कानातले केस सेट केलेले होते दोघेजण हॉटेलमध्ये पोहचले.
"काही विशेष एनिवर्सरी वगैरे." मॅनेजर विचारत होता.
"नाही आम्ही आमच्या हनिमून साठी आलेलो आहोत." अतिशय सुंदर केक समोर होता. आरती आणि वीरने मिळून केक कापला
"हा केक कशासाठी?"
"असंच सेलिब्रेशन साठी ."
छान जेवण झाल्यानंतर दोघं वापस आले.
आज ते घरी वापस जाणार होते. खूप एन्जॉय केलं होतं. ते घरी आल्यामुळे नंदिनी मॅडम, राहुल सर खूप खुश होते शनाया कॉलेजला गेली होती तिच्यासाठी पण बरंच सामान आणलं होतं. आजी घरात नव्हत्या तर वेगळंच वाटत होतं. त्या दिवशी ते आरतीच्या घरी जाऊन सगळ्यांना भेटून आले.
आज रात्री त्यांची ऑनलाइन नीट होती. "तू जॉईन होतो आहे का वीर?"
"हो .तू आरती?"
"मी जॉईन होते पण मी काहीही लिहिलेलं नाही."
"मग लिही ना."
"कोणत्या विषयावर लिहू काही सुचत नाही."
आरती जॉईन झाल्या मुळे सगळे खुश होते. बर झाल तु आलीस. या पुढे लिखाण सोडायचा विचार केला तर घर शोधत येवून मारू आम्ही तुला.
बाकीचे हसत होते. बरोबर आहे.
"आज काय लिहील आरती पोस्ट कर. "
हो.
आज मी थोडा जोडीदाराबद्दल लिहिल आहे. म्हणतात जोड्या ह्या स्वर्गातुन बनतात. माझ तस झाल आहे. एक अतिशय समजूतदार मुलगा माझ्या आयुष्यात आला. खूप प्रेम दिल त्याने मला. कुठल्याही गोष्टीची कमी नाही. अतिशय मीठ मन आहे त्याच. माझ्या कित्येक चुका त्यात सामावलेला आहेत. खूप प्रेम करतो तो. अजून काय हवं आयुष्यात. मी पण ठरवल आहे आता कोणी नको मला फक्त तो आणि मी. तो म्हणेल ते मी करेल. ही काही बळजबरी नाही. तो ही माझ्या साठी काहीही करतो. मी म्हणेल ते ऐकतो. मला सांभाळून घेतो. हे आमच नातं आहे प्रेमाचं आपुलकीचं आमच छोटस जग . त्यात दोन जीव एकरूप होऊन जातात.
वीर वाचत होता. बरच लिहिल होत. त्याने आरती कडे बघितल. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिने त्याला पुढे होवुन मिठी मारली. लव यू आरती.
अतिशय सुंदर लिहिल आहेस आरती . खूप मेसेज येत होते.
दोघ खूप समजूतदार आणि हुशार झाले होते. ट्रेनिंग संपल्यावर आरतीने ऑफिस जॉईन केल. तिचे डिसीजन काम करायची पद्धत खूप छान होती.
मीनल घरात चांगली रूळळी होती. तसं त्यांच्याकडे काही प्रॉब्लेमच नव्हता. सरला ताई सगळं सांभाळून घेत होत्या. आजी होत्या चिडक्या पण आता हल्ली त्या रुममध्ये गप्प बसून होत्या. त्यांना माहिती होतो मीनल हुशार आहे. तिला नाव ठेवण्यासारखं काही नाही. ती आणि तिची सासू बघून घेईल. आपण आता त्यांच्या संसारात लुडबुड नको करायला. घरात सगळे मीनलची खूप काळजी घेत होते.
वरूण तिच्या सोबत असल्यामुळे मीनलला काही वाटत नव्हत. पूर्ण वेळ हसण्यात जात होता. त्यात तिने ऑफिस जॉईन केल होत. संध्याकाळी ती घरी यायची त्यावेळी राहुल यायचा. लवकर स्वयंपाक करून जेवण करून ते दोघ फिरून यायचे. राहुल अतिशय चांगला होता त्यामुळे तिला विशेष काही वाटलं नाही.
मीनलच्या आईने इकडे घर शिफ्ट केलं होतं. मीनलला सारखं माहेरी यायचं नाही असं काकूंनी सांगितलं होतं. म्हणून वरुण मीनल मुद्दाम त्या काकूंना त्रास द्यायला त्यांच्या कडे जात होते.
शनाया ग्रॅज्युएट झाली. पुढच्या शिक्षणासाठी ती बाहेर गावी गेली तिथे तिला रुद्र भेटला अतिशय चांगल्या घरचा रुद्र सगळ्यांना आवडला .तीच वाजत गाजत लग्न झाल. ती सासरी गेली.
आरतीच लिखाण सुरू होत. बरेच पुस्तक पब्लिश झाले होते. प्रसिद्ध लेखिका होती ती छान काम सुरू होत.
आज त्यांच्या लग्नाच्या पाचवा वाढदिवस होता. ठरल्या प्रमाणे दोघांनी लग्न करायच ठरवल होत. त्यांच्या फार्म हाऊसवर छान कार्यक्रम होता. दोघी बाजूची मंडळी आली होते. सगळे खूप एन्जॉय करत होते. पारंपारिक पोषाखात सगळ्यांच फोटो शूट झाल. आरती पण नटुन तयार होती. वीर शेरवानी मधे रूबाबदार दिसत होता. घरचे सगळे हजर होते.
"पिहु तयार झाली का? आरती माझी पिहू कुठे आहे?" वीर विचारात होता.
डॅडी.. दोन वर्षाची गोड पिहु छोटासा घागरा घालून पळत आली. वीरने तिला उचलून घेतल. खूप पापी दिली. "नको डॅडी माझी तयारी खराब होते."
सगळ्यांच्या चेहर्यावर हसू आल.
"मम्मी तुझ लग्न आहे का?" तिने विचारल.
हो.. आरती ने सांगितल.
" डॅडी सोबत का?"
हो.
"आरती इकडे ये. पिहु मोठ्या पणी सांगेल मम्मी डॅडीच्या लग्नात मी होते. बाकीच्यांना वाटेल आपल्याला लग्ना आधी पिहु झाली." वीर हसत होता.
"वीर गप्प बस काहीही काय बोलतोस तू." आरती ओरडली. खर तर तिला ही हसु येत होत.
"मग लग्ना नंतर हनीमून साठी जायचं ना? पिहुला भाऊ नाही तर बहीण आणायची ना. " वीर तिच्या जवळ येत हळूच बोलला.
आरती लाजली. "नाही वीर ती अजून दोन वर्षाची आहे. "
"अरे दोघ मुल सोबत मोठे होतील. ते त्यांचे त्यांचे रहातील आपल्याला वेळ मिळेल." वीरने आरतीला जवळ ओढल.
" वीर सोड आपण लहान आहोत का?"
"सत्तर वर्षाचे झाले तरी मी असाच तुझ्या मागे मागे करेल."
आरती हसत होती .
"चला वर वधू कुठे आहेत?" बाहेरून आवाज आला.
" दादा वहिनी चला आता पुरे तो रोमॅन्स. " शनाया बोलवायला आली.
दोघ सोबत स्टेज वर आले. सगळे हसत होते. थोड्या वेळा साठी हात सोड वीर आरतीचा.
मंगलाष्टक झाल. वरुण राकेश प्रकाश शनाया सगळे जोडीने आले होते. ते खूप गम्मत करत होते.
त्यांच्या खूप छान ग्रुप तयार झाला होता. राहुल मीनलला ही मुलगा होता. सगळे खुश होते.
त्यांच्या खूप छान ग्रुप तयार झाला होता. राहुल मीनलला ही मुलगा होता. सगळे खुश होते.
"मग आता लग्न झाल वहिनी पुढे काय?" शनाया विचारत होती.
"आम्ही उद्या फिरायला निघतो आहे." वीरने अस जोरात सांगितल्यावर पूर्ण ग्रुप हसत होता.
आरती लाजली. "वीर काय अस गप्प बस."
"पिहुला राहू द्या माझ्या जवळ." मीनलने तिला जवळ घेतल.
"नाही पिहु पण येणार. मी पिहु शिवाय राहू शकत नाही. " वीर बोलला.
" मी पण. " आरतीने साथ दिली. दोघांनी पिहुला पापी दिली.
आरती वीर रूम मधे आली. समोर सुंदर गुलाबी पत्र होत. त्यावर लाल गुलाबाच फुल ठेवल होत.
" तू लिहिलस हे. " आरती विचारत होती.
" हो तुझ्या साठी." तिने ते पत्र हातात घेतल. वीरने तिला मागून मिठी मारली. आरती वाचत होती.
माझ्या या मनाला हवीहवीशी तू. माझ आयुष्य तू सगळ काही तु. कधीच जावू नको दूर. मोरपंखी स्वप्न सजवु. त्याला मिळून आकार देवु. चुका झाल्या तर सांभाळून घेवू. प्रेमाच हे नात आपल. तुझाच ध्यास मला. गुलाबी कुपीत ठेवलीत स्वप्न. उलगडून बघु. तू आणि फक्त तू हवी. नको कोणी आता. माझ्या मनाला नेहमीच ओढ तुझी लागली... ओढ तुझी लागली...
समाप्त.
वाचकांचे खूप आभार. ❤️
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा