कथा शीर्षक- वांझोटी
*लेखिका - स्वाती बालूरकर, सखी*
वांझोटी (भाग - १)
मध्यरात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज ऐकून वासंती घाबरली होती. कुत्री भुंकतात ते ठीक आहे पण कुत्री जेव्हा रडायला लागतात तेव्हा रात्रीच्या शांततेत ते खूप भयान वाटायला लागतं आणि कुत्र्यांचं ते वेगळच रडणं कधीकधी एखादा माणूस रडतोय की काय असं वाटायला लागतं. कुत्रे का इतके दुःखी होतात रात्री कळत नाही. त्या कुत्र्यांच्या भुंकण्याच्या , रडण्याचा आवाज का येतो आहे हे पाहण्यासाठी वासंती बाहेरचे दार उघडुन अंगणात आली.
ती पाहते तर चार कुत्रे मिळून काहीतरी गाठोडेवजा वस्तू ओढून आणत होते. कुतूहल जागृत झालं .काहीतरी कपड्यात गुंडाळलेला ऐवज? की वस्तू? काहीतरी बांधलेलं गाठोडे, जे त्यांनी उकललं होतं, ती कुत्री जवळजवळ येत गेली आणि फरफटत त्या कपड्यात गुंडाळलेल्या वस्तूला जवळ अजून जवळ घेऊन येत होती.
अगदी नजरेच्या टप्प्यात जेव्हा कुत्री आली तेव्हा त्याच्यावरचा कपडा अर्थात सुती साडी बाजूला झाली आणि ती वाकून पाहते तर काय? आत मध्ये गोंडस बाळ . . ! जिवंत की मृत कळत नव्हतं पण जे कुत्र्यांच्या नखांनी जखमी झालेलं होतं !

वासंतीचा थरकाप उडाला. बाळ जिवंत नव्हतं . . प्रेतअसावं बहुतेक . . कुत्रे त्याचे लचके तोडण्याच्या तयारीत होते. इतक्या तान्ह्या बाळाला कुत्र्यांनी अशा अवस्थेत ओढत आणलेलं पाहून ती जोरात किंचाळली.
घामात डबडबलेली ती उठून बसली. तिच्या किंकाळीने नवरा देखील झोपेतून उठला.
घामात डबडबलेली ती उठून बसली. तिच्या किंकाळीने नवरा देखील झोपेतून उठला.
“ काय झालं वासंती ? का ओरडलीस?” तिने नवऱ्याला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागली.
त्यांने कितीदा विचारलं पण तिची जीभच वळेना.
स्वप्नात जे पाहिलं त्या दृश्याने ती इतकी घाबरली होती की जणू तिची जीभ टाळाला चिटकली होती.
त्याने तिला पाणी आणून दिलं.
“काही भयानक पाहिलस का? घाबरलीस का?”
तिने मानेनेच होकार दिला.
“काही भयानक पाहिलस का? घाबरलीस का?”
तिने मानेनेच होकार दिला.
“जमेल तेव्हा सांग, आता शांत झोप!” असे सांगून तिला झोपी घालून तो दुसरीकडे तोंड करून झोपी गेला.
वासंतीला मात्र यानंतर झोप लागलीच नाही.
वासंतीला मात्र यानंतर झोप लागलीच नाही.
ती विचारात पडली, असं का दिसलं असावं? कुठलं बाळ असेल? कुणाचं? कुत्र्याने त्याला कुठून आणलं होतं? ते अगोदर मेलेलं होतं की कुत्र्यांच्या लचके तोडण्याने गेलं . . ? किती गुटगुटीत बाळ होतं. ते आठवून आपोआप तिची उशी अश्रूंनी भिजत राहिली.
सकाळी उठून ती रोजच्या कामात लागली खरी पण ते रात्री पाहिलेलं स्वप्न काही डोळ्यासमोरून जात नव्हतं. काही खडखड वाजले की ती दचकून बाहेर बघत होती.
दोन दिवस गेले असावेत पुन्हा तसंच काहीसं स्वप्न तिला पडलं.
ती एका जुन्या वाड्यात ओसरीत बसली आहे आणि अचानक तीन -चार कुत्रे मिळून अंगणातल्या बदामाच्या झाडाखाली पायाने जमीन उकरत आहेत आणि उकरताना त्यांना कपड्याचा तुकडा लागतो. त्या दुपट्याच्याच टोकाला पकडून तीन चार कुत्री एकदाच बाहेर ओढतात आणि -
त्यातून एक मातीत बरबटलेले गोंडस बाळ बाहेर येतं. मातीत माखलेलं ते बाळ रडायला सुरू करतं आणि , त्याच्यावर हल्ला करण्यासाठी , कुत्र्यांची भांडणं सुरू होतात. त्यांचं भुंकणे तीव्र होत जातं.
त्यातला एक कुत्रा भयानक केकाटतो आणि त्या बाळाच्या दुपट्याला पकडून दोन कुत्रे जोरात ओढतात. बाळाच्या अंगावर त्यांची नखं लागलेली आहेत आणि ते रक्तबंबाळ झालं आहे. हे विभत्स दृश्य पाहून वासंती पुन्हा जोरात ओरडून जागी झाली.

यावेळी नवरा चिडला,”काय झाले तुला? कशाला दचकून उठतेस? दिवसभर काय करतेस काय माहिती, रात्री माझी झोप खराब करतेस.”
आज तिला सांगायचं होतं की तिने काय पाहिलं. पण त्याची ती प्रतिक्रिया पाहून तिला काहीच सांगावं वाटलं नाही.
वीस ते पंचवीस दिवसात अशाच प्रकारचं स्वप्न ५-६ वेळा तरी पडलं. कधी ती नदीकिनारी असायची तर कधी जंगलात असायची. पण प्रसंग तोच, तशीच कुत्री आणि तेच बाळाचं प्रेत!
तिच्या घरात जिथे मुलं हा अगदी जिव्हाळ्याचा विषय होतं , तिथे हे स्वप्न सांगणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणे होते.
तिच्या घरात जिथे मुलं हा अगदी जिव्हाळ्याचा विषय होतं , तिथे हे स्वप्न सांगणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणे होते.
एक महिन्यांमध्ये जेव्हा हेच स्वप्न चार-पाच वेळा पडलं . . असं का? त्यावेळी तिने ठरवलं की हे कोणाला तरी सांगायचं पण नवऱ्याला सांगू इच्छित नव्हती, ती का घाबरते हे त्याला कळणार देखील नव्हतं. सासूबाईंनी तर. . किती दखल घेतली असती? अगदीच. .नाही !
'असू दे , योग्य वेळ पाहून आईला सांगावं का? ती समजून घेईल.' असा विचार मनात चमकून गेला.
कारण अशा परिस्थितीत तिची घुसमट वाढणं साहजिक होतं ज्यावेळी या महिन्यात मासिक पाळी चुकून वर आठ दिवस झाले होते.
लग्नाला पाच वर्षे होत आली होती आणि दिवस रहात नव्हते. सासुबाई आणि नवरा अगदीच जुन्या विचारांचे होते. त्यांना कुणी गोड बातमी विचारली की ते रागाने वासंतीकडे पहायचे. मूल नाही झालं तर पुढे काय करायचं? कधी कधी अशा चर्चा देखील व्हायच्या दाराआड ! अशात हे स्वप्न सांगणं म्हणजे खूप जोखीम होती. तिने ठरवलं होतं की तीन महिने पूर्ण होईर्यंत याबद्दल कुणालाच काही सांगायचं नाही.
पुन्हा जेव्हा काही दिवसांनी तिला रात्री असंच स्वप्न पडलं आणि ती दचकून उठली. यावेळी नवऱ्याला जाग देखील आली नाही. ती घामाने डबडबलेली होती. उठून पाणी पिलं. त्यानंतर तिला झोप लागली नाही. साडेपाच वगैरे वाजले असावेत, जाग आलीच आहे तर सकाळची कामं करून घेऊयात असा विचार करून ती पुढचं दार उघडू लागली. सडा रांगोळी सूर्योदयाच्या आधी झाली म्हणजे वेळ मिळेल असा काहीतरी विचार मनात चालला होता. त्याचवेळी अचानक गल्लीतल्या कुत्र्यांचा गोंधळ सुरू झाला.
स्वप्नात सारखे पाहिल्यामुळे ते रडण्याचे आणि विव्हळण्याचे आवाज तिला परिचयाचे झाले होते. मनात भीती वाटली तरी न भिता दार उघडून ती बाहेर आली. ती घरासमोर ओट्यावर उभी होती आणि अचानक झाडीतून दोन चार कुत्रे एक गाठोडं तोंडाने ओढत घेऊन आले. त्यांची भांडा भांडी सुरु झाली. प्रत्येक कुत्रा त्या गाठोड्यावरती झेप घेण्यासाठी जणू तयारच होता.
तिच्या डोळ्यादेखत त्या गाठोड्याच्या कपड्याच्या चिन्ध्या चिंध्या झाल्या आणि आत एक बाळाचे प्रेत, काळे ठीक्कर पडलेले . . त्याच्या अंगावर कुत्र्यांच्या नखांच्या जखमा होत्या. त्या गाठोड्याला वरून माती लागलेली होती. कुठून तरी पुरलेलं बाळाचं प्रेत कुत्र्यांनी आणलं होतं.

आता मात्र ते प्रत्यक्ष पाहिल्यानंतर वासंतीने जोरात किंकाळी फोडली. हे सगळं स्वप्नात पाहणं वेगळं आणि प्रत्यक्षात पाहणं वेगळं !
नेमकं त्याचवेळी फाटलेली गोधडी गुंडाळून वेडे वाकडे केस असलेला, दात पुढे आलेला, भयानक डोळ्यांचा एक वेडा माणूस झाडीतून अंगणात येऊन तिच्याकडे बघू लागला. एकदा तो त्या बाळांकडे पाहू लागला आणि एकदा तिच्याकडे! त्या वेड्या माणसाला पाहून ती कुत्री तिथून पळून गेली. तिच्या डोळ्यासमोरच त्या झिपऱ्या आणि गलिच्छ दिसणाऱ्या माणसाने ते बाळाच्या प्रेताचे गाठोड गोळा केलं आणि तिच्या जवळ घेऊन येऊ लागला. ही ही ही करत , त्याचे दात दाखवत! आता ती जोरात ओरडली आणि जागीच बेशुद्ध झाली.
******
क्रमशः
लेखिका - स्वाती बालूरकर, सखी
दिनांक ०१.०३.२५
दिनांक ०१.०३.२५
(अष्टपैलू स्पर्धेसाठी कथा )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा