Login

कोणाचे ओझे वाहते ती

Ojhe
कोणाचे ओझे वाहते ती ??

" श्रिया नौकरी कर पण जरा रडणाऱ्या बाळाकडे लक्ष दे जरा..!! "

श्रिया पटापट डबे भरत होती ,तिचा त्याचा ,बाळाचा आणि सासूचा ही डबा..त्यांना सगळ्यांना देऊन ती आपली बॅग भरण्यासाठी पाळली

तिचे ते काम होताच ऑफिस ची फाईल आणि मग त्याची एकच घाई

"आवर ग पटकन काय हा रोजचाच तुझा उशीर ,तुझ्यामुळे मी उशिरा पोहचतो..तुला अजून ही टाइम मॅनेज कसा होत नाही..तुझी ही सवय मला मारणार बघ..तू असे कर तू तुझी कॅब करून येत जा मी थांबू शकत नाही...सगळे माझ्या कडे कसल्या नजरेने बघतात ,जणू चोर पकडला अशी नजर असते त्यांची..तशी चूक त्यांची नाही..माझी चूक आहे..बॉस आहे मी ." अभिराज

ती अभिराज कडे बघत होती ,सगळा वैताग तिच्या नजरेतून दिसत होता..आता जणू ती चोर आहे..मीच दोषी जणू..हे माझेच दोष..

"काय जणू मी मुद्दाम करते का उशीर..ही घाई माझ्या मागे असते ज्यात तुझी मदत नसते काहीच..ती मी उरकली नाही तर कोण उरकणार..त्यात मी परफेक्ट हाऊज वाईफ..तू ही परफेक्टशनिस्ट ,तुला कसे सगळे जागच्या जागेवर सापडायला पाहिजे असते घरी आल्यावर..मग त्यासाठी मीच आवरा आवर करते...बाळाला कमी पडू द्यायचे नाही ,आईला ही सांभाळून घेऊ मी ?? का तर मला सगळे फोन करून विचारून हैराण नको करायला..मी म्हणजे रोबोट ,माझ्या काही ऑफिसच्या वेळा नसतात पाळ्याच्या मला..! मला ओरडा नसतो कोणाचा , धाक नसतो..मी कधी ही उठून जाऊ शकते..आवाज दिला की घरी मी धावत येऊ शकते.. आणि ते करत असतांना मला ऑफिस मध्ये जाब विचारणारे नसतात का रे?? चोरी करते मी रोज वेळेची..! कामात कमी पडते मी !! तरी ऑफिस सावरायला ,घर सावरायला मी पळते... त्यात त्यांचे मन, तुझे मन.. बाळासाठी सासुबाईचे मन मी सांभाळते...ह्यात माझे मन किती मारते मी...!! कोणाला ही काही पडलेली नाही त्याची... मी उठते तशी आधी तुमचे चहा देते... त्यांच्या गोळ्या देते...तुझी आवरा आवर...नको नको म्हणत असतांना ही आई आल्या का तर त्यांनी हे त्यांच्या काळात अनुभवले आहे... त्यांच्या सासूबाईने त्यांचे तेव्हा जे मन जपले होते ,त्याची फेड त्या आत्ता करत आहेत... मला समजतंय...म्हणूनच मी किती ही त्रासलेली असू दे मी त्यांच्या वर कसला राग काढू शकत नाही...पण त्या दरवेळी म्हणतात..आज तू सगळ्यातून सुट्टी घे मी घराकडे बघते...त्यात ही वेगळी ताकद मिळते... त्याचे बळ कैक असते... पण तू मात्र अजून ही हेच समजतो आहेस की मी बाळ होण्यापूर्वीची तुझी चपळ चंचल बायको आहे... पण नाही उलट मी त्यापेक्षा जास्त कमजोर पडले आहे.. फक्त तुझ्या मुळे... तारेवरची तेव्हाची कसरत आणि आत्ताची कसरत जणू मी दोन तारे वर चालत आहे असे वाटते..."

ती इतके बोलून हुश्शह करून मटकन खाली बसते... सासूबाई तिला लगेच पाणी घेऊन येते...तिला शांत करत पाठीवरून हात फिरवत म्हणते ,"उद्यापासून तो आणि मी दोघे ही जमेल तसे हात भार लावणार..मग बघू याचे टाइम मॅनेज कसे होत नाही ते...कसा हा उशिरा पोहचतो ते...त्यात जर हलगर्जीपणा केला तर मग त्याने तुझे काम होइपर्यंत थांबावे.."

"आई आधीच तुम्ही खूप करत आहात ,मला त्याची लाज वाटते..पण मी अजून जास्त तुम्हाला थकवू शकत नाही.."

सासूबाईने लगेच सांगितले ,"मी जुने हाड आहे..इतक्या लवकर कुठे थकते..शारीरिक थकने चालून ही जाते पण मानसिक थकने समजत नाही...त्यात तू नवखी आई..बाळासाठी तुझी धडपड होते... काम कधी फेकून बाळाकडे येऊ असे तुला होते...त्यात माझ्या मुळे कमीतकमी त्रास होईल हे मी ही बघते..आणि तसे ही हे काय तुझ्या एकटीच ओझे आहे का ?? तू कोणाचे ओझे वहात आहेस..? तसे बघायला गेलं तर आमच्या वंशाचे ओझे वहात आहेस...मग तू एकटी का झिजणार ?"

तिला सासूबाईच्या सावरणाऱ्या शब्दाने बरेच बळ दिले.. तो येऊन तिच्या हातातील समान घेऊन पुढे ठेऊन परत माघारी आला..त्याने तिच्यासाठी दार उघडले... तिला उशीर होतंय हे चुकून ही बोलणार नाही हे ठरवले होते...

आज ही तिचे तसेच झाले होते ,त्याला उशीर होत होता पण त्याने ऑफिसमध्ये सांगून ठेवले होते मी रोज थोडा उशिरा येणार आहे... पण आज मात्र तोच लवकर उठला होता..त्याने त्याचे काम आवरले होते.. ज्या वस्तू त्याला ऑफिस वरून आल्यावर जागच्या जागी हव्या असतात त्या त्यानेच उचलून ठेवल्या होत्या ,आई सोबत त्याने चहा घेतला होता... बाळाचे नॅपकिन बाहेर काढले होते.. तिला डबे भरायला ही मदत केली होती.. म्हणून तसा उशीर झाला नव्हता... तिच्यावर ही आज जास्त भार नव्हता..

सरळ सरळ सगळे वेळेत आवरले होते... तिला आता सासूबाई सोबत ज्याची साथ महत्वाची होती त्याची साथ मिळाली होती... तो आता ऑफिसमध्ये काम नसेल तर घरी तिच्या आधी येत होता ,आणि तिला आणायला ही जात होता...

कसे असते ना स्त्री सर्वगुणसंपन्न असली तरी ज्याची मदत हवी असते त्याच्या शिवाय ती अधुरी असते... त्यात सासूची ही भूमिका महत्त्वाची ठरतेच...पण सोबतीला नवरा ही हवा असतो...बरोबर ना.

©®अनुराधा आंधळे पालवे