ओळख त्यात एका स्त्रीची म्हटलं की जाधवांची मुलगी, पाटलांची सून ,पवारांची धर्मपत्नी अशी काहीशी गृहिणीची ओळख. मात्र हीच ओळख आयुष्यभर जपताना वाट्याला आलेले काबाडकष्ट , अथक प्रयत्न , दाताच्या कण्या करून छोट्या पासून मोठ्या गोष्टींपर्यंत घरातली घेतलेली जबाबदारी होय . मात्र आपल्या प्रियाची ओळख आता रिस्क टेकर, प्रोजेक्ट लीडर म्हणून होणार याचा खूपच आनंद आहे ना तुला सुनंदा . असे प्रियाचे बाबा म्हणाले. तोपर्यंत प्रिया आली आणि म्हणाली "आई मी लवकर आले आज मीही येते सचिन आणि तुमच्याबरोबर डॉक्टरांकडे. " तोपर्यंत प्रियाच्या फोनवर टुमॉरो ' कार्गो प्रोजेक्ट सक्सेस पार्टी विथ फॅमिली ' ची नोटिफिकेशन आली.
दुसऱ्या दिवशी पार्टीमध्ये प्रिया आणि तिची फॅमिली पोहोचली. आणि अनाउन्समेंट झाली. अटेंशन प्लीज लेडीज अँड जेंटलमेंट .वी आर यु हिअर टू सेलिब्रेट सक्सेस ऑफ कार्गो प्रोजेक्ट. आय रिक्वेस्ट लीड ऑफ दिस प्रोजेक्ट प्रिया टू कम ऑन स्टेज . या कार्गो प्रोजेक्टसाठी माझा विरोध असूनही प्रोजेक्टचे इम्पॉर्टन्स आणि कंपनीसाठी असलेली सुवर्णसंधी आहेे , हे समजून आपल्याला अशक्य असणारा प्रोजेक्ट अनलाईज करून तो स्वीकारला आणि त्यावर अपार मेहनत करून तो यशस्वी केला. त्यासाठी काँग्रॅच्युलेशन प्रिया गुड जॉब आणि त्यासाठी आपण तिला बेस्ट प्रोजेक्ट लीडर म्हणून सन्मानित करत आहोत. याचा खूप अभिमान वाटत आहे .
त्यावर प्रिया म्हणाली," खरं माझा या पुरस्काराचे श्रेय मी माझ्या आईला देऊ इच्छिते . कारण जेव्हा मी हा प्रोजेक्ट रिस्क टेकर म्हणून हातात घेतला तेव्हा माझा मुलगा सचिन याचा दुर्दैवाने एक अपघात झाला . मी पूर्णपणे अशा आकांक्षा सोडून खूप खचून गेले होते. आता काय करायचं ते मला समजत नव्हते आणि मी हा प्रोजेक्ट सोडून देणार होते . तेव्हा आई म्हणाली . आपली ओळख निर्माण करताना, आपण हातात घेतलेल्या चॅलेंज पूर्ण करताना, यशाचा मार्ग चढताना खूप मोठी वादळे, संकटे येतात. प्रतिकूल अशी परिस्थिती आपल्यासमोर उभी राहते. तेव्हा आपण हाताश न होता एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा जीव एकवटून उभे राहायला हवे . तू या परिस्थितीला मात देऊन स्वतःची नवीन ओळख निर्माण करू शकतेस ,याचा मला विश्वास आहे .त्यांच्या शब्दांनी आणि राहुलच्या सिटीस्कॅन ते त्याच्या मेडिसिन पर्यंत त्यांनी अतोनात खूप प्रयत्न करून मला सपोर्ट केला .मला मदत केली तेव्हा तर मी माझ्या पंखात बळ आणून हा प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकले.
हे सगळे बोलताना प्रियाच्या मनात आले . सून असूनही मुलगी म्हणूनच असणारे जिवापाड प्रेम , आनंद ,आदर तिला आईच्या डोळ्यात दिसत होता आणि चौकटी बाहेर पडून स्वप्नांची वाटचाल करताना कुटुंबाप्रती असणारे भावविश्व संभाळून घेऊन तिला एका गृहिणीने दिलेले प्रोत्साहन आणि साथ त्यामुळे माझ्यासारख्या हजारो प्रिया या विश्वात कणखर , मेहनती , रिस्कटेकर , कर्तव्यदक्षी , बेस्ट प्रोजेक्ट लीडर म्हणून ओळख निर्माण करू शकतात. असं जेव्हा एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असेल आणि तेव्हाच महिला सबलीकरण महिलांकडून होईल. तेव्हाच असे वाटते.
तुझे भरणी है उडाने छुना है आसमान ,
चाहे काटे हो या फूल राहों मे
तूझे बनानी है मुश्किल में भी तेरी पहचान ।
Kirtee Dubal
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा