( सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचे कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काही संबंध नाही. म्हणून ही कथा फक्त मनोरंजन म्हणून वाचावी.)
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग १
शाश्वतवर्ण
१६५० चा काळ.
राजा भीमराज ह्यांचा दरबार.
" बहुत लढुनी जंग तुम्ही, राजे जिंकले भूमंडळ, राजे जिंकले भूमंडळ..."
माझ्या कवितेची ही शेवटची ओळ ऐकून संपूर्ण दरबारात टाळ्यांचा कडकडाटात झाला. त्याने माझी छाती अभिमानाने फुलली. सर्वांनी तोंड भरून माझ्या कवितांचे कौतुक केले.
आज राजसाहेबांचा जन्मदिवस असल्यामुळे दरबारात राजकवी म्हणून राजांनी माझ्या कवितांचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांचा मी अतिशय लाडका कलाकार. ते साहित्याचे शौकीन आहेतच म्हणून, त्यांना माझ्या कविता अतिशय आवडतात.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या सेनेसह जवळच्या राज्यावर आक्रमण केलं. त्या राज्यात मी दरबारात राजकवींसोबत नोकरीला होतो. राजांच्या आक्रमणानंतर मला बंदी बनवण्यात आले. पण, नंतर राजांना समजले की, मी कवी आहे. त्यांनी मला बोलावून त्यांच्या समोर कविता सादर करायला सांगितल्या. त्या वेळेस मी घाबरून माझ्या काही कविता सादर केल्या आणि बस तेव्हाच राजे माझ्या कलेचे चाहते झाले. तेव्हाच त्यांनी मला त्यांच्या राज्याचा राजकवी म्हणून घोषित केले आणि माझे संपूर्ण आयुष्य बदलले.
अचानक झालेल्या घोषणेमुळे माझी तंद्री भंग झाली. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त इतकी सुंदर कविता सादर केल्यामुळे त्यांनी मला त्यांच्या जवळ बोलावून घेतले. काही पाऊले चालून मी त्यांच्या जवळ गेलो.
" वाह... कवी शाश्वतवर्ण, आज पुन्हा एकदा तुमच्या कवितेने आमचे हृदय जिंकले. ही घ्या आमच्याकडून तुमच्यासाठी छोटीशी भेट."
इतकं बोलून राजांनी त्यांच्या गळ्यातील एक मोत्यांचा मौल्यवान कंठा काढून माझ्या गळ्यात घातला.
इतकं बोलून राजांनी त्यांच्या गळ्यातील एक मोत्यांचा मौल्यवान कंठा काढून माझ्या गळ्यात घातला.
त्या घटनेने पुन्हा एकदा दरबारात टाळ्यांचा कडकडाटात उठला. राजकवी म्हणून माझा सत्कार करण्यात आला. मग त्या नंतर राजांच्या जन्मदिवसाची धुमधाम सुरू झाली. वेगवेगळ्या राज्याचे राजे राजांना भेटायला त्यांना भेट वस्तू देऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. संपूर्ण राज्यातील लोकांना आज इथेच जेवण होते त्यासाठी किती तरी लोकं दरबारात दरबारा बाहेर जमून राजांच्या नावाचा जयघोष करत होते. बाहेर मोठ्या प्रमाणात जेवणाची तयारी सुरू होती.
दरबारातील कार्यक्रम झाल्यावर मी थोडा वेळ विश्रांती म्हणून माझ्या कक्षाकडे जाण्यासाठी निघालो. आज दरबारातील सगळी मंडळी बाहेर कार्यक्रमाच्या कामात व्यस्त होती. मला दरबाराच्या मागच्या बाजूला राहण्यासाठी एक कक्ष देण्यात आला होता. ज्याची वाट दरबाराच्या आतूनच जात होती.
मी माझ्याच धुंदीत एकटा डोक्यात काही तरी विचार करत असताना वाटेतच थांबलो. समोर मला एक कागदाचे पान पडलेले दिसले. मी जाऊन ते हातात उचलून घेतले. आणि आजूबाजूला पाहिले तर, तिथे माझ्याशिवाय कोणीच नव्हते. मी त्या कागदाची घडी उलघडून त्यात पाहू लागलो.
" शब्दांनी तुमच्या होते धुंद माझे मन,
ऐकताना मनास वाटे थांबवावा क्षण."
ऐकताना मनास वाटे थांबवावा क्षण."
ते वाचून माझ्या चेहऱ्यावर आपसूक स्मित उमटले. पण, ते कोणी लिहिले होते हे कळत नव्हते. कारण तसे त्याच्यावर काही नाव देखील नव्हते. मी विचार करत असतानाच मागच्या बाजूने माझ्या कानावर पैंजणांचा आवाज ऐकू आला. मी वळून त्या दिशेला पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. जे कोणी होते ते तिथून पळून गेले होते.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा