दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग २
अदिती
२०१५ चा काळ मुंबई.
" जीव व्यापून टाकते मला तिची आठवण,
जन्मोजन्मांपासून मनात आहे जिची साठवण."
जन्मोजन्मांपासून मनात आहे जिची साठवण."
काय ते शब्द... काय त्या भावना... किती सुंदर रित्या ह्या कवीने आपले भाव आपल्या कवितांमध्ये मांडले आहेत. खरंच मला तर, ह्यांच्या कविता फार आवडल्या.
आज किती तरी दिवसातून सुट्टीच्या दिवसात निवांत वाचन करायला म्हणून इथे आले आणि काही तरी सुंदर हातात सापडले. पण, ह्या कविता काय माहीत का आजच्या काळातल्या वाटत नाही आहेत. आणि हे शब्द फार ओळखीचे आणि जवळचे वाटत आहेत. काय असं गूढ लपलेलं आहे ह्यांच्या कवितांमध्ये?
बरं आहे इथे येणं माझ्या फायद्याचे ठरले. मला माझ्या कॉलेज मधल्या पुरातत्त्व - साहित्याचा अभ्यास करण्यासाठी खूप छान आणि वेगळा विषय मिळाला आहे. पण, ह्या कवींचे नाव तरी काय?
आच्छा, कवी वेदांश गुरु नाव आहे तर ह्यांचे. ह्यांची आणखीन काही कवितांची पुस्तके इथे नक्कीच असली पाहिजेत. मी लायब्रेरियनला विचारून बघते. त्यांना नक्की माहीत असेल.
" नमस्कार मॅडम, हे कवी वेदांश जे आहेत त्यांची आणखीन काही पुस्तके आहेत का आपल्या लायब्ररी मध्ये? त्यांच्या कविता खरंच खूप उत्कृष्ट आहेत. मला त्यांच्या आणखीन कविता वाचायला. नक्की आवडेल."
तिथे असलेल्या वयस्कर लायब्रेरियन जवळ जाऊन मी त्यांना विचारले.
तिथे असलेल्या वयस्कर लायब्रेरियन जवळ जाऊन मी त्यांना विचारले.
" हो ना, नक्कीच असतील थांबा हा मी चेक करून सांगते."
इतकं बोलून त्या त्यांच्या जवळची मोठी वही चाळू लागल्या.
इतकं बोलून त्या त्यांच्या जवळची मोठी वही चाळू लागल्या.
त्या शोधाशोध करत असताना मी असच संपूर्ण लायब्ररी मधून नजर फिरवू लागले. इतक्या वर्षांपासूनची जुनी लायब्ररी आहे ही ब्रिटिश काळापासूनची. इथे मला माझा अभ्यास करायला नक्कीच खूप काही मिळेल.
" हे बघा त्यांची आणखीन दोन पुस्तके आहेत लायब्ररी मध्ये. त्या समोरच्या कपाटात तुम्हाला ती पुस्तके मिळतील."
मी विचार करत असताना त्यांनी मला बोलावून मिळालेली माहिती सांगितली.
मी विचार करत असताना त्यांनी मला बोलावून मिळालेली माहिती सांगितली.
मी त्यांचे आभार मानून त्यांनी सांगितलेल्या कपाटाजवळ गेले आणि थोडा वेळ शोध घेऊन मला त्यांची ती दोन्ही पुस्तके मिळाली. मी ते घेऊन तिथेच बाजूच्या टेबलवर बसून ते वाचू लागले. वाचता वाचता मी त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या शब्दांमध्ये अगदी गुंग होऊन गेले. माझे मला भानच राहिले नाही. त्या कवितांशी मी इतकी का आणि कशी जोडले जात होते माझे मलाच समजत नव्हते.
त्यांच्या कविता वाचता वाचता मला त्यांच्याशी संपर्क साधण्याची इच्छा झाली. त्यासाठी मी त्यांच्या पुस्तकात शेवटी आणि सुरुवातीला पाहिले तेव्हा त्यावर मला त्यांचा इमेल आयडी सापडला. तो बघून माझ्या चेहऱ्यावर आपसूक स्मित उमटले. मी तो इमेल आयडी माझ्या जवळ लिहून घेतला.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा