दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग ६
अदिती
२०१५ चा काळ मुंबई.
फारच उशीर झाला यार आज. त्यात ही मीनाक्षी शॉपिंगसाठी पूर्ण दुनिया फिरली पण, मॅडमने घेतलं मात्र काही नाही. स्वतः फिरली ते फिरली सोबत मला देखील फिरवलं. पायांची वाट लागली चालून चालून. त्यात आईचे फोनवर फोन, घरी गेल्यावर काही खरं नाही. देवा बाबा आलेले असुदे घरी म्हणजे झालं.
लायब्ररीमधून माझं काम झाल्यावर मी मीनाक्षीला भेटली. मीनाक्षी म्हणजे माझी कॉलेजची मैत्रीण. आज सुट्टीच्या दिवशी तिच्या शॉपिंगला जायचं हे आमचं आधीच ठरलं होतं. पण, तिने घेतलं मात्र काही नाही. बरं आहे फिरायच्या आधीच खाऊन घेतलं होतं नाही तर वाट लागली असती. फिरून फिरून आता परत भूक लागली आहे आज बहुतेक आईच्या ओरड्यानेच पोट भरावं लागणार आहे.
झपाझप पाऊले टाकत दाराजवळ पोहोचली. बेल वाजवली तर नेमका आईने दरवाजा उघडला. तिच्या चेहऱ्याकडे बघूनच मला समजत होते की, ती किती चिडली आहे. मी काही न बोलता आत शिरले. आईची नजर काही माझ्या वरून हलत नव्हती. आत गेल्यावर समोर सोफ्यावर मला बाबा बसलेले दिसले आणि मनाला समाधान वाटले. त्यांना बघून मी स्मित केले त्यांनी देखील माझ्याकडे बघून स्मित केले.
" या राणी साहिबा या, वेळेचं काही भान आम्हाला? सकाळी नाष्टा करून स्वारी घराबाहेर पडली आहे ते आता कुठे परतली आहे. कुठे होतीस दिवसभर किती फोन केले. सुट्टी होती तर घरी थांबायचं मला मदत करायची तर नाही गेल्यात मॅडम भटकायला."
दरवाजा लावताच आईचं भाषण सुरू झालं.
दरवाजा लावताच आईचं भाषण सुरू झालं.
मला बोलायला तिने एक फट सुद्धा सोडली नाही. शेवटी तिचं लांबलचक वाक्य संपलं आणि मला बोलायची संधी मिळाली.
" काय गं आई अशी बोलतेस? लायब्ररीमध्ये गेले होते ना मी. तिथे पण आज सुट्टीच्या दिवशी अभ्यासच करायला गेले होते. मग नंतर मीनाक्षीला शॉपिंग करायची होती म्हणून तिच्या सोबत गेले. बाबा तुम्ही तरी सांगा ना आईला."
मी संधी साधून बरोबर मुख्य न्यायालयाकडे केस सोपवली.
मी संधी साधून बरोबर मुख्य न्यायालयाकडे केस सोपवली.
" अदिती बेटा तू जा आत. आणि तू गं चला जेवायची तयारी करा उशीर झाला आहे."
बाबांनी दोन वाक्यात गंभीरपणे सूचना केली.
बाबांनी दोन वाक्यात गंभीरपणे सूचना केली.
" तुम्हा बाप लेकीला काही बोलणे म्हणजे महा चूक, जाते मी आपली माझ्या कामात."
आई स्वतःशीच बोलत तिथून किचनमध्ये निघून गेली.
आई स्वतःशीच बोलत तिथून किचनमध्ये निघून गेली.
आई आत गेल्यावर मी बाबांचे हसून आभार मानले आणि आत माझ्या खोलीत निघून आले. फ्रेश होऊन थोडा वेळ बेडवर बसून आज वाचलेल्या कवितांमध्ये हरवून गेले . तेव्हा मला त्या इमेल आयडी बद्दल आठवलं आणि मी उठून माझा कॉम्प्युटर चालू केला. तो चालू झाल्यावर त्यावर माझे इमेल अकाउंट ओपन केले. सोबत आणलेला कवी वेदांश ह्यांचा आयडी समोर ठेवून समोर सेंडरच्या जागी टाईप केला आणि मग विचार करून त्यांना मेल टाईप करू लागले.
' नमस्कार कवी वेदांश, मी अदिती सावंत. मी पुरातत्त्व–साहित्य अभ्यासक आहे. म्हणजे सध्या तरी माझं कॉलेज सुरू आहे ह्या वर्षी माझी डिग्री पूर्ण होईल. त्या निमित्ताने मी आज मुंबईत असलेल्या जुन्या लायब्ररीमध्ये गेले होते. तिथे मला तुमच्या कवितांचे पुस्तके मिळाली. अतिशय सुंदर कविता लिहिता तुम्ही. पण, काय माहित का? मला त्यात पुरातन काळातील भाव जाणवले.
त्यामुळेच मला माझ्या अभ्यासासाठी तुमची मदत हवी होती. म्हणजे तुम्हाला ह्या आयडिया कशा येतात? तुम्ही काय वाचन करता? ह्याची मला सविस्तर चर्चा करायची आहे म्हणून तुम्हाला जमेल तर आपण नक्कीच भेट घेऊन ह्या विषयावर बोलूया.
मी तुमच्या उत्तराची वाट पाहिन.
धन्यवाद.
अदिती सावंत.'
आणि सेंड बटनवर क्लिक करून शेवटी मी एकदाचा तो मेल पाठवला.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा