दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग ८
वेदांश
२०१५ चा काळ मुंबई.
' नमस्कार कवी वेदांश, मी अदिती सावंत. मी पुरातत्त्व–साहित्य अभ्यासक आहे. म्हणजे सध्या तरी माझं कॉलेज सुरू आहे ह्या वर्षी माझी डिग्री पूर्ण होईल. त्या निमित्ताने मी आज मुंबईत असलेल्या जुन्या लायब्ररीमध्ये गेले होते. तिथे मला तुमच्या कवितांचे पुस्तके मिळाली. अतिशय सुंदर कविता लिहिता तुम्ही. पण, काय माहित का? मला त्यात पुरातन काळातील भाव जाणवले.
त्यामुळेच मला माझ्या अभ्यासासाठी तुमची मदत हवी होती. म्हणजे तुम्हाला ह्या आयडिया कशा येतात? तुम्ही काय वाचन करता? ह्याची मला सविस्तर चर्चा करायची आहे म्हणून तुम्हाला जमेल तर आपण नक्कीच भेट घेऊन ह्या विषयावर बोलूया.
मी तुमच्या उत्तराची वाट पाहिन.
धन्यवाद.
अदिती सावंत.'
मेल वाचून मी विचारात पडलो. कोण असेल ही आदिती सावंत? आणि मी काय मदत करणार बरं? मीच आता वेळ मिळेल तसं लिहून शिकतो आहे. पण, तरी ठीक आहे आपल्यामुळे जर कोणाला तरी मदत होत असेल तर चांगलंच आहे. पुढच्या शनिवारी किंवा रविवारी भेटायला हरकत नाही. ह्या आठवड्याची तर सुट्टी संपली. कळवतो मेलमध्ये तसं. पण, आत्ताच नको आता खूप उशीर झाला आहे. सकाळी उठूनच लिहितो मेलला उत्तर.
" वेदु, बाळा जेवायला चल. झालं जेवण तयार."
विचार करत असतानाच आतून आईची हाक ऐकू आली.
विचार करत असतानाच आतून आईची हाक ऐकू आली.
फोन तिथेच ठेवून आत गेलो. आईला जेवण घेण्यात मदत केली आणि मग दोघांनी छान गप्पा करत जेऊन घेतलं. जेवण झाल्यावर आई सोबत सगळं आवरून मग मी माझ्या रूममध्ये जाऊन बेडवर पडलो.
बेडवर पडून पण, मला झोप काही लागत नव्हती. सारखा त्या मगाशी आलेल्या मेलचा विचार येत होता. मी फोन हातात घेऊन तो मेल पुन्हा उघडून समोर धरला. मला माझ्या चाहत्यांकडून मेल येतच असायचे. ते माझ्या कौतुक करण्यासाठी असायचे. पण, ह्यात काही तरी वेगळंच आहे. आजवर मी असं अनोळखी कोणाला भेटलो नाही. पण असो तिचं अभ्यासा विषयीच काम आहे मग ठीक आहे. एकदा भेटून मग जे काही असेल ते समजावून सांगेन तिला बस संपला विषय.
पण मला अशी ह्या मेलची ओढ का लागत आहे? हे समोर दिसणारे शब्द ओळखीचे का वाटत आहेत? एकदा तरी भेट घेतल्या शिवाय ह्या प्रश्नांची उत्तरे सापडणार नाहीत. विचार करता करता मला कधी झोप लागली माझे मलाच समजले नाही.
सकाळी मला लवकरच जाग आली. उठल्या उठल्या बाजूला फोन बघून मला सगळ्यात आधी त्या मेलचा विचार आला. मी फोन हातात घेऊन त्या मेलाला उत्तर टाईप करू लागलो.
' नमस्कार, मी कवी वेदांश गुरु. सर्वप्रथम माझे कौतुक केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या मेल वरून कळले की, तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी माझी काही मदत हवी आहे. खरं तर मी इतका काही मोठा कवी वगैरे नाही. मी जॉब करत वेळ मिळेल तसं आवड म्हणून लिहित असतो.
पण माझ्याकडून जर तुम्हाला काही मदत होणार असेल तर ती करायला मला नक्की आवडेल. मला शनिवार आणि रविवार सुट्टी असते. पुढच्या शनिवारी किंवा रविवारी आपण भेटू शकतो.
पुढच कसं? कधी? कुठे भेटायचं? ते मग ठरवून सांगा त्या प्रमाणे मग नक्की करू आपण.
वेदांश गुरु.'
इतकं लिहून मी मेल सेंड केला आणि ऑफिसच्या तयारीला लागलो.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा