दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग १५
सुलेखा
१६५० चा काळ.
मी कवींना बोलावणे तर धाडले आहे. पण, इथे आता त्यांच्या समोर जाण्यास माझेच काळीज धडधड करत आहे. माझी दुसरी मोहीम देखील फत्ते तर झाली. पण, आता पुढे काय?
ते मला कसं आणि काय शिकवणार? मी काय शिकणार? माझं लक्ष तरी लागेल का त्यांच्या शिकवणी कडे? मला काहीच समजत नाही आहे. देवा तूच सांभाळ आता. इथ पर्यंत तूच आणलेस, आता ह्या पुढे देखील तूच वाट दाखव.
" प्रणाम राजकुमारी, कविराज शिकवणी कक्षात दाखल झाले आहेत."
माझ्या एका दासीने येऊन मला कवींना बोलवायला गेलेल्या सेवकाचा निरोप देऊन निघून गेली.
माझ्या एका दासीने येऊन मला कवींना बोलवायला गेलेल्या सेवकाचा निरोप देऊन निघून गेली.
तिचा निरोप ऐकून मी आणखीनच विचारात पडले. माझ्या काळजाचे स्पंदने हळू हळू वाढू लागले. हे असं माझ्यासोबत का होते आहे? कळायला काहीच मार्ग नव्हता.
मी राजकुमारी आहे. मला हे असं वागून चालणार नाही. मला त्यांच्याकडून कविता करणे शिकून घ्यायचे आहे. मला आता तिथे जायला हवे. कवी माझी तिथे वाट बघत असतील.
मी माझ्या कक्षातून बाहेर निघून वर जाणाऱ्या पायऱ्या चढू लागले. कितीही ठरवलं तरी, माझ्या मनातल्या विचारांवर काही माझा ताबा नव्हता. मी कशी बशी चालत शिकवणी कक्षा पुढे पोहोचले. बाहेर महालात सगळीकडे जागोजागी सैनिक उभे होते.
मी शिकवणीच्या कक्षा समोर पोहोचून माझ्या मनाची तयारी केली. कक्षाचा दरवाजा उघडाच होता. मी हळूच काही आवाज न करता दारात जाऊन उभी राहिले. मला समोरच्या खिडकी जवळ उभे असलेल्या कवींची पाठमोरी आकृती दिसली.
खिडकीतून येणाऱ्या सकाळच्या कोवळ्या किरणांनी त्यांची काया अगदी उजळून निघाली होती. अगदी मध्यम उंचीचे, आकर्षित शरीरयष्टी गौर वर्ण, लांब कुरळे केस, त्यावर स्थिर असलेली ती पगडी. सूर्याच्या सोनेरी प्रकाशनात उजळणारे त्यांचे ते पाठमोरे शरीर पाहून मी तिथेच दरात थांबून त्यांना पाहू लागले.
मी आल्याची त्यांना कल्पना नव्हती. ते बाहेरचे निसर्गातील सौंदर्य बघण्यात मग्न होते आणि मी त्यांना बघण्यात!
" तेज तुझे तेजस्वी, उजळून टाके काया,
किरणे ही लाख मोलाचे, नको घालवू वाया."
किरणे ही लाख मोलाचे, नको घालवू वाया."
त्यांना पाहत असताना अचानक माझ्या कानावर त्यांच्या मधुर आवाजात ह्या दोन ओळी पडल्या आणि मी भानावर आले. सकाळच्या क्षणी, अशा सुंदर सुंदर किरणांच्या साक्षीने त्या मधुर आवाजात अशी गोड कविता ऐकणे म्हणजे मी माझे भाग्यच मानत होते.
" दिल्यानेच वाढत असते, काही जात नसते वाया,
टिकूनी राहते घट्ट नाते , जिथे असते प्रेम माया."
टिकूनी राहते घट्ट नाते , जिथे असते प्रेम माया."
त्यांना पाहता पाहता त्यांच्या त्या दोन ओळी ऐकून माझ्या देखील मुखातून माझ्या नकळत आपसुक ह्या दोन ओळी कधी बाहेर पडल्या माझे मलाच कळले नाही. इतकं बोलून मी स्वतःशीच लाजले. मी काय बोलून गेले माझे मलाच समजले नाही.
पण माझ्या त्या ओळींनी कवी भानावर आलेत आणि त्या निसर्गाच्या दृढ तपश्चर्यातून बाहेर येऊन त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि ते मला तसेच पाहत राहिले...!
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा