दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग १६
वेदांश
२०१५ चा काळ मुंबई.
बघता बघता कसा तरी बुधवार आला. हा आठवडा मला इतर आठवड्यांपेक्षा मोठा का वाटतोय? दिवस जाता जात नाही आहेत. मी ह्या वेळेस शनिवार रविवारची जास्तच वाट बघतोय का? काय माहित काय होतंय? गुरुवार यायला अजून एक दिवस आहे. उद्या कळेल कधी? आणि कुठे? भेटायचं ते. पण, मी ह्या भेटीची इतक्या आतुरतेने वाट का पाहतो आहे? बहुतेक त्या मुळेच हा आठवडा मला इतका मोठा वाटू लागला आहे.
विचार करता करता मी कधी आमच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश केला समजलेच नाही. मी माझी बाईक पार्किंगमध्ये लावली. आणि टिफीन बॅग आणि हेल्मेट घेऊन घरी जायला निघालो. खरं तर आज रात्री उशिरा एका जागी ओपन माईक आहे. पण, बाबा गेल्यापासून असा जास्त उशीर एकटं सोडून जावेसे नाही वाटत. असं ती कधी मला अडवत नाही. तरी माझीच इच्छा होत नाही. म्हणून मी माझी आवड घरी बसूनच पूर्ण करत असतो. आता नुकतेच मी माझे नवीन फेसबुक अकाऊंट सुरू केले आहे. जे मी कधी तरी उघडून सहज बघत असतो. त्यावर देखील मी आता माझ्या कविता पोस्ट करायला चालू करणार आहे. म्हणजे तितक्याच जास्त लोकांना माझ्या कविता वाचता येतील.
बेल वाजवल्यावर आईने दरवाजा उघडला. आईने माझे हसून स्वागत केले. हे हसू म्हणजे माझं जग आहे. किती ही थकलेला असलो तरी हे हसू पाहून मी माझा सगळा थकवा ताण विसरून जातो. तिने माझ्या हातातील बॅग आणि हेल्मेट घेतलं. आत जाऊन तिने माझी आणि मी तिची विचारपूस केली.
आम्ही फक्त दोघेच राहत असलो तरी आमचे हेच पूर्ण आनंदी कुटुंब होते. आम्ही एकमेकांना बाबांची कमी कधी भासूच दिली नाही. ते नेहमी आमच्या सोबत आहेत, असेच आम्ही मानतो.
मी फ्रेश होऊन सोफ्यावर बसलो आईने मला चहा आणून दिला आणि ती पुन्हा किचनमध्ये तिच्या कामाला लागली. चहा घेता घेता मला माझ्या फेसबुक अकाऊंटची आठवण झाली. बरेच दिवस मी ते उघडले नव्हते. म्हटलं आज उघडून बघुया.
मी फोन बाहेर काढून चहाचा घोट घेत फेसबुक उघडले. नवीन असे काही नव्हते. मी माझ्याबद्दल जास्त काही माहिती त्यात भरली नव्हती म्हणून, माझ्या शाळेचीच काही मुलं मुली त्यावर ऍड होती.
मी विचार केला की, आता मी माझ्या कविता इथे टाकणार तर मग, माझी थोडीशी ओळख इथे स्पष्ट करतो. म्हणजे मग मला माझ्या कविता इथे लिखित स्वरूपात टाकता येईल.
कोण जाणे का? पण, आज अचानक मला हे करायची इच्छा झाली. मी कवी म्हणून माझी संपूर्ण माहिती तिथे भरली. आणि माझी पहिली कविता तिथे पोस्ट करायचा विचार करू लागलो.
" अनोळखी ओळख, तरी वाटते ओळखीची,
मनी लागून आहे सखे, आस तुझ्या सोबतीची."
मनी लागून आहे सखे, आस तुझ्या सोबतीची."
सहज ह्या दोन ओळी मला सुचल्या कशा वरून ते मलाच समजले नाही आणि मी त्याच सर्वात आधी इथे पोस्ट केल्या.
पोस्ट करून झाल्यावर मी फोन बाजूला ठेवून विचार करू लागलो. की, ती उद्या मेल करेल ना? तिचं काम जर आधीच झाले असेल तर तिने भेटायचं टाळलं देखील असू शकतं. मी इतका विचार करायला नको असं मला वाटतंय. कारण भेट नाही झाली तर उगाच मन उदास व्हायचं.
मी विचार करत असतानाच फोन मध्ये नोटिफिकेशनचा आवाज आला. फोन हातात घेतला तर, ते फेसबुकचे नॉटिफिकेशन होते. त्यावर अदिती सावंत हिची मला फ्रेंड रिक्वेस्ट आली होती.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा