दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग २४
वेदांश
२०१५ चा काळ मुंबई.
' रीडर्स बुक कॅफे ' दोन साहित्यिकांना भेटण्यासाठी अगदी परफेक्ट जागा आहे. अनिकेत सांगत होता ते अगदी शांत कॉफी सोबत वाचनासाठी परफेक्ट कॅफे आहे. तिला आत्ताच मॅसेज करून कळवतो.
तिला मॅसेज करायला मी फोन हातात घेऊन फेसबुक उघडला. आज ऑफीस वरून यायला उशीरच झाला. त्या अनिकेतला भेटायच्या नादात उशीर झाला. त्याच्यासाठी थांबलो मग ऑफिस खाली चहा सोबत गप्पा मारण्यात वेळ कधी गेला समजलेच नाही.
" असण्याने तिच्या मज आयुष्य जगणे वाटे गोड.
सखीच्या प्रेमाला नाही विश्वात कसलाच तोड."
सखीच्या प्रेमाला नाही विश्वात कसलाच तोड."
फेसबुक उघडून सर्वात आधी आज मला सुचलेल्या ह्या दोन ओळी मी तिथे पोस्ट केल्या. कालच्या पोस्टला बऱ्यापैकी लाईक्स आणि कमेंट आले होते. त्या कमेंट ना मी रिप्लाय दिला. त्यांना रिप्लाय देता देताच माझ्या आजच्या पोस्टला लाईक आणि कमेंट आली.
' अदिती सावंत ' आह... नाव वाचून आपसुक माझ्या चेहऱ्यावर स्मित उमटले. आजच्या पोस्टला देखील तिची पहिली लाईक कमेंट होती. मी तिच्या कमेंटला रिप्लाय दिला. मग मॅसेज मध्ये जाऊन तिला मॅसेज केला. आणि बोलू लागलो.
मी : हाय.
अदिती : हाय, जेवलात का?
मी : नाही अजून बनतंय. तुम्ही जेवलात का?
अदिती : नाही, आत्ताच कॉलेजचा अभ्यास आवरून फेसबुक उघडलं तर पहिलीच तुमची पोस्ट दिसली. खूप छान लिहिता तुम्ही. आवडतं मला.
हे शब्द वाचून माझ्या मनात काय माहित का? पण फुलपाखरू उडत असल्याचं भासू लागलं.
मी : खूप खूप धन्यवाद. इतकं काही नाही, बस शिकत शिकत प्रयत्न करत असतो. तुमच्या ह्या कौतुकाने लिहायला आणखीन हुरूप येतो.
अदिती : नाही पण खरंच छान लिहिता तुम्ही. लायब्ररी मध्ये तुमच्या वाचलेल्या कविता अजूनही माझ्या नजरेसमोर जात नाहीत. खास करून ती कविता हा स्पर्श तुझा नावाची. ती मला फार मनाच्या जवळची वाटली.
सख्या रे ये परतूनी बघ सांज झाली
तुझ्या आठवांनी माझ्या गाली लाज आली ll धृ ll
तुझ्या आठवांनी माझ्या गाली लाज आली ll धृ ll
दूर असलास नेहमी सख्या तू जरी
वाट पाहते तुझी रे होवूनी बावरी
पत्रे तुझी ती रे पुन्हा मी वाचून झाली
तुझ्या आठवांनी माझ्या गाली लाज आली || १ ||
वाट पाहते तुझी रे होवूनी बावरी
पत्रे तुझी ती रे पुन्हा मी वाचून झाली
तुझ्या आठवांनी माझ्या गाली लाज आली || १ ||
वेडावले सख्या बघ ना रे मन माझे
होईल दर्शन कधी नयनांना तुझे?
रूप तुझे ते देखणे अठवूनी झाली
तुझ्या आठवांनी माझ्या गाली लाज आली || २ ||
होईल दर्शन कधी नयनांना तुझे?
रूप तुझे ते देखणे अठवूनी झाली
तुझ्या आठवांनी माझ्या गाली लाज आली || २ ||
दुरावा तुझा सहन हा होई ना आता
स्पर्श तुझा आठवितो मला येता जाता
त्या गोड स्पर्शाने तुझ्या मी प्रेमात न्हाली
तुझ्या आठवांनी माझ्या गाली लाज आली || ३ ||
स्पर्श तुझा आठवितो मला येता जाता
त्या गोड स्पर्शाने तुझ्या मी प्रेमात न्हाली
तुझ्या आठवांनी माझ्या गाली लाज आली || ३ ||
तिच्या मेसेजला इतका वेळ का लागतो आहे मी विचारात पडलो. पण एकदा तिचा मॅसेज आला आणि मी थक्क झालो. तिने माझी कविता पूर्ण मला टाईप करून पाठवली.
मी : वाह... ही माझी कविता तुम्हाला इतकी आवडली? छान वाटलं तुमच्या कडून स्वतःची कविता वाचायला. पुन्हा एकदा खूप धन्यवाद.
अदिती : हो, त्या दिवशी मी लायब्ररी मध्येच ही माझ्या जवळ लिहून घेतली होती. कोणास ठाऊक का? पण मला ही कविता माझ्या हृदयाच्या जवळची वाटली. आणि ह्या कविते मुळेच मला तुमच्या लिखाणात पुरातन लिखाणाची जाणीव झाली आणि तुम्हाला भेटायची इच्छा झाली.
मी : अच्छा, छान! बरं मला भेटण्याबद्दलच तुम्हाला बोलायचं होतं. मी त्या कॅफे बद्दल माहिती काढली. ते गोरेगाव वेस्टला रिडर्स बुक कॅफे म्हणून आहे. आपण तिथे भेटूया. म्हटलं दोन साहित्य प्रेमी व्यक्तींना भेटायला त्या शिवाय चांगली जागा नसेल. गोरेगाव स्टेशनवरून तुम्हाला ब्रिज खालून रिक्षा मिळेल. सहा वाजता आपण तिथे भेटूया मी तुम्हाला तिथेच भेटीन डायरेक्ट.
अदिती : वाह... मस्त मी देखील ऐकून आहे त्या कॅफे बद्दल तिथेच भेटूया आपण चालेल मी येईन वेळेवर.
मी : बरं चालेल येतो मग मी आई जेवायला बोलावते आहे. परवा भेटूया मग आपण. शुभ रात्री, काळजी घ्या.
अदिती : हो चालेल नक्कीच शुभ रात्री तुम्ही ही काळजी घ्या.
तिचा रिप्लाय वाचून मग मी फेसबुक आणि फोन बंद करून मनातल्या मनात खुश झालो आणि फोन बाजूला ठेवून काही वेळ शांत विचार करत बसून राहिलो.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा