दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग २५
शाश्वतवर्ण
१६५० चा काळ.
" आठवणीत तुझ्या आई, मन माझे रडते,
गर्दीतही अनेकदा जगी, मी एकटी पडते."
गर्दीतही अनेकदा जगी, मी एकटी पडते."
किती भावनात्मक भाव मांडले आहेत राजकुमारींनी. ही कविता त्यांनी महाराणींच्या आठवणीत लिहिली आहे. त्यांच्या सगळ्याच कविता त्यांच्या आयुष्याचे काही ना काही प्रसंग दर्शवतात. कवितेतून भाव अगदी छान रित्या मांडता येतात त्यांना अतिशय सुरेख आणि सुंदर.
त्यांनी मांडलेल्या ह्या महाराजांविषयी, राजकुमारांविषयी, राज्याविषयी कवितेतून मांडलेल्या भावना खरंच खूप सुरेख आहेत. त्या कवितेतून आनंद, दुःख, कुतूहल, निंदा , ईर्षा काही व्यक्त करू शकतात. त्यांना आता त्यांच्या मनाला वाटणाऱ्या भावनांचा आधार घेऊनच मला त्यांना कविता लिहायला सांगायला हवे. हेच त्यांना अगदी उत्तम रित्या जमतंय.
त्यांचं लिखाण तर सुंदर आहेच. पण सोबतच त्यांचं अक्षरही देखील अतिशय सुरेख आहे. पण, एकच क्षण हे अक्षर ह्या आधी मी कुठे तरी पहिल्या सारखं वाटतंय. पण कुठे? आठवत नाही.
अचानक मला काही तरी आठवले आणि मी जागेवरून उठून, मागे मला सापडलेला तो कागद हातात घेतला आणि राजकुमारींच्या कवितांच्या बाजूला ठेवला. समोरचं दृश्य बघून मी अगदी थक्क झालो.
ह्याचाच अर्थ ह्या दोन ओळी राजकुमारींनी लिहिलेल्या आहेत? माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे. पण हे दोन्ही लिखाण अगदी सारखे आहेत. आणि ह्यातील भाव व्यक्त करणारी पद्धत देखील सारखीच आहे. जी राजकुमारींचीच आहे. पण त्यांनी असं का केलं असावं?
मी राजकुमारींच्या कवितांचे इतर कागद घेऊन खिडकीत बसलो. त्यांनी केलेल्या त्या कृती बद्दल मी विचार करू लागलो. त्या राजकुमारी आहेत. त्यांना माझे कौतुक करायचे असते तर त्या माझ्या समोर करू शकत होत्या. मग त्यांनी असं का केलं असावं? नक्की त्यांच्या मनात आहे तरी काय?
विचार करत करत मी राजकुमारींची पुढील कविता वाचू लागलो.
" आगमन आज त्यांचे महाली झाले,
त्यांच्या रूपाने अंगणी सुख आले."
त्यांच्या रूपाने अंगणी सुख आले."
किती सुरेख, पण हे कधी आणि कोणासाठी असावे?
" कविता त्यांची सुरेख किती, मन मोहून जाई,
प्रत्येक क्षणी वेडे मन हे माझे, वाट त्यांची पाही."
प्रत्येक क्षणी वेडे मन हे माझे, वाट त्यांची पाही."
कविता? मी? नाही... नाही... आणखीन कोणी तरी कविता करत असावे महालात. तेव्हा माझी नजर वर लिहिलेल्या दिनांकाकडे गेली. हे तर तेच दिनांक आहे ज्या दिवशी मी महाराजांसमोर माझी कविता सादर केली होती.
त्यांच्या कवितांबद्दल विचार करत मी बाहेर नभात दिसणाऱ्या पूर्ण चंद्राकडे पाहत विचार करू लागलो.
" चंद्रात ही दिसते सखे मज प्रतिबिंब तुझे,
तुझ्या शिवाय मनाला ना आवडे कोणी दुजे."
तुझ्या शिवाय मनाला ना आवडे कोणी दुजे."
त्या सुंदर चंद्राकडे बघताना माझ्या मनाने आपसुक तयार केली ती का आणि कोणासाठी माझे मलाच कळले नाही.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा