दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग २८
वेदांश
२०१५ चा काळ मुंबई.
" वेदु, काय रे... आज इतका वेळ फोन घेऊन बसलास? कोणाशी खास बोलत आहेस की काय? चेहऱ्यावर इतकं गोड हसू आलंय ते?"
आई हसत मला चिडवत म्हणाली.
आई हसत मला चिडवत म्हणाली.
आईच्या बोलण्याने मी भानावर आलो. अदिती सोबत बोलून मी सहज तिचा विचार करत बसलो होतो. विचार करता करता कधी माझ्या चेहऱ्यावर हसू फुलले माझे मलाच कळले नाही. पण, आमच्या मोतोश्रीने ते लगेच ओळखले.
" नाही गं आई ते ऑफिस मधल्या एका मित्रा सोबत बोलताना ऑफिसची गोष्ट आठवली आणि हसायला आलं. बरं आई उद्या संध्याकाळी मी जरा बाहेर जाणार आहे हा."
मी आईला उद्याबद्दल सांगितले.
मी आईला उद्याबद्दल सांगितले.
" बाहेर म्हणजे कुठे रे? आणि कश्यासाठी?"
आईने नेहमी सारखे प्रश्न विचारले. तिला नेहमी सगळं माहित असायला हवं असतं आणि मला देखील तिला सगळं सांगितल्या शिवाय राहवत नाही.
आईने नेहमी सारखे प्रश्न विचारले. तिला नेहमी सगळं माहित असायला हवं असतं आणि मला देखील तिला सगळं सांगितल्या शिवाय राहवत नाही.
" गोरेगावला जाणार आहे. कॅफे मध्ये एका फ्रेंडला भेटायला."
मी आईला सांगितले.
मी आईला सांगितले.
" फ्रेंड तो आहे की, ती रे? आणि कॅफे कशाला घरी बोलाव की मी पण भेटीन तुझ्या फ्रेंडला."
आई मस्करीत म्हणाली.
आई मस्करीत म्हणाली.
" अदिती सावंत, नाव आहे तिचं मातोश्री. आणि इतकी काही खास भेट नाही घरी आणायला. ती पुरातन साहित्याचा अभ्यास करते. तर मागे तिने माझ्या कविता वाचल्या आणि पुस्तकातून माझा इमेल आयडी घेऊन मला अभ्यासानिम्मित भेटण्यासाठी विचारले. म्हणून जातो आहे. आणखीन काही प्रश्न आहेत का तुमचे मातोश्री?"
मी देखील आईला सगळी सविस्तर माहिती देऊन मस्करीत विचारले.
मी देखील आईला सगळी सविस्तर माहिती देऊन मस्करीत विचारले.
" बरं बरं, ये जाऊन मग तू. आणि इतका वेळ फोनमध्ये तिच्याशीच बोलत होतास ना? मला माहित आहे आई आहे मी तुझी. मित्रांसोबत बोलताना आणि मैत्रिणी सोबत बोलतानाचे माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरचे हसू मला ओळखता येते बरं का कवी महाशय."
आई उठून काम करण्यासाठी किचनमध्ये जाताना हसत हसत बोलून गेली.
आई उठून काम करण्यासाठी किचनमध्ये जाताना हसत हसत बोलून गेली.
तिच्या त्या बोलण्याला माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते. मी स्मित करत गप्पच बसलो. आई आहे ती शेवटी. रात्रीचे जेवण वगैरे आवरून मी लवकर झोपलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी मला मित्राचा फोन आला. त्यांनी मिळून आज संध्याकाळी कुठे तरी बाहेर जाण्याचा प्लान केला होता. पण माझं आधीच दुसरं काही ठरलं असल्याचं सांगून त्याला नकार दिला.
उठून फ्रेश होऊन मी आज दिवसभर घरीच थांबायचं ठरवलं. पण, घरी थांबून संध्याकाळ पर्यंत करायचं काय? म्हणून माझं सगळं आवरून मी माझ्या स्टडी टेबलवर माझी वही घेऊन बसलो. काही तरी लिहिण्याचा विचार करू लागलो. विचार करता करता मला दिसले की, आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. म्हटलं मग त्या विषयीच लिहावं. मग घेतला पेन हातात आणि लिहायला सुरुवात केली.
शीर्षक :- जिजाऊंचा पुत्ररत्न
शिवनेरी किल्ल्यावर तेव्हा
गोड रडण्याचा आवाज आला
आनंद सर्वांच्या मनाला
पुत्ररत्न जिजाऊंना झाला
गोड रडण्याचा आवाज आला
आनंद सर्वांच्या मनाला
पुत्ररत्न जिजाऊंना झाला
रत्न होते मौल्यवान ते फार
करणार होते स्वप्न साकार
जिजाऊंच्या छत्रछाये खाली
स्वराज्याला देणार होते आकार
करणार होते स्वप्न साकार
जिजाऊंच्या छत्रछाये खाली
स्वराज्याला देणार होते आकार
शिवाई देवीच्या आशीर्वादाने
शिवाजी ठेवले पुत्ररत्नाचे नाव
नावाने त्या शत्रू थर थर कापे
आनंदले इथले प्रत्येक गाव
शिवाजी ठेवले पुत्ररत्नाचे नाव
नावाने त्या शत्रू थर थर कापे
आनंदले इथले प्रत्येक गाव
पोरकं होतं हे गाव सारं
वाहत होतं दुःखाचं वारं
सर्वनाश करायला राक्षसांचा
शिवशंभुनी घेतला अवतार
वाहत होतं दुःखाचं वारं
सर्वनाश करायला राक्षसांचा
शिवशंभुनी घेतला अवतार
महाराजांची किर्ती अपरंपार
गात असे शत्रू त्यांचे गुणगान
असा शूर जन्माला ह्या भूवरी
गाजवला त्यांनी हिंदवी स्वाभिमान
गात असे शत्रू त्यांचे गुणगान
असा शूर जन्माला ह्या भूवरी
गाजवला त्यांनी हिंदवी स्वाभिमान
(कवी : चेतन सुरेश सकपाळ)
काही चुकलं असेल तर क्षमा असावी महाराज. कविता पूर्ण करून स्वतःचीच कविता वाचण्याचा हा आनंदच वेगळा असतो. पुन्हा पुन्हा ती कविता वाचून मग मी वही बाजूला ठेवून जेवायला गेलो. डोक्यात आता फक्त संध्याकाळचे विचार सुरू होते.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा