दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग २९
शाश्वतवर्ण
१६५० चा काळ.
आजपासून राजकुमारींच्या शिकवणीचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. आज त्यांना मी या दोन ओळींबद्दल विचारू का? या ओळी नक्कीच त्यांनी लिहिलेल्या ओळी आहेत. कारण कोणा दोन व्यक्तींचे अक्षर इतके सारखे असूच शकत नाही. त्यांनी असे का आणि कशासाठी लिहिले असेल? त्यांना आज विचारू का? पण, त्या राजकुमारी आहेत आणि मी एक साधा राजकवी. माझं असं त्यांना जाब विचारानं बरोबर नाही दिसत.
सेवक मघाशीच येऊन राजकुमारींनी शिकवणी कक्षात बोलावल्याची वर्दी देऊन गेला. मीच त्याला थोड्या वेळाने तिथे पोहोचतो असं सांगून परत पाठवलं. माझ्या मनात काय घालमेल चालू आहे, ते माझे मलाच समजत नाही. नक्की त्यांच्या मनात आहे तरी काय? आणि माझ्या ही मनात अशी अस्वस्थता का वाटत आहे? हे सगळं आता तिथे त्यांच्या समोर गेल्यावरच समजेल.
विचार करत करतच मी शिकवणी कक्षाकडे जाण्यासाठी निघालो. जास्त उशीर करून चालणार नव्हतं. आत्तापर्यंत राजकुमारी तिथे पोहोचल्या देखील असतील. मी इतक्या उशिरा जात आहे हे बरोबर नाही वाटत. मी झपाझप पाऊले टाकत त्यांच्या कक्षाजवळ पोहोचलो.
मला आज इथे काही तरी बदल जाणवत आहे. आज या कक्षा बाहेर मला नेहमी सारखे सैनिक दिसत नाही आहेत. मी सरळ कक्षात प्रवेश केला. आत जाताच मला समोरच्या खिडकी जवळ जिथे पहिल्या दिवशी मी उभा होतो तिथेच आज राजकुमारी पाठमोऱ्या उभ्या दिसल्या.
सकाळची कोवळी किरणे त्यांच्या कायेवर पडली होती. त्यामुळे त्यांची गोरीपान सुंदर काया अगदी सोन्यासारखी उजळून निघाली होती. त्यांचे मोकळे लांब सडक केस देखील त्या प्रकाशाने अतिशय सुंदर आकर्षक दिसत होते. ते केस माझं मन मोहित करत होते.
कक्षात प्रवेश करताच मला एक मन मोहून टाकणारा सुगंध आला. त्या सुगंधाने आणि समोर दिसणाऱ्या राजकुमारींच्या त्या पाठमोऱ्या आकृतीने माझे मन अगदी मोहून गेले.
वाह...
"मोकळ्या कुंतलांचा सुगंध वेड लावे मनाला,
तेजस्वी काया लाजवे आकाशातल्या सूर्याला."
तेजस्वी काया लाजवे आकाशातल्या सूर्याला."
त्या प्रसन्न वातावरणात कधी माझ्या मुखातून या दोन ओळी बाहेर पडल्या माझे मलाच कळले नाही. माझ्या ते लक्षात येताच मी लगेच कपाळावर हात मारला.
माझा आवाज ऐकून त्या हळूच मागे फिरल्या. ती सूर्याची किरणे थेट त्यांच्या सुंदर चेहऱ्यावर पडल्यामुळे त्या आणखीच सुंदर दिसत होत्या. त्यांच्या ओठांवर एक गोड स्मित होते. माझी नजर थेट त्यांच्या चेहऱ्यावर खिळली.
त्या हळू हळू पावले टाकत माझ्या दिशेला येऊ लागल्या. त्या चालताना त्यांच्या पायातील पैंजणांच्या आवाजाने माझी तंद्री भंग झाली. मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्या पावलांकडे पाहू लागलो. आणि तो पैंजणांचा मधुर स्वर अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकू लागलो.
हा तोच आवाज आहे... नक्कीच. त्या दिवशी माझ्या कानावर पडला तो हा तोच आवाज आहे. म्हणजे राजकुमारीच?
" येता येताच तुम्ही काय कविता केलीत कविराज, मला पुन्हा ऐकायची आहे."
माझ्या जवळ येऊन राजकुमारी म्हणाल्या.
माझ्या जवळ येऊन राजकुमारी म्हणाल्या.
त्या माझ्या जवळ येताच मी भानावर आलो. नेहमी पेक्षा आज त्या जरा जास्तच सुंदर दिसत होत्या. मी माझ्या डोळ्यांना त्यांना पाहण्यापासून थांबवू शकत नव्हतो. माझ्या मनाची इच्छा ही होत नव्हती. माझे डोळे माझ्या ऐकण्या पलीकडे जात होते.
" माफी असावी राजकुमारी, ते अगदी सहज माझ्या नकळत माझ्या मुखातून बाहेर पडल्या त्या ओळी."
मी त्यांची माफी मागू लागलो.
मी त्यांची माफी मागू लागलो.
" अहो, माफी कसली मागताय? सौंदर्याची खरी प्रशंसा एका कवी शिवाय आणखीन चांगल्या रीतीने कोण करू शकतं ना... मला पुन्हा त्या ओळी ऐकायला आवडतील."
राजकुमारी स्मित करत माझ्या जवळ येऊन त्यांच्या मधुर आवाजात मला म्हणाल्या.
राजकुमारी स्मित करत माझ्या जवळ येऊन त्यांच्या मधुर आवाजात मला म्हणाल्या.
"मोकळ्या कुंतलांचा सुगंध वेड लावे मनाला,
तेजस्वी काया लाजवे आकाशातल्या सूर्याला."
तेजस्वी काया लाजवे आकाशातल्या सूर्याला."
"आज तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय राजकुमारी."
मला मोह आवरला नाही मी लगेचच पाहिल्या पासून माझ्या मनात जे चालले होते ते त्यांना सांगून टाकले.
मला मोह आवरला नाही मी लगेचच पाहिल्या पासून माझ्या मनात जे चालले होते ते त्यांना सांगून टाकले.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा