दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग ३०
अदिती
२०१५ चा काळ मुंबई.
बघता बघता शेवटी आजचा दिवस उजाडला. डोळे उघडताच मला सर्वात आधी कवी वेदांश सोबतच्या भेटीची आठवण झाली. ते आठवताच आपसुक चेहऱ्यावर स्मित उमटले. हे मला काय होतंय? हे कसले विचार? कसला आनंद?
मी तर त्यांना आज फक्त अभ्यासानिमित्त भेटणार आहे. पण, एखाद्या मुलाला मी अशी पहिल्यांदाच भेटणार आहे. ते ही मीच त्यांना समोरून भेटीसाठी विचारलं. माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही. ते देखील बरे लगेच तयार झाले भेटायला. पण, त्यांची तरी काय चूक? ते मला मदत करायच्या हेतूनेच भेटत आहेत. स्वभाव चांगला आहे त्यांचा.
अंथरुणात पडून विचार करत असतानाच बाहेरून आईची हाक ऐकू आली आणि माझं विचार चक्र थांबलं. चला राजकुमारी साहिबा उठा नाही तर महाराणी स्वतः आपणास उठवायला येईल. मी स्वतःशीच हसले.
अंथरुणातून उठून मी रूमच्या बाहेर निघाले. आज दिवसभर मला कुठेच जाण्याची काहीच करण्याची इच्छा नव्हती. सरळ संध्याकाळी फ्रेश प्रसन्न मनाने वेदांशची भेट घ्यायची होती.
" काय गं? त्या आकाशला आज पिक्चरसाठी का नाही म्हणालीस? त्याने आधीपासून तिकीट काढून ठेवले होते. इतकं काय महत्वाचं काम आहे तुला?"
रूमच्या बाहेर येताच बाबा कामाला गेले असल्यामुळे आईने मला प्रश्न केला.
रूमच्या बाहेर येताच बाबा कामाला गेले असल्यामुळे आईने मला प्रश्न केला.
" माझ्या प्रोजेक्टच काम आहे कॉलेजच. आणि मला नाही आवडत त्याच्यासोबत. तरी तुला वाटतच असेल तर मी एकदा तुझ्या वतीने बाबांना ह्या बद्दल बोलून बघते. ते जर हो म्हणत असतील तर बघू मग."
मी मुद्दाम बाबांचे नाव घेतले त्यामुळे ती पुढे काही न बोलता आत निघून गेली.
मी मुद्दाम बाबांचे नाव घेतले त्यामुळे ती पुढे काही न बोलता आत निघून गेली.
मी माझी सगळी तयारी आटपून माझी वही हातात घेऊन त्यांना विचारण्यासाठी काही प्रश्न तयार करू लागले. सोबतच इतर माहिती मिळवण्यासाठी मी कॉम्प्युटर चालू करून, त्यामध्ये गुगल ओपन केले.
त्यांना जास्त करून मला साहित्या विषयीच प्रश्न विचारायला हवे. की, त्यांना ह्या कविता कशा? कशावरून सुचत असाव्यात? त्यांच्या वाचनात असलेली पुस्तके कोणती? ऐतिहासिक त्यांनी काही वाचले आहे का? जर वाचले असेल तर, काय वाचले ज्याने कविता लिहायला त्यांना मदत मिळते?
असे काही प्रश्न वहीत लिहून मी कॉम्प्युटरकडे वळले. गुगलवर मी साहित्यिक सोबत ऐतिहासिक जोड असलेली ठिकाणे, माहिती शोधू लागले. जिथे जाऊन मला आणखीन खोलात जाऊन त्याची माहिती घेता आली असती. पण बराच वेळ शोध घेऊन ही काही मनासारखं सापडत नव्हतं.
वैतागून एक शेवटचा प्रयत्न म्हणून ' ऐतिहासिक साहित्याचा वारसा असलेली ठिकाणे किंवा माणसे ' असं सर्च केलं. तिथे थोडं खाली जाऊन मला एक वेबसाईट दिसली. उत्सुकतेपोटी मी त्या वेबसाइटवर क्लिक करून ती ओपन केली.
ती वेबसाईट ओपन करताच तिथे मला राजा भीमराजांच्या काळातील त्यांच्या आणि त्यांच्या राजकुमारी सुलेखा ह्यांच्या कवितांच्या आवडीबद्दल समजले. वरचा काही भाग वाचून मी आपसुक त्यात रमून गेले. त्यातील महत्वाचे भाग मी माझ्या वहीत लिहून घेतले. रायगड जिल्ह्यातील त्यांचं राज्य होतं. मला आता माझ्या प्रोजेक्टसाठी माझ्या मनासारखा विषय मिळाला होता.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा