दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग ३२
वेदांश
२०१५ चा काळ मुंबई.
बघता बघता दिवस कसा तरी सरला. संध्याकाळच्या पाच वाजता मी तयारीला लागलो. दुपारीच तिला फेसबुकवर मॅसेज करून भेटायचं पुन्हा एकदा नक्की करून घेतलं. तिचाच समोरून मॅसेज आला होता. ती बहुतेक कॉम्प्युटर वरून फेसबुक वापरत होती. म्हणून असं मोजक्याच वेळी ती ऑनलाईन येते होती. आम्ही अजूनही एकमेकांचे फोन नंबर घेतले नव्हते. समोरून नंबर मागायला ही बरोबर वाटत नाही. ती लाल रंगाचा ड्रेस घालणार आहे असे म्हणाली. मी काळया रंगाचा शर्ट घालणार असल्याचं तिला सांगितले. ही अशा प्रकारे आमची तिथे ओळख पटणार आहे. विचार करून माझेच मला हसायला आले. ह्या आधी असे कधीच घडले नव्हते.
पुढच्या पंधरा मिनिटांत माझी तयारी आटोपली. मग आईचा निरोप घेऊन मी घरा बाहेर पडलो. निघताना देखील आईचं तेच म्हणणं होतं की, तिला घरी घेऊन ये. शेवटी मी तिला बघतो म्हणून सांगितलं आणि निघालो. माझी आई आहे ती ऐकते कसली. आज पहिल्यांदाच मी अदितीला भेटतोय ते पण कामानिमित्त आणि आत्ताच तिला घरी चल म्हणून कसं म्हणू? आई पण ना खरंच ग्रेट आहे.
आईचा निरोप घेऊन मी बिल्डिंग खाली उतरलो. सोबत एक बॅग घेतली त्यात माझ्या कवितांची पुस्तके घेतली. खाली येऊन बाईक चालू करून मी गोरेगावच्या दिशेला निघालो.
काय माहित का, पण मनात एक वेगळाच आनंद वाटत होता. असा आनंद ह्या आधी मला कधीच जाणवला नव्हता. आणि हा आनंद नक्की आहे तरी कसला? हे ही मला कळत नव्हतं. मी सध्या तरी प्रवाहासोबत वाहत जायचं ठरवलं.
संध्याकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर बरंच ट्रॅफिक लागलं. मला ह्याचा अंदाज होताच म्हणून मी थोडा लवकरच निघालो. बरोबर सहाला मला त्या कॅफे जवळ पोहोचायचं आहे. उगाच उशीर झाला तर मॅडम येऊन जायला नकोत. आधीच फोन करायला नंबर देखील नाही.
मी बोरिवली पूर्वेला राहायला आणि ते कॅफे गोरेगाव पश्चिमेला होते. मग ट्रॅफिक असले तरी मी मला माहित असलेल्या रस्त्यावरून बरोबर ट्राफिकला टाळून दहा मिनिटे अगोदरच तिथे पोहोचलो.
तिथे पोहोचून मी आधी हातातील घड्याळात वेळ बघितली. सहाला अजून दहा मिनिटे बाकी होती. मी कॅफे बाहेर जागा असलेल्या ठिकाणी बाईक उभी केली आणि आधी आत जाऊन ती आली आहे का बघितलं. पण तिने सांगितल्या सारखे लाल रंगाचा ड्रेस घातलेलं मला कोणीच दिसले नाही. कॅफेच्या बाहेर देखील संपूर्ण परिसर शांत आणि कमी गर्दीचा होता. एका बुक कॅफे साठी अगदी योग्य जागा होती ती.
कॅफेला वर आणखीन एक मजला देखील होता. खाली सर्वत्र बघून झाल्यावर मी वरच्या मजल्यावर बघण्यासाठी वर जाऊ लागलो. खाली सर्वत्र छान टेबल मांडले होते आणि एका बाजूला सुंदर रित्या बरीच पुस्तके मांडली होती. काही लोकं छान कॉफीचा आस्वाद घेत पुस्तक वाचनाचा आनंद घेत होते.
वरच्या मजला ओपन टेरेस सारखा होता. इथे पुस्तके नव्हती पण इथे गप्पा छान होऊ शकत होत्या असं मन प्रसन्न करणारं वातावरण होतं. वर पोहोचताच मागच्याच दिशेला समोर दूरवर मला मावळतीला जाणारा सूर्य दिसला. त्याने आकाशात सर्वत्र त्याच्या प्रकाशाची जादू पसरली होती. त्या एका नजरेतच मी त्या दृश्याच्या प्रेमात पडलो. मी तसाच पुढे चालू लागलो. आजूबाजूचे मला कसलेच भान राहिले नाही.
" कवी वेदांश...?"
मी भान हरपून ते दृश्य पाहत असताना मागून माझ्या कानावर माझ्या नावाची गोड हाक ऐकू आली आणि मी भानावर येऊन मागे वळून पाहिले.
मी भान हरपून ते दृश्य पाहत असताना मागून माझ्या कानावर माझ्या नावाची गोड हाक ऐकू आली आणि मी भानावर येऊन मागे वळून पाहिले.
त्या मावळतीच्या सूर्य प्रकाशात एक सुंदर चमकणार चेहरा मला दिसला. ते मोकळे केस, सुंदर बोलके डोळे आणि ते गोड हसू बघताच क्षणी ते रूप मानत वसले. ह्या सौंदर्यासमोर तो सूर्यही लाजला असेल अशी काही तरी वेडी कल्पना माझ्या मनात आली.
" कवी वेदांश ना?"
माझे काही उत्तर आले नाही म्हणून तिने पुन्हा विचारले.
माझे काही उत्तर आले नाही म्हणून तिने पुन्हा विचारले.
" आ... हो, हाय मी वेदांश गुरु. तुम्ही अदिती सावंत?"
तिच्या प्रश्नाने भानावर येऊन मी उत्तर दिले. आणि तिने घातलेल्या त्या सुंदर लाल ड्रेसकडे माझं लक्ष गेलं आणि मी तिला प्रश्न केला. तो तिच्यावर अगदी शोभून दिसत होता.
तिच्या प्रश्नाने भानावर येऊन मी उत्तर दिले. आणि तिने घातलेल्या त्या सुंदर लाल ड्रेसकडे माझं लक्ष गेलं आणि मी तिला प्रश्न केला. तो तिच्यावर अगदी शोभून दिसत होता.
" हो हाय, मी अदिती सावंत."
तिने गोड स्मित करत उत्तर दिले.
तिने गोड स्मित करत उत्तर दिले.
" छान, या ना बसा."
बाजूला असलेल्या रिकामी टेबलच्या भोवती दोन खुर्च्यांवर आम्ही बसलो.
बाजूला असलेल्या रिकामी टेबलच्या भोवती दोन खुर्च्यांवर आम्ही बसलो.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा