दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग ३३
शाश्वतवर्ण
१६५० चा काळ.
आमच्या नकळत आम्ही एकमेकांचे हात हातात घेतले. हातात हात घेऊन मी प्रेमाने त्यांच्या नजरेत पाहू लागलो. त्यांच्या नजरेत देखील मला तीच आपुलकी दिसत होती. मी आपले भान हरपून त्यांच्या सुंदर खोल नजरेत हरवून गेलो. मला माझे भानच उरले नाही. राजकुमारींच्या स्पर्शाने माझ्या संपूर्ण अंगावर शहारे आले.
दोघे ही एकमेकांसोबत नजरेने बोलू लागलो. ही नजरेची भाषा माझ्यासाठी अपरिचित होती. मला काहीच समजत नव्हते. मला हे काय होत आहे मला काही कळत नाही. संपूर्ण जग माझ्यासाठी थांबलं होतं. ह्या मंद शांती पहाटे माझ्या हृदयाचे ठोके मला स्पष्टपणे ऐकू येऊ लागले. हे जग, वेळ माझ्यासाठी थांबली होती.
काय जादू आहे त्यांच्या नजरेत की त्यात पाहताच मी माझे भान हरपून बसलो. हळू हळू त्यांच्या मनातलं मला स्पष्टपणे त्यांच्या डोळ्यात दिसू लागलं. आम्ही दोघे हळू हळू एकमेकांच्या आणखीन जवळ आलो.
राजकुमारींचे सुंदर डोळे मी आणखीन जवळून बघू लागलो. त्यांचे डोळे काळे नसून तपकिरी रंगाचे होते. ते त्यांच्या सौंदर्याला अगदी शोभून दिसत होते. त्यांच्या त्या सुंदर मनमोहक नजरेची जादू माझ्या रोमारोमात माझ्या मनाच्या खोल अंतरंगात पसरली होती. दोघांच्याही मुखातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. किंबहुना दोघांची बोलण्याची इच्छा देखील नव्हती. त्यांच्या नजरेत मला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती.
त्यांनी माझ्या नजरेत बघत हळूच माझ्या हातातील हात सोडला आणि माझ्या दोन्ही खांद्यावर ठेवला. मी माझे दोन्ही हात त्यांच्या कंबरेवर ठेवले. माझे हात त्यांच्या साडीच्या आत त्यांच्या कंबरेला स्पर्श होताच त्यांचे संपूर्ण अंग शहारल्याचे मला जाणवले आणि त्या माझ्या आणखीन जवळ आल्या. आणि त्यांनी लाजून त्यांचे कान माझ्या छातीवर टेकवले.
माझ्या हृदयाचे ठोके आणखीनच वाढू लागले. इथे नक्की काय चालू आहे मला काहीच समजेना झाले. मी हळूच माझे हात त्यांच्या कंबरेवरून सरकवत त्यांच्या पाठीवर पसरलेल्या केसांवर ठेवले. त्या आता हळूच माझ्या बाहुपाशात सामावल्या. मी त्यांच्या मनमोहक सुगंधात वाहून गेलो. त्या शांत माझ्या हृदयाला कान लावून माझ्या हृदयाचे ठोके ऐकत होत्या. माझ्या हृदयाच्या ठोक्यांवर आता कसलाच ताबा राहिला नव्हता.
माझे डोके मी हळूच त्यांच्या डोक्यावर टेकवले आणि हळुवारपणे त्यांच्या सुंदर मोकळ्या केसांमधून हात फिरवू लागलो. त्यांच्या केसांचा मन मोहून टाकणारा सुगंध डोळे मिटून अनुभवू लागलो.
" कविराज मला तुम्ही खूप आवडता."
बऱ्याच वेळानंतर त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि शांततात भंग झाली.
बऱ्याच वेळानंतर त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि शांततात भंग झाली.
त्यांचे ते शब्द ऐकून मी भानावर आलो. आणि लगेच डोळे उघडून पाहिलं. मला घडलेल्या घटनेची जाणीव झाली. मी लगेच त्यांच्या पाठीवरचा हात काढून मागे सरकलो.
माझ्या अशा कृत्यामुळे त्या देखील भानावर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित मावळले. डोळ्यांमध्ये अश्रू तरळून आले. त्या चेहऱ्यावर निराशजनक भाव आणत माझ्याकडे पाहू लागल्या. काय बोलावे त्यांना समजत नव्हते.
" राजकुमारी..."
मला ही पुढे काय बोलावे समजत नव्हते.
मला ही पुढे काय बोलावे समजत नव्हते.
" माफ करा राजकुमारी."
काही तरी बोलायचं म्हणून मी आधी त्यांची माफी मागितली.
काही तरी बोलायचं म्हणून मी आधी त्यांची माफी मागितली.
काही न बोलता त्या तश्याच मागे फिरल्या आणि चालत खिडकी जवळ जाऊन बाहेर बघत पाठमोऱ्या उभ्या राहिल्या.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा