दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग ३५
सुलेखा
१६५० चा काळ.
" राजकुमारी..."
त्यांच्या हाकेने मी भानावर आले.
त्यांच्या हाकेने मी भानावर आले.
ते माझ्यापासून काही अंतर दूर सरकले होते. माझा चेहरा उदासीन झाला. डोळ्यांमध्ये अश्रू तरळून आले. माझ्या मुखातून आता एकही शब्द बाहेर पडणार नव्हता. हे माझ्या तोंडून काय बाहेर पडलं? मी सरळ त्यांना आपल्या मनातली गोष्ट सांगून टाकली होती.
सगळ्या विचारांनी माझं डोकं सुन्न झालं. मी तशीच मागे फिरून खिडकी जवळ आली. खिडकी जवळ येऊन त्यांच्याकडे पाठ करून उभी राहिली. बाहेर बघताना माझ्या डोळ्यांमधून घळाघळा अश्रू वाहू लागले. हे मी काय करून बसले होते? त्यांना माझ्या बद्दल काय वाटलं असेल? खरंच वेडी आहे मी. त्यांच्याशी नजर मिळवायची देखील माझी हिंमत होत नाही आहे.
पण मी काहीच चुकीचं नाही बोलले. त्यांनी पण तर मला त्यांच्या जवळ घेतले. प्रेमाने केसांवर हात फिरवला. त्यांच्या मनात देखील मला त्याचं भावना जाणवल्या. मला काहीच सुचत नाही आहे. डोक्यात किती तरी विचारांच चक्र सुरू आहे.
" राजकुमारी..."
मी विचार करत असताना त्यांनी माझ्या शेजारी येऊन मला पुन्हा त्या मधुर आवाजात हाक मारली.
मी विचार करत असताना त्यांनी माझ्या शेजारी येऊन मला पुन्हा त्या मधुर आवाजात हाक मारली.
मी त्यांच्यापासून नजर चोरून उभी राहिले, काहीच बोलले नाही. खरं तर काय बोलावे हे मला समजतच नव्हते.
" तुम्ही चिडलात का?"
त्यांनी हळूच मला प्रश्न केला.
त्यांनी हळूच मला प्रश्न केला.
मी पुन्हा काही न बोलता फक्त नकारार्थी मान हलवली. त्यांना त्यांचे उत्तर मिळाले होते. आणि त्यांच्या बोलण्याने मला ही हळू हळू धीर येत होता.
" तुम्ही म्हणालात ते...?"
त्यांचा प्रश्न अर्धाच राहिला. पण त्यांना काय विचारायचे आहे हे मला समजले.
त्यांचा प्रश्न अर्धाच राहिला. पण त्यांना काय विचारायचे आहे हे मला समजले.
" हो कविराज ते खरे आहे. आणि हे आज काल नाही तर तुम्ही इथे आल्यापासून आहे. तुम्ही इथे आलात तुमच्या कविता सादर केल्यात अगदी त्याच क्षणापासून मी तुमच्या कविता ऐकत आहे. तुमच्या कविता सादरीकरणाचा एक ही दिवस मी सोडला नाही. तुमच्या कविता, सादरीकरणाची पद्धत, तुमची मधुर वाणी मला मात्रमुग्ध करते. तुम्हाला ऐकता ऐकता मी कधी तुमच्या प्रेमात पडले माझे मलाच समजले नाही. हळू हळू तुम्ही मला आवडू लागलात. म्हणून त्या दिवशी मीच त्या दोन ओळी तुमच्यासाठी लिहून तुम्हाला दिल्या होत्या. तेवढेच नाही तर माझ्या कवितांमध्ये देखील मी आणखीन काही कविता तुमच्यासाठी लिहिल्या आहेत. ज्या तुम्ही काल रात्री खिडकीत बसून वाचल्याचं असतील..."
मी बोलायला लागल्यावर मला स्वतःला थांबवणे कठीण झाले.
मी बोलायला लागल्यावर मला स्वतःला थांबवणे कठीण झाले.
वाटलं हीच संधी आहे. त्यांना मनातलं सगळं सांगून टाकावं. ते मात्र माझ्याकडे एकटक पाहत राहिले. बहुतेक ते इतकं सगळं एकत्र ऐकून चक्रावून गेले असणार.
" काल रात्री...?"
ते इतकंच म्हणून थांबले.
ते इतकंच म्हणून थांबले.
" हो कविराज माझ्या कक्षाच्या खिडकीतून तुमचे घर मला स्पष्ट दिसते. आणि कालच नाही, तर तुम्ही आल्यापासून मी प्रत्येक रात्र झोपण्याआधी नयनांना तुमचे दर्शन घडवून देत असे. त्यात मला अनामिक सुख लाभत होते ज्याची माहिती मलाच स्वतःला माहीत नव्हती."
मी कवींना म्हणाले.
मी कवींना म्हणाले.
" पण राजकुमारी... तुम्ही या राज्याच्या राजकुमारी आहात आणि मी एक साधा कवी... हे कसं शक्य आहे?"
त्यांनी गोंधळून मला प्रश्न विचारला.
त्यांनी गोंधळून मला प्रश्न विचारला.
ते एकत्र माझं हे सगळं बोलणं ऐकून गोंधळून गेले होते. काय बोलावे त्यांना समजत नव्हते. ते फक्त शांत उभे राहून माझ्याकडे पाहत माझे बोलणे ऐकत होते. त्यांच्या मनात काय आहे हे सांगण्याआधी त्यांनी मूळ मुद्द्याला हात घातला. मला आधी त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचे होते.
" मला तुमच्या मनातली गोष्ट जाणून घ्यायची आहे कविराज... तुम्हाला पण मी आवडते का?"
मी थेट त्यांना मला उत्तर हवे असलेला प्रश्न विचारला. ते काही न बोलता तशीच मान वळवून खिडकीतून बाहेरच्या दिशेला पाहू लागले.
मी थेट त्यांना मला उत्तर हवे असलेला प्रश्न विचारला. ते काही न बोलता तशीच मान वळवून खिडकीतून बाहेरच्या दिशेला पाहू लागले.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा