दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग ३६
वेदांश
२०१५ चा काळ मुंबई.
आमची ओळख पटल्यावर आम्ही खुर्च्यांवर बसलो. खुर्चीवर बसताच तिने आपले लांब मोकळे केस हळूच पुढे एका बाजूला घेतले आणि ते बघून जणू माझे काळीजच थांबले. आह्... काय ते निखळ सौंदर्य. मी त्या सौंदर्यात पूर्णपणे हरवून गेलो.
" किती सुंदर दृश्य आहे नाही? खरंच मावळत असला तरी सूर्य त्याच्या किरणांनी संपूर्ण आसमंत उजळवून टाकतो. किती तरी रंगांच्या छटा उमटवतो. खरंच निसर्गाच्या सौंदर्याला तोड नाही."
मी तिला पाहत असताना माझ्या मागे दिसणाऱ्या सूर्यास्ताला पाहत ती म्हणाली.
मी तिला पाहत असताना माझ्या मागे दिसणाऱ्या सूर्यास्ताला पाहत ती म्हणाली.
" हो ना खरंच पण काही सौंदर्य असे असते की ज्या पुढे निसर्गाचे सौंदर्य देखील फिके वाटते."
हे मी तिला पाहत तिच्यासाठी म्हणालो.
हे मी तिला पाहत तिच्यासाठी म्हणालो.
खरं तर तिला पाहिल्यापासून मी मगाशी पाहिलेले सूर्यास्ताचे दृश्य विसरूनच गेलो. तिच्या सौंदर्याने मला इतकं प्रभावित केलं. माझं बोलणं हे तिच्यासाठी होतं, हे तिला कळलं असावं बहुतेक ती काहीशी लाजली.
इतक्यात वेटर आला आणि आमची कॉफीची ऑर्डर घेऊन गेला. मग सुरुवातीला आम्ही तिच्या शिक्षणाबद्दल माझं काम आणि लिखाणाबद्दल थोडीशी औपचारिक चर्चा केली. आजूबाजूचे वातावरण जरा खेळीमेळीचे झाले. आम्हाला एकमेकांसोबत जमवून घ्यायला फार वेळ लागला नाही. काही मिनिटांमध्येच आमची छान मैत्री झाली.
ती दिसायला सुंदर तर आहेच पण, बोलायला देखील गोड आणि डोक्याने हुशार आहे हे मला बोलताना जाणवले. तिला पहिल्यापासूनच मला तिच्या प्रति आपुलकीचे भाव जाणवू लागले. हे असं का होत आहे मला समजत नव्हतं. या आधी किती तरी मुलींना मी भेटलो बोललो. ऑफिस मध्ये देखील किती तरी मुली आहेत मैत्रिणी आहेत पण, कधी कोणा सोबत इतकं खास वाटलं नाही. हिच्यात काही तरी खास आहे खरंच...!
" हॅलो, सर कुठे हरवलात?"
मी विचार मग्न असताना तिच्या बोलण्याने मी भानावर आलो.
मी विचार मग्न असताना तिच्या बोलण्याने मी भानावर आलो.
" आ... नाही काही नाही विचार करत होतो तुमच्या प्रश्नांची काय उत्तरे द्यावीत. अजून पर्यंत असं कधी कवितेच्या बाबतीत अभ्यासात कोणाला मदत केली नव्हती. आणि मला सर नाही म्हणालात तरी चालेल. मी काही तुमचा कॉलेजचा प्रोफेसर नाही."
मी हसतच तिला म्हणालो.
मी हसतच तिला म्हणालो.
" बरं ठीक आहे पण एका अटीवर, तुम्ही ही मला अहो जाहो बोलू नका. मी काही इतकी मोठी नाही."
ती देखील मला हसत म्हणाली.
ती देखील मला हसत म्हणाली.
तिच्या म्हणण्याला मी हसत होकार दिला. मी सोबत आणलेल्या बॅगमधून माझ्या कवितांची पुस्तके तिला गिफ्ट म्हणून दिलीत. तिला माझ्या कविता आवडल्या होत्या त्यामुळे कोण जाणे का ? पण भेटायचं ठरलं तेव्हाच मी तिला हे द्यायचं ठरवलं होतं. तिला मी दिलेले गिफ्ट फार आवडलं. तिने माझे मनभरून आभार मानले. तिने माझ्यासाठी काही आणले नाही ह्याची तिला खंत देखील वाटली. पण त्याची काहीच गरज नाही असं मी तिला पटवून दिलं.
आमच्या गप्पा चालू असताना आम्ही ऑर्डर केलेली कॉफी आली. तेव्हा तिने बॅग मधून आपली वही बाहेर काढली. चेहऱ्यावर आलेली केसांची बट मागे केली आणि वहीत काही तरी पाहू लागली. मी पुन्हा तिच्याकडे तसाच पाहत राहिलो.
" मला सांगा तुम्हाला या कविता कश्या सुचतात? किंवा तुम्ही काय वाचन करता ज्याने तुम्हाला इतकं छान छान सुचतं?"
तिने मला प्रश्न केल्यावर मी पुन्हा भानावर आलो.
तिने मला प्रश्न केल्यावर मी पुन्हा भानावर आलो.
" असं काही खास नाही. पण ऐतिहासिक साहित्य वाचायला खूप आवडतात. त्यात मी जास्त रमतो. बहुतेक त्यामुळेच माझ्या लिखाणाला तसा टच येत असावा. तुझ्या प्रोजेक्टचा नक्की मुद्दा काय आहे? म्हणजे तुला अशी कवितांबद्दल माहिती घ्यायची आहे दुसरं काही?"
मी माझे उत्तर सांगून तिला पुढे प्रश्न केला.
मी माझे उत्तर सांगून तिला पुढे प्रश्न केला.
" नाही असं नाही, ऐतिहासिक साहित्य किंवा साहित्यिक असा विषय आहे. आणि त्या दिवशी तुमच्या कविता वाचून काय माहित का? पण तुमच्याकडून मला वाटलं की, मला काही तरी मदत मिळेल."
ती मला म्हणाली.
ती मला म्हणाली.
" अच्छा, छान विषय आहे. इतिहासात देखील साहित्याचे फार महत्त्व होते. मोठमोठे राजे महाराजे साहित्याचे शौकीन होते. मागे मी अश्याच एका राजाबद्दल थोडी माहिती वाचली होती. काय बरं त्यांचे नाव...? हा राजा भीमराज!"
मला माहित असलेली तिच्यासाठी उपयोगाची माहिती आठवून मी तिला सांगितली.
मला माहित असलेली तिच्यासाठी उपयोगाची माहिती आठवून मी तिला सांगितली.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा