Login

ओळखीचे शब्द...! | भाग ३८

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ३८

अदिती

२०१५ चा काळ मुंबई.

" राजा भीमराज."
त्यांच्या तोंडून हे नाव ऐकून मी चक्क झाले.

हल्लीच कुठे तरी मी हे नाव ऐकल्याचं किंवा वाचल्याचं मला जाणवलं, पण नक्की कुठे ते मला आठवत नव्हतं. मी माझ्या मेंदूवर आणखीन जोर दिला.

हा... काल गुगलवर मी त्यांच्याबद्दल काही माहिती वाचली होती. त्यांच्याबद्दल काही माहिती लिहून देखील घेतली होती. हा हीच ती माहिती. मी पाने पालटून पाहिले.

" हो, बरोबर तुम्ही म्हणताय ना हेच ते राजा भीमराज. मी कालच गुगलवर माहिती शोधत असताना त्याच्या विषयी वाचलं होतं. तुम्हाला आणखीन काय माहिती आहे त्यांच्याबद्दल?"
मी त्यांना विचारले.

त्यांनी माझ्याकडून वही घेऊन मी लिहिलेली माहिती वाचू लागले. ते वाचन करत असताना मी त्यांच्याकडे पाहू लागले. त्यांना पाहताना असं वाटत होतं की, मी त्यांना जन्मजन्मांपासून ओळखते. हे रूप हा सहवास अगदी ओळखीचा वाटतो आहे. त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द ओळखीचा वाटतो आहे.

काय असावं हे? मी जरा जास्तच विचार करते का? आमची ही भेट फक्त या प्रोजेक्ट पुरती आहे. अदिती मॅडम आवरा आपल्या मनाला. ते काही बरोबर दिशेला चाललेले नाही. पण काळया शर्ट मध्ये ते खरंच खूप छान दिसत आहेत. देवा हे काय आणि कसले विचार. आत्ताच म्हटलं आवर स्वतःला आणि लगेच हे असं?

" हो बरोबर, हेच ते राजा भीमराज. मी देखील ह्यांची थोडीफार माहिती वाचली आहे. हे कलेचे खूप शौकिन होते. त्यांच्या दरबारात बरेच कलाकार होते. ते त्यांना त्यांच्या कलेसाठी भरभरून कौतुक करून भरपूर भेट वस्तू देत होते."
त्यांनी वहीतून मान वर केली आणि बोलू लागले. त्यांच्या बोलण्याने मी भानावर आले.

" अ... हो ना, मी देखील काल त्यांची थोडीफार माहिती वाचली. मला वाटलं हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे माझ्या प्रोजेक्टसाठी. म्हणून मी विचार करतेय की, ह्यांचा दरबार जिथे आहे तिथे भेट घ्यावी आणि तिथे आणखीन काही माहिती मिळतेय का ते बघावं. मला माझ्यासाठी अगदी असाच विषय हवा होता आणि योगायोगाने मला तो मिळाला देखील."
मी त्यांना म्हणाले.

" इंटरेस्टिंग, तुझं मोठं काम झालं म्हणजे. त्यांचा दरबार रायगड जिल्ह्यात कुठे तरी असल्याचं मी वाचलं होतं. मी देखील खूप वेळा विचार केला होता तिथे जावं, पण असा कधी काही योगच जुळून आला नाही आणि सोबतीला देखील कोणी मिळालं नाही. मी देखील तुझ्या सोबत आलो तर चालेल का? म्हणजे तुला हरकत नसेल तर, तू तुझं प्रोजेक्टच काम कर. मी इतर माहिती गोळा करीन."
त्यांनी सरळ सरळ मला विचारलं.

त्यांच्या बोलण्याने मी स्तब्धच झाले. ही आमची नक्की पहिलीच भेट होती ना? मलाच समजत नव्हतं काय बोलावं. खरं तर मनातून आनंद झाला होता. त्यांच्या सोबत तिथे जायला मला आवडणारच होतं. आणि ते का ते माझ्या वेड्या मनालाच ठाऊक.

" आ... हो चालेल ना. मला काय हरकत असेल? उलट तुम्ही आलात तर मला मदतच होईल ना?"
मी त्यांना अजिबात विचार न कशी परवानगी दिली मलाच समजले नाही.

" हो नक्कीच, खूप दिवसांनी बाहेर कुठे तरी जायला मिळेल. बरेच दिवस कुठे बाहेर फिरायला गेलो नाही. पण कधी जायचं ठरवलं आहेस तू? म्हणजे कसं कधी कोणासोबत जाणार आहेस?"
त्यांनी मला पुढील प्रश्न विचारले.

" मी माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी सोबत मीनाक्षीसोबत जायचा विचार करत आहे. ती तिच्या प्रोजेक्टसाठी तिच्या मामाकडे जाणार तिथेच जाणार आहे. म्हणून म्हटलं तिथं पर्यंत तिच्यासोबत जाईन आणि मग पुढे माझी माझी मी त्या ठिकाणी जाऊन माहिती घेईन. तुम्ही ही आमच्या सोबत येऊ शकता. आम्ही बसने तिथे जाणार आहोत आणि ते ही उद्याच."
मी त्यांना म्हणाले.

खरं तर मीनाक्षीसोबत अजून माझं बोलणं झालं नव्हतं, पण मी त्यांना असं का म्हणाले समजले नाही. घरी जाऊन तिच्या सोबत बोलून घेईन ती अशी ही तिथे जाणारच आहे आणि मला काय ती नाही म्हणणार नाही. वाह अदिती अचानक अगदी छानच प्लॅन बनवलास.

" हो चालतंय मग मला बसचा वगैरे वेळ नक्की करून सांग तसा सकाळी लवकर बस डेपोला भेटून मी तुम्हाला. माझा नंबर घेऊन ठेव आपण मग फोनवरच कॉन्टॅक्ट करूया. तू पोहोच लवकर घरी. आता निघुयात, बघता बघता खूप वेळ झाला आपल्याला, पण छान झाली भेट छान वाटलं तुला भेटून."
ते स्मित करत मला म्हणाले.

आम्ही एकमेकांना आमचे फोन नंबर दिले आणि मग घरी जाण्यासाठी एकत्रच निघालो.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all