दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग ३९
सुलेखा
१६५० चा काळ.
" हृदयात सख्या तुझ्या, दडली काय अशी भावना?
आसुसले मन माझे ऐकण्यास एकदा तरी सांगना."
माझ्या मुखातून हे शब्द बाहेर पडताच ते माझ्याकडे पाहू लागले.
आसुसले मन माझे ऐकण्यास एकदा तरी सांगना."
माझ्या मुखातून हे शब्द बाहेर पडताच ते माझ्याकडे पाहू लागले.
माझ्या डोळ्यांच्या कडा अश्रूंनी ओलावल्या होत्या. आता माझ्या मुखातून एक ही शब्द बाहेर पडणार नव्हता. जर अजून पुढे काही बोलले तर मी नक्कीच रडणार हे मला माहीत होते. आणि माझ्याकडे बघून हे त्यांना देखील समजले. ते माझ्याकडे माझ्या डोळ्यांमध्ये आपुलकीने पाहू लागले. त्यांच्या धीट मनाने हार मानली होती. त्यांच्या मनात काय आहे, हे मला चांगलंच माहित होतं, पण मला ते त्यांच्या तोंडून ऐकायचं होतं.
मला हवे असलेले शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडणारच होते इतक्यात कोठून हा सेनापतीने कक्षात प्रवेश केला आणि महाराणींनी मला बोलावले असल्याचे सांगितले. त्याचा आवाज ऐकून माझ्या डोक्यात तिडीक गेली. तो इथे मुद्दामच आला होता हे मला समजले. महाराणींचा चमचा, हे दोघे मिळून मला नीट जगू ही देणार नाहीत. मी खिडकीकडे वळून आधी माझे डोळे पुसून घेतले.
" मी येते सेनापती तुम्ही चला पुढे."
मी त्याला आदेश दिला.
मी त्याला आदेश दिला.
" आ..."
" मी म्हटलं ना मी येत आहे सेनापती. तुम्ही या आता."
तो पुढे काही बोलणार इतक्यात मी त्याला अडवून म्हणाले.
तो पुढे काही बोलणार इतक्यात मी त्याला अडवून म्हणाले.
माझ्या बोलण्याने त्याला बहुतेक राग आला. कवी तिथे असल्यामुळे तो काही बोलू शकला नाही. तसंच गुरगुरत काही न बोलता बाहेर पाय आपटत निघून गेला.
" कविराज, आज रात्री मी बागेतील तलाव्या जवळ तुमची आणि तुमच्या उत्तराची वाट पाहीन. तुम्ही नाही आलात तर मी तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाही."
इतकं बोलून मी तिथून निघून कक्षाच्या बाहेर पडले. माझ्या बोलण्याचा विचार करत ते तिथेच थांबले.
इतकं बोलून मी तिथून निघून कक्षाच्या बाहेर पडले. माझ्या बोलण्याचा विचार करत ते तिथेच थांबले.
शिकवणी कक्षाच्या बाहेर पडून मी महाराणींच्या कक्षाच्या दिशेला चालू लागले. काय काम असावं त्यांचं माझ्याकडे? त्या माझ्या आई असल्यात तरी, त्यांनी नेहमी मला सावत्रपणाची जाणीव करून दिली होती.
मी लहान असताना आजारामुळे माझी आई मला सोडून गेली. त्या नंतर मला आईची माया मिळावी म्हणून महाराजांनी दुसरं लग्न केलं. सुरुवातीला महाराणी माझ्यावर प्रेम करत होत्या, पण मग राजकुमारांचा जन्म झाल्यावर त्यांची माया कमी झाली. त्या माझ्याशी नीट वागत नसत. म्हणून मी त्यांच्या समोर जाण्याचे त्यांना भेटण्याचे टाळते. वर तो सेनापती त्यांचे कान भरतो. त्यामुळे त्या माझा आणखीनच तिरस्कार करतात. त्यांच्या वागण्याबद्दल मी महाराजांना किती तरी वेळा सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांच्यासमोर त्या साळसूद पणाचा आव आणतात. म्हणून मी या इतक्या मोठ्या महालात ही एकटी पडली आहे. ह्यातच कवींच्या रूपाने माझ्या आयुष्यात प्रेम आले तर ते ही असे वागत आहेत. मी करू तरी काय?
विचार करता करता मी त्यांच्या कक्षाजवळ पोहोचले. मी आल्याचा त्यांच्या दासी ने त्यांना निरोप दिला. त्यांनी मला आत कक्षात बोलावून घेतले. आत जाताच मी त्यांना प्रणाम केला.
" या राजकुमारी, बसा."
त्यांनी मला बसायला सांगितले.
त्यांनी मला बसायला सांगितले.
" हो महाराणी, तुम्ही मला बोलावलंत? काही खास काम होते का?"
खुर्चीवर बसत मी त्यांना प्रश्न केला.
खुर्चीवर बसत मी त्यांना प्रश्न केला.
" हो, आम्ही ऐकलंय की, तुम्ही काल आलेल्या कवींकडून कवितेची शिकवणी घ्यायला सुरुवात केली आहे, हे खरे आहे का?"
त्यांनी मला प्रश्न केला
त्यांनी मला प्रश्न केला
" होय महाराणी, मला कवितांची आवड आहे म्हणून मी महाराजांच्या परवानगीने शिकवणीला सुरुवात केली आहे."
मी त्यांना म्हणाले.
मी त्यांना म्हणाले.
" हो, पण आम्ही सेनापती अंगेशला सांगून तुमच्यासाठी युद्ध प्रशिक्षण सुरुवात करायला सांगितले होते. ते देखील तुमच्यासाठी तितकेच महत्वाचे आहे. त्याची सुरुवात कधी करणार आहात?"
त्या म्हणाल्या.
त्या म्हणाल्या.
त्यांच्या बोलण्यावरून हे सगळं त्यांना कोणी सांगितले असेल हे मला लगेच समजले. मला प्रशिक्षण घ्यायला हरकत नव्हती, पण मला त्या सेनापती कडून काहीच शिकायचं नव्हतं.
" होय महाराणी, ते ही मी लवकरच सुरू करणार आहे. महाराजांना सांगून वस्ताद काकांसोबत बोलून मी त्यांच्याकडून शिकून घेईन. सुरुवातीपासून तेच मला सगळं शिकवत आहे."
मी स्पष्टपणे त्यांना माझे मत सांगितले.
मी स्पष्टपणे त्यांना माझे मत सांगितले.
" पण आम्ही सेनापतींना सांगून तुमच्या शिकवण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. तुम्ही त्यांच्याकडून शिकावं अशी आमची इच्छा आहे."
त्या काहीसा आवाज चढवून मला म्हणाल्या.
त्या काहीसा आवाज चढवून मला म्हणाल्या.
खरं तर मला त्यांच्या बोलण्याचा राग आला, पण मी काही बोलणार इतक्यात दरवाजात एक दासी महाराज त्यांच्या कक्षात येत असल्याचा निरोप घेऊन आली. मला मनोमन आनंद झाला.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा