दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग ४६
अदिती
२०१५ चा काळ मुंबई.
महालात पाय ठेवल्यापासून मला एकदम विचित्र वाटू लागलं. मी महालाच्या दारात उभी राहून संपूर्ण महाल पाहू लागले. कोण जाणे का? पण, ही जागा मला माझ्या ओळखीची वाटू लागली. मी इथे आधी ही आल्याचं मला जाणवू लागलं. पण, कसं शक्य आहे? मी तर इथे पहिल्यांदाच आली आहे. ह्या जागे बद्दलच मला दोन दिवस आधीच समजले आहे. मग मला असं का वाटतंय?
मी माझ्या तंद्रीत असताना वेदांश ह्यांच्या आवाजाने माझी तंद्री भंग झाली. त्यांच्या प्रश्नाला मी वेगळेच उत्तर दिले. त्यांनी जर हे ऐकलं असतं तर, काय विचार केला असता काय माहित. म्हणून मी त्यांच्यासोबत विषय बदलून बोलून आत प्रवेश केला.
आत जाऊन मी पुन्हा माझ्याच जगात हरवून गेले. महालाचा प्रत्येक कोपरा फिरू लागले. इथला प्रत्येक कोपरा माझ्या ओळखीचा वाटू लागला. मी माझ्या नकळत भिंतींना, वस्तुंना स्पर्श करून पाहू लागले. हा स्पर्श पण, जुना माझ्या संपर्कातला वाटला. हे कसं शक्य आहे? मला काहीच समजत नाही आहे. मी माझ्याच धुंदीत चालत पायऱ्या चढून वरच्या दिशेला जाऊ लागले. वर जाऊन मी स्वतःहूनच तिथे बाजूला असलेल्या मोठ्या खोलीत शिरले.
तिथे आत शिरताच अचानक मला ती खोली कोणी तरी आपल्याच माणसाची आहे हे जाणवलं. पण कोणाची? आणि मला असं का वाटतंय?
" ही त्या काळातील महाराज भीमराज ह्यांची खोली. आणि हा त्यांचा फोटो."
मी ती खोली पाहत असताना, तिथे बाजूला उभे असलेल्या दोन माणसांचे संभाषण माझ्या कानावर पडले.
मी ती खोली पाहत असताना, तिथे बाजूला उभे असलेल्या दोन माणसांचे संभाषण माझ्या कानावर पडले.
मग ते पाहत असलेल्या दिशेला मी पुढे सरकले. तिथे समोर मला भिंतीला एक भला मोठा फोटो लावलेला दिसला. मी त्या फोटोमध्ये बघून अगदी थक्क झाले. त्या फोटोला एकटक पहातच राहिले. त्या फोटोला पाहताना माझ्या नकळत आपसुक माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले.
" महाराज..."
तो फोटो बघताना आपसुक माझ्या मुखातून आदराने शब्द बाहेर पडला.
तो फोटो बघताना आपसुक माझ्या मुखातून आदराने शब्द बाहेर पडला.
मी पुढे होऊन हळूच प्रेमाने त्या फोटोवर हात फिरवला. मग तशीच मागे फिरून त्या खोली बाहेर पडले. मी आता स्वतःला पूर्णपणे हरवून बसले होते. मी कोण होते माझं मलाच समजत नव्हते.
चालत चालत मी सरळ आणखीन पायऱ्या चढून वरच्या बाजूला जाऊ लागले. तिथे जाऊन मी आणखीन एका खोलीत शिरले. तिथे आजूबाजूला कपाटात बरीच पुस्तके ठेवलेली मला दिसली. सोबतच समोर असलेली खिडकी देखील दिसली. माझे डोळे आता पूर्णपणे अश्रूंनी भरले होते. मी तशीच चालत त्या खिडकी जवळ गेले.
खिडकी जवळ जाऊन मी खिडकीतून खाली पाहू लागले. खाली मला एक तुटकं फुटकं घर दिसलं. त्या घराची अगदी बिकट अवस्था झाली होती. ते पूर्णपणे ढासळले होते. त्या घराला बघून काय माहित का? मला अचानक रडू कोसळले. मी तशीच मागे फिरून त्या संपूर्ण खोलीला भरलेल्या नजरेने पाहू लागले. त्या खोलीला पाहताना माझ्या मनात खूप जुन्या गोड आठवणी पुसटश्या जाग्या झाल्याचे जाणवू लागलं.
मी तश्याच भरल्या डोळ्यांनी त्या कपाटांजवळ गेले. तिथे असलेले एक एक खण पाहू लागले. तिथे राज्याच्या संदर्भात विविध कागद पत्र होते. पण मी तिथे वेगळंच काही तरी शोधत होते. बराच शोध घेतल्या नंतर कपाटाच्या एका कोपऱ्यात मला एक नाव लिहिलेलं दिसलं. ' राजकुमारी सुलेखा ' ते नाव वाचून जणू मनात काही तरी वेगळेच वाटले. मला माझे भान राहिले नाही. मी भरल्या डोळ्यांनीच त्यातील कागद बाहेर काढले. मला माझे ओलावलेले डोळे पुसायची देखील सुद राहिली नव्हती.
ते सगळे कागद मी हातात घेऊन खिडकी जवळ आले. मग त्या कागदांवरची एक एक कविता वाचू लागले. वाचताना त्या सगळ्या मीच लिहिल्या असल्याचं वाटू लागलं. वाचता वाचता मी शेवटच्या पानावर पोहोचले. आणि मला ती कविता सापडली.
चंद्राच्या शीतल छाये खाली, जवळी तुमच्या आले.
मिठीत येऊनी सजना तुमच्या, तुमचीच होऊनी गेले.
मिठीत येऊनी सजना तुमच्या, तुमचीच होऊनी गेले.
सौंदर्य तुमचे पाहताना, लाजला बघा चंद्रही नभी.
जवळूनी पाहुणी तुम्हा, मिठीत घेण्या जाहलो लोभी.
जवळूनी पाहुणी तुम्हा, मिठीत घेण्या जाहलो लोभी.
मिठीत तुमच्या विसरुनी गेले, सजना जग हे सारे.
अंतर मनामध्ये आता आपुल्या, वाहू द्या प्रेमाचे वारे.
अंतर मनामध्ये आता आपुल्या, वाहू द्या प्रेमाचे वारे.
प्रेमाची भावना मनी जागली, तुम्हा पाहताच क्षणी.
त्याच क्षणापासून मनात माझ्या, साठवल्या गोड आठवणी.
त्याच क्षणापासून मनात माझ्या, साठवल्या गोड आठवणी.
तुमच्या आधीच मी पाहिले तुम्हा, पाहुनी झाले वेडी.
समजेना झाले बोलू कशी, कशी लावू लाडी गोडी.
समजेना झाले बोलू कशी, कशी लावू लाडी गोडी.
म्हणुनी माझ्यासाठी तेव्हा, लिहिल्या दोन ओळी गोड.
त्याचं क्षणी प्रिये वाटली होती, माझ्या वेड्या मनी ओढ.
त्याचं क्षणी प्रिये वाटली होती, माझ्या वेड्या मनी ओढ.
ओढ वेड्या मनांची आपणास, जवळ घेऊनी आली.
जवळी येऊनी सजना प्रेमाच्या, पर्वास सुरुवात झाली.
जवळी येऊनी सजना प्रेमाच्या, पर्वास सुरुवात झाली.
पर्व सुखद प्रेमाचा तरी, मनी वाटे दुराव्याची भीती.
या जन्मी होऊ का एकात्म? मनी प्रश्न माझ्या किती.
या जन्मी होऊ का एकात्म? मनी प्रश्न माझ्या किती.
अपूर्ण कविता...
कवी शाश्वतवर्ण... माझ्या मनाचा बांध फुटला. मी तो कागद उराशी कवटाळला. आणि भरल्या डोळ्यांनी खिडकीतून बाहेर त्या पडक्या घराकडे पाहू लागले. तिथे मला वेदांश कोणत्या तरी दिशेला जाताना दिसले. इतका वेळ मी त्यांच्या विषयी विसरूनच गेले होते.
पण हे काय? हा आकाश आणि त्याच्या सोबत ती माणसे वेदांशच्या मागे का जात आहेत? आणि ते त्याच तलावाच्या दिशेने का जात आहेत?
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा