दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग ४८
वेदांश
२०१५ चा काळ मुंबई.
समोरचा फोटो बघून मी थक्क झालो. त्या फोटो खाली असलेले नाव वाचले. ' राजकुमारी सुलेखा ' हे नाव वाचून आणि हा फोटो बघून हृदयात कसेसे झाले. हे मी आधी पुस्तकात वाचले होते. त्याचीच ओढ मला इथ पर्यंत घेऊन आली होती. पण, इथे आल्यावर हे बघताच वाटतंय की, या नावाशी आणि या फोटोशी माझा खूप जवळचा संबंध आहे. पण तो कोणता? काही कळायला मार्ग नाही.आणि अदिती हुबेहूब राजकुमारींसारखी कशी दिसते. काय गडबड आहे?
मी तसाच विचार करत त्या खोलीच्या खिडकी जवळ आलो. खिडकीतून खाली मला एक तुटलेलं घर दिसलं. त्याची अवस्था अगदी बिकट झाली होती. त्या घराकडे पाहताना काय माहित का? मला विचित्र वाटू लागले. मला तिथे खाली त्या घरा जवळ जाण्याची इच्छा झाली. मी कसलाच विचार न करता तिथून सरळ खालच्या दिशेला जाण्यासाठी निघालो. खाली येऊन मी महालाच्या मागच्या बाजूला जाऊ लागलो. चालताना ही वाट मला ओळखीची वाटू लागली. कसल्या तरी पुसटश्या आठवणी डोक्यात फिरू लागल्या. मी त्या तिथेच टाकून घाई घाईने चालत महालाच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या तुटक्या घराजवळ पोहोचलो.
तिथे पोहोचून मी एकटक त्या पडक्या वास्तू कडे बघू लागलो. ती वास्तू माझ्या मनात कसली तरी जुनी आठवण जागी करत होती. तिला पाहताना मी आपसुक भावूक झालो. मी नक्की कोण आहे मला समजेना झाले.
" कवी वेदांश ना तुम्ही?"
मी भान हरपून ती वास्तू पाहत असताना मागून माझ्या कानावर आवाज ऐकू आला.
मी भान हरपून ती वास्तू पाहत असताना मागून माझ्या कानावर आवाज ऐकू आला.
मी मागे फिरून बघितलं तर माझ्या मागे पाच सहा माणसे उभी होती. त्यांच्यातील पुढे उभा असलेला मुलग्याने मला विचारलं होतं. मी त्याला स्मित करत होकार दिला.
" नमस्कार सर आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत. आम्ही तुमच्या कविता नेहमी वाचतो."
तो समोरचा मुलगा माझे कौतुक करू लागला.
तो समोरचा मुलगा माझे कौतुक करू लागला.
मी त्याचे स्मित करत आभार मानले. त्यातील प्रत्येकाने माझ्यासोबत हात मिळवला. इतक्या लांब पर्यंत माझी प्रसिद्धी आहे हे जाणून मला छान वाटले. त्यांनी आणखीन काही वेळ माझ्या सोबत गप्पा मारल्या.
" सर, इथे पुढेच एक सुंदर तलाव आहे. आणि तिथे एका भुयारात म्हणे त्या काळातील वस्तूंचा संग्रह आणि पुस्तके आहेत. आम्ही तिथेच जात आहोत तुम्ही पण चला."
तो मुलगा मला आग्रह करू लागला.
तो मुलगा मला आग्रह करू लागला.
" हो पण, माझ्या सोबत आलेली माझी मैत्रीण अजूनही महालात आहे. तिला सांगतो नाही तर ती शोधत बसेल. तिला पण, सोबत घेऊन जाऊ आपण."
मी त्यांना म्हणालो.
मी त्यांना म्हणालो.
" आपण तर जाऊया आधी मग त्यांना तिथून फोन करा. तिथे नेटवर्क आहे. मग ह्यांच्यामधलं कोणी जाईल त्यांना आणायला. बरीच माणसे त्या ठिकाणी जातात जास्त गर्दी होण्याआधी आपल्याला जायला हवं."
तो मला जास्तच विनवणी करू लागला.
तो मला जास्तच विनवणी करू लागला.
शेवटी मला देखील त्याला नाही म्हणता आले नाही. अदिती तिच्या अभ्यासात व्यस्थ असेल म्हणून मी आधी स्वतः ती जागा बघून येण्याचं ठरवलं. त्यांनी दाखवलेल्या दिशेला मी पुढे चालू लागलो. ते सगळे माझ्या मागून गप्पा मारत चालू लागले.
आम्ही जंगलाच्या वाटेने चालत चालत एका सुंदर तलावा जवळ आलो. ते अतिशय जुने तलाव होते. मी त्या बद्दल एक पुस्तकात वाचले होते. तिथे पोहोचून मला फार प्रसन्न वाटू लागलं. जणू इथे मी आधी देखील आलो आहे ह्याचा मला भास होऊ लागला. पण इथे आल्यापासून एक गोष्ट मात्र मला विचित्र वाटली. तिथे आमच्या शिवाय कोणी नव्हतं. मी त्यांना त्या वस्तू संग्रहा बद्दल विचारले. तेव्हा ते मला तिथे काही अंतरावर असलेल्या भुयारात घेऊन गेले.
या भुयारात पाय ठेवताच मला अस्वस्थ वाटू लागले. माझा जीव गुदमरू लागला. तिथे वेगवेगळे विचित्र भास होऊ लागले. मी चालत आणखीन आत शिरलो. आत लोखंडाचे दरवाजे असलेले कैद खाणे होते. ते बघून कोण जाणे का मला दरदरून घाम फुटला.
मी भीतीने मागे वळणार इतक्यात मागून माझ्या डोक्यावर कोणी तरी वजनदार वस्तुने जोरदार वार केला. त्या फटक्याने माझा तोल जाऊन मी हळू हळू खाली कोसळू लागलो. खाली कोसळून मी जमिनीवर पडलो आणि मागे ते सगळे असलेल्या दिशेला अर्ध्या उघड्या डोळ्यांनी बघू लागलो. मी खाली पडलेला बघताच ते सगळे पुढे आले आणि हातातील दांड्याने आणि पायाने मला मारू लागले.
मी त्यांना मला मारण्याचे कारण विचारलं. पण, कोणी काहीच सांगत नव्हतं. मी हळू हळू माझे शुद्ध हरपत होतो.
माझे डोळे पूर्णपणे आता बंद होऊ लागले होते. डोकं सुन्न होऊ लागलं होतं.
माझे डोळे पूर्णपणे आता बंद होऊ लागले होते. डोकं सुन्न होऊ लागलं होतं.
" हराम्या, त्या जन्मी तुला दिलेली ती शिक्षा कमी पडली का? म्हणून तू आता तिच्यासाठी पुन्हा जन्म घेतलास? तेव्हा ही ती तुझी होऊ शकली नाही आणि आता ही मी तिला तुझी होऊ देणार नाही."
मगाशी माझ्याशी गोड बोलणार मुलगा मला आता हे म्हणाला होता.
मगाशी माझ्याशी गोड बोलणार मुलगा मला आता हे म्हणाला होता.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा