पूर्वीची शिक्षण पद्धती आणि आत्ताची सेमिस्टर पद्धत

it is about how semester pattern works

पूर्वीची शिक्षण पद्धती आणि  आत्ताची सेमिस्टर पद्धत

सर्वात पहिली आपण सेमिस्टर पद्धत म्हणजे काय ते समजून घ्यायचा प्रयत्न करू . समजून घेण्यासाठी आपण  mba चा दोन वर्षांचा अभ्यास चा विचार करू .

mba ला एकूण ४ सेमिस्टर असतात . पहिले दोन सेमिस्टर पहिल्या वर्षी आणि तिसरा आणि चौथा सेमिस्टर दुसऱ्या वर्षी . पहिल्या प्रत्येक सेमिस्टर ला  सहा  महिन्यांचा  टर्म  असतो आणि  प्रत्येक सेमिस्टर वेगळा पोर्शन असतो आणि प्रत्येक सेमिस्टर वेगळी पुस्तके असतात . हा पोर्शन ज्या युनिव्हर्सिटी च्या अंतर्गत कोर्स चालू त्या युनिव्हर्ससिटीने बनवलेला असतो . पहिला वर्षी  मॅनॅजमेन्ट चे सर्व विषयांची ओळख असते आणि दुसऱ्या वर्षी म्हणजेच तिसऱ्या सेमिस्टर च्या सुरुवातीला त्या विद्यार्थ्याने त्यांचे specialation सिलेक्ट करून .त्या specialization  चा अभ्यास करायचा . म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टर ला विद्यार्थी त्याने सिलेक्ट केलेल्या specialization चा अभ्यास करतो . त्याच मध्ये त्याची एक इंटर्नशिप पण होते आणि त्याने काम केलेल्या कंपनीमध्ये असलेल्या मॅनॅजमेन्ट चा निरीक्षण आणि अभ्यास करून एक प्रोजेक्ट पण बनवायचा. आणि तो प्रोजेक्ट वर त्याची वाय वा (म्हणजे तोंडी परीक्षा) एक्साम होते . एक एक्सटेर्नल परीक्षक जो कि युनिव्हर्सिटी ने नमूद केलेला असतो ते येतात आणि विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या प्रोजेक्ट विषयी आणि प्रोजेक्ट मधल्या रिपोर्ट्स वर प्रश्न विचारतात . आणि मग त्यांच्या प्रोजेक्ट चे पण मूल्यांकन केले जाते आणि मार्क्स दिले जातात कि ते रिपोर्ट कार्ड मध्ये पण येतात .

आता आपण सेमिस्टर विषयी थोडे आणखी डिटेल मध्ये पाहू

साधारण ऑगस्त मध्ये पहिले सेमिस्टर सुरु होते त्यात ऑक्टोबर एन्ड ऑनलाइन एक्साम सुरु होते आणि १५ ते २० दिवसांच्या गॅप मध्ये written exam सुरु होते आणि डिसेंबर एन्ड पर्यंत रिझल्ट येतो . प्रत्येक विषयाची मार्किंग सिस्टिम खालील प्रमाणे असते

ऑनलाईन परीक्षा  २० मार्क्स

असाइनमेंट          ३० मार्क्स

written  परीक्षा     ५० मार्क्स

असे प्रत्येक विषयाचे १०० पैकी मार्क्स मिळवावे  लागतात

परीक्षेचे हा पॅटर्न सर्व सेमिस्टर ला सेम असतो .

दोन वर्षांचा कोर्स पूर्ण पास होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक सेमिस्टर ला पास होणे गरजेचे आहे . कारण फायनल सर्टिफिकेट वर सर्व सेमिस्टर चे मार्क्स आणि त्यांची ग्रेड येते . आणि मग परसेन्टेज पण सर्व सेमिस्टर च्या मार्क्स ना पकडून काढले जातात . त्यामुळे चांगली ग्रेड मिळवण्यासाठी प्रत्येक सेमिस्टर ला चांगले मार्क्स मिळवावे लागतात.

समजा कोणी पहिल्या सेमिस्टर ला नापास झाला तर त्याने नापास झालेल्या विषयाचा अभ्यास पण चालू ठेवायचा आणि दुसऱ्या सेमिस्टर चा पण अभ्यास करायचा जेव्हा परिक्षा येतात तेव्हा तो राहिलेला विषयाची पण एक्साम द्यायची आणि दुसऱ्या सेमिस्टर चे पण पेपर द्यायचे आणि मग असा सीलसीला चालू राहतो

पण दोन वर्षांचा कोर्स त्याने जास्तीत जास्त ४ वर्षात सोडवायचा . तेही नाही जमल तर मग त्याचे रेजिस्ट्रेशन रद्द होते . मग तो पुन्हा सी ई टी म्हणजेच एंट्रन्स एक्साम परत देऊनच री - ऍडमिशन करून पुन्हा करू शकतो

सेमिस्टर पद्धतीचं फायदा असा  कि

1. विद्यार्थ्याला अभ्यास आणि परीक्षा देणे सोप्पे जाते

2.सेमिस्टर चा पोर्शन ठरलेला असल्याने विद्यार्थ्यांना नेमका आणि अचूक अभ्यास करावा लागतो . (म्हणजे लिमिटेड स्टडी असल्याने जो आहे त्यावर १०० परसेंट कॉन्सन्स्ट्रेशन करून त्या विषयाची डिटेल स्टडी करता येतो

3.सेमिस्टर पद्धती मुळे आणि त्यांचे मार्किंग सिस्टिम मुळे विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण कमी होते

4.असाईनमेन्ट , प्रोजेक्ट रिपोर्ट्स ,इंटर्न शिप ,यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज पण मिळते जे कि अत्यंत महत्वाचे आहे

5.आपण केलेल्या प्रोजेक्ट वर वर्गात पुढे येऊन प्रेसेंटेशन पण द्यावे लागते त्यामुळे how to do presentation        हे हि कळते

सेमिस्टर पद्धतीचे जर drawbacks काढायचेच झाले तर असे

१. प्रत्येक सेमिस्टर ला वेगळी पुस्तके असतात . आधीच शिक्षण एवढे महाग झालेय त्यात आणि प्रत्येक सेमिस्टर ची वेगळी पुस्तके आणि वह्या घ्याव्या लागतात

२. प्रत्येक सेमिस्टर चे वेगळे मार्कशीट असते पण तरीही चौथं सेमिस्टर झाल्यावर जे मार्क शीट वर परसेन्ट काढताना आधीच्या सेमिस्टर चे मार्क पण धरतात .त्यामुळे टोटल परसेण्ट कमी येतात

तर अशी हि सेमिस्टर पद्धत कि ज्यामुळे आजच्या शिक्षणात खूप बदल झालाय . CBSC  पॅटर्न follow करणाऱ्या मुलांना पण तसेच आहे फक्त त्यांची २ सेमिस्टर्स असतात . अभ्यास खूप vast आणि detailed आहे . आणि त्यामुळे मुलांना कधी कधी अभ्यास करणे जड जाते. तरीही नववी पर्यंत च्या मुलांना नापास करत नाहीत त्यामुळे त्यांचे वर्ष फुकट जात नाही . नाहीतर पूर्वी १५ वर्ष झाला तरी मुलगा शाळेतच असायचा .

पण त्याचा हि एक तोटा आहे तो असा कि विद्यार्थ्यांना नापास होणे हे काय आहे ते नववी पर्यंत माहित नाही आणि अचानक दहावी मध्ये आल्यावर बोर्डाची परीक्षा देणे कठीण जाते . त्यात नापास होण्याच्या भीतीने ते खरोखरच नापास होतात .

पण त्याचा हि एक तोटा आहे तो असा कि विद्यार्थ्यांना नापास होणे हे काय आहे ते नववी पर्यंत माहित नाही आणि अचानक दहावी मध्ये आल्यावर बोर्डाची परीक्षा देणे कठीण जाते . त्यात नापास होण्याच्या भीतीने ते खरोखरच नापास होतात आणि त्यांचे वर्ष फुकट जाते  याउलट आधीच  बेस पक्का झाला असता म्हणजे त्यांचे प्रॉपर मूल्यांकन झाले असते तर दहावी चे महत्वाचे वर्ष fail झाल्यामुळे  जे गेले ते फुकट गेले नसते.

असो “ शिक्षाणाच्या आयचा घो “ या मराठी चित्रपटात  महेश मांजरेकरांनी आजच्या शिक्षण पद्धतीवर खूप चांगल्या प्रकारे टीका केलीय . त्यातले काही मुद्दे खरोखरच पटण्यासारखे आहेत.

मुलांवर जास्त अभ्यासाचे प्रेशर ना देता त्यांच्या कलेकलेने त्यांच्या आवडीने आणि त्यांच्या थोड्या सवडीने शिक्षण घेऊ दिलं पाहिजे . सारख्या टेस्ट ,एक्साम,सरप्राईझ टेस्ट याच्या खाली मुलं दबून जातात . त्यात भरीला हेवी कॉम्पिटिशन . हि कॉम्पटीशन हेवी न होऊ देता healthy कशी होईल  याकडे भर दिला तर बरं होईल .