Login

ओली चिंब मी आणि पाऊस

Pure Love

ओले ते स्वप्न ओली चिंब मी पावसात भिजलेली
ओले चिंब तन मन माझे ओली अशी मी सांजवेळी
तुझे स्वप्न पहात उभी आहे चिंब मी भिजलेली 
तुषार पावसांचे तना मनावर झेलणारी
तुझे अस्तित्व माझ्या जवळ जाणणारी
या रम्य ओल्या सागरी किनारी
जिथे आपल्या स्वप्नांची भेट होते
तिथे आपल्या आठवणींचे क्षितिज दाटते
अश्या या बेधुंद पावसाळ्यात धरती सारी नटलेली
हिरवा गार शालू पांघरून विविधतेनी सजलेली
सोहळा हा सजलेला पहावया इंद्रधनू भेटीस आले
जणू सात रंग उधळीत तिच्या स्वागताला सज्ज झाले
पावसाचे तुषार आले जणू हा अविसमर्णीय सोहळा पाहायला
चिंब चिंब पावसात भिजूनी तुझ्या माझ्या प्रेमाची साक्ष दयायला

©®श्रावणी देशपांडे

0