Login

विश्वासाच्या झोक्यावर

प्रीतीच्या सरी
दोघांनी दिले होते वचन
जोडीने सोबत राहण्याचे
एकमेकांना जपून केले काम
अविरत प्रीतसरी वाहण्याचे

संकट कितीही येवोत आयुष्यात
कधीच सोडली नाही त्याने साथ
आजही पाऊस आला अचानक
भिजू नये म्हणून घट्ट छत्रीवर हात

पाऊले आता संथ गतीने पडतात
तरी संयम त्याचा नेहमी असतो
हातात हात न दिल्यास मात्र
रुसून तो बाजूला बसतो

केस पांढरे झाले तरीही
नाते नव्याने राहते फुलत
विश्वासाच्या झोक्यावर
दोघेही राहतात झुलत

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क लेखिकेकडे आहेत.

फोटो सौजन्य साभार गुगल
0

🎭 Series Post

View all