सहस्त्र रश्मीं चा पांघरून शेला
पुर्वेकडून तो मित्र उगवला
माणुसकीच्या नव्या अध्यायाला
तमहराने पहा जयघोष केला
महामारी ने हाहाकार केला
अश्रूंचा तो झरा आटला
प्राण वायू अभावी जीव गुदमरला
जीवनाचा मग खरा अर्थ उमगला
नववर्षाच्या उंबरठ्यावर
एवढेच दान द्यावे देवा
जगण्याचा नवा उत्सव व्हावा
अन् विसरू नये माणसाने माणुसकीला
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा