कवितेचे शीर्षक- वडील

It's dedicated to my Father

ज्यांच्यामुळे या जगात आपण आस्तित्वात आहे,

जन्म दाखल्यावर आपल्या पुढे ज्यांचे नाव आहे,

ज्यांच्यामुळे आपली स्वतःची अशी एक ओळख आहे,

ते म्हणजे वडील.

माझे वडील श्री वसंत मेहेत्रे यांना पितृ दिनाच्या निमित्ताने ही कविता समर्पित.

एकाच व्यक्तीची इतकी रुपे मला पहायला मिळाली,

शिस्त लावण्यासाठी एक कठोर पिता,

कोणत्याही गोष्टीची कमी भासू नये म्हणून झटणारा परमपिता,

कर्तव्याची जाणीव करून देणारा महान आत्मा,

जीवनाचा अर्थ सोप्या शब्दात सांगणारा परमात्मा,

खेळताना स्वतःही लहान बनून खेळणारा सवंगडी,

आयुष्यातील प्रत्येक वळणावर वाट दाखविणारा वाटाडी,

मनातील कोणतीही गोष्ट निसंकोचपणे सांगू शकेल असा मित्र,

जीवनातील लढाईत,

श्रीकृष्णासारखा प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू सांगणारा परममित्र,

सगळ्या गोष्टींचे अवलोकन करून,

स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे, सामर्थ्य देणारा गुरू,

अपयश ही यशाची पहिली पायरी,

अपयशाने खचायचे नाही तर जोमाने उभे रहायचं,

हे सांगणारे परमगुरु,

अशी नानाविध रुपे असणा-या माझ्या वडीलांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचे पुढील आयुष्य आरोग्यदायी व सुखाचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

रुपाली थोरात