Login

पुन्हा एकदा उठले

तो,ती आणि आठवण
नियतीने का असा मांडला?
पुन्हा एकदा नाव नवा
संकटातून बाहेर पडण्यास
आता मार्ग शोधायला हवा

पुन्हा एकदा पाहिले
तुला दुरूनच फार
केला अश्रूंनी तुझ्या
काळजावर मोठा वार

पुन्हा एकदा उठले
आठवणीचे तरंग
विचारात झाली
मती माझी दंग

पुन्हा एकदा भावना
झाल्या दोघांच्या अनावर
दिसला आठवणींचा
सर्वत्र ठळक वावर

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all