☕️ एक कट चाय ☕️
शीना नेहमी हसणे.. आणि दुसऱ्यांना हसवणे ही तिची सवय.. आजी तिची बेस्ट फ्रेंड होती.. आजीला त्रास देणे. पुन्हा तिला मदत करणे.. दोघी मिळून छान फिरायला जायच्या.. शीना जेव्हा छोटी होती तेव्हा तिच्या आईवडिलांचा अपघातात मृत्यू झाला.. तेव्हापासन आजीनेच शीनाची काळजी घेतली तिच्या सर्व गरजा पुरवल्या तिला आईवडिलांची कमी भासू दिली नाही.. शीना लहानाची मोठी झाली शिक्षण संपलं आता जॉब करायला लागली.. पण आजी साठी प्रेम तीच कधीच कमी नाही झालं तिच्या जॉबची पहिली सॅलरी मिळाली आणि त्या पैशातून तिनी आजी साठी छान साडी घेतली आणि घरी गेली.. खूप आनंदात ती आजीला साडी द्यायला गेली तर आजी थरथर कापत होती.. अंग खूप गरम झाले होते.. शीना हे बघून गोंधळून गेली.. पण शेजारच्यांच्या मदतीने आजीला हॉस्पिटल ला नेलं पण आजीचे सुद्धा आता वय झाले होते.. डॉक्टर त्यांना चेक करत असताच आजी हे जग सोडून गेली... शीना साठी हा खूप मोठा धक्काच होता पण सर्वांनी तिला समझावले.. आजी ला जाऊन 15 दिवस झाले.. शीना घराच्या बाहेर सुद्धा निघत नव्हती.. पण तिच्या ऑफिस च्या मैत्रिणीनि तिला समझावले कि तू घरीच राहशील तर तुला जास्त त्रास होईल.. कारण घरातल्या प्रत्येक वस्तूत आजीची आठवण जोडलेली होती.. म्हणून शीनाने ऑफिस ला जायचे ठरवले.. ऑफिस ला जाऊन सुद्धा ती आजीला विसरू नाही शकली.. एक दिवस ती ऑफिस मधनं घरी जातं असताना तिचे लक्ष एक चाय टपरी वर जाते ही तीच टपरी आहे जिथे ती आजी सोबत यायची.. ती तिथे जाते आणि एक कट चाय घेते व बाजूला एका बाकावर जाऊन बसते आणि विचार करत असते.. विचार करता करता चाय सुद्धा थंडी होते.. श्याम : गरम चाय पिणे मे जो मज्जा है वो थंडी चाय पिणे मे कहा मज्जा है.. शीना: तुम्ही प्या कि गरम चाय.. श्याम:कश्याला गरम होता हो ..सर्वांनी नेहमी हसत खेळत राहावं.. शीना : काय चाललं हो तुमचं समोरच्याला न समझून घेता आपलीच बडबड करायची का.. श्याम : माझी एक मैत्रीण आहे जी म्हणायची आपण नेहमी हसत राहावं..जीवनात सुख दुःख येतच राहील पण कधी निराश व्हायचे नाही.. शीना:तू तू चष्मीश.. श्याम:हो पण आता दिसतो का चष्मीश? शीना:नाही, आता तर हॅंडसम दिसतो.. एक मिनिट तु मला कसे ओळखले.. श्याम :अग मी लांब गेलो होतो तुझ्या.. पण मनाने कधीच लांब नाही करू शकलो तुला... एक दिवस सोसिअल साईड वर सर्च केल.. तुला म्यासेज करून बोलावंसं वाटायचं पण तुला भेटायची ईच्छा झाली तर.. म्हणून ठरवलं कि तुला सामोरा समोरी भेटावं.. तुझ्या घरी गेलो तर घरी कोणीच नव्हतं..शेजारच्या काकांनी सर्व सांगितले.. शीना:जसा अचानक गेला तसाच अचानक परत आला..मी तेव्हाही खूप वाट बघितली तेव्हा आजी होती समझवायला..पण आता ती पण गेली... श्याम : असे समझ कि आजीनेच मला इथे पोहोचवले असेल.. तुझी नेहमीच स्माईल तुला मिळवून देण्याकरिता मी आलो आहे.. आणि मी आता कधीच दूर जाणार नाही.. एक कट चाय हो जाए.. शीना : हा... श्याम चाय आणतो आणि गुडघावर बसून चाय समोर करून बोलतो.. मला तू तेव्हाही आवडायची आणि आताही तुझ्या दूर जाऊन सुद्धा तुला विसरू नाही शकलो.. I love u.. will u marry me.. तुझा हो असेल तर हा चाय घे आणि एक घोट पी.. म्हणजे मी हो समझेल.. शीना चाय चा कप घेते आणि एक घोट च्या पिऊन.. i love u too... एक कट चाय आणि शीनाची स्माईल परत आली.. शीना आता पुन्हा पहिले सारखी जगायला शिकली..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा