Login

एक आई... पण अंतिम भाग.

तृतीयापंथीची आगळी वेगळी गोष्ट.

भाग -3 अंतिम भाग



" तुझं मि काही ऐकून नाही घेणार ! आणि मला कोणाला काही सांगायची गरज नाही ! समाज मोठा नाही महत्वाचा नाही माझ्यासाठी !" उमा बोलत होती आणि उषा ऐकत होती.


तिची चिडचिड कमी झाली होती, उषा म्हटलं की तिला एकमेव शांत करणारी.


आज दहावीच्या बोर्डाचा दिवस असतो, उमा धावत धावत घरी येते आणि उषा ला गच्च मिठी मारते तिच्या पाया पडते.


" काय गं लागला का निकाल आज पेपर चा निकाल होता ना ? " उषा बोलते. पाया पडल्याने तिच्या डोळ्यांत पाणी येत.


" हो लागला ना, तुझी मेहनत कामं आली आई ! मि पास झाली. बोर्डात पाहिली आली !" ती आनंदाने उषा ला सांगते आणि पुन्हा ती तिच्या पाया पडते.


" अगं अगं माझ्या पडण्यापेक्षा देवाच्या पड त्याच्याच मुळे तर माझी मुलगी पास झाली !" उषा बोलते, वाटीतून साखर आणून देवा पुढे ठेवते.


" त्याच्या तर पडेन माझा खरा देव तु आहेस, तुझ्यामुळे तर मि इतकी पाहिली आहे पास झाली. तुझी मेहनत !" उमा बोलते.


काही वर्षांनी....


उमा आता मोठी झाली होती तिचं कॉलेज मधून उत्तम शिक्षण झालं होतं आणि आता ती चांगली जॉब ला ही लागली होती.


" आई तु आता काही कामं वगरे करायचं नाही !" उमा बोलते. आणि काही पैसे काढून ती उषाच्या हातात ठेवते.


" हे काय ? हे कसले पैसे ? " उषा पैसे पाहून विचारते.


" हा माझा पहिला पगार , त्यामुळे आता तुला कुठे ही बाहेर कमवायला जायची गरज नाही. जे काही आहे ते मि पाहीन !" हे ऐकताच तिला भरून येत, असं कोणी तरी पहिल्यांदा तिच्या हातात मानाने पैसे दिले होते तेही इतके. आणि पगार म्हणून..


" अगं पण...??? " उषा बोलते...


" पण बिन काही नाही..!!"" उमा बोलते.


हळू हळू उमा च लग्नाचं वय होतं होते, कोणी ही कुठून ही स्थळ सांगुन आणायचे. पण ते उषा कडे पाहून अनेक प्रश्न निर्माण व्हायचे आणि मग ठण ठण भोपाळ.


आज काही करुन उमा शी बोलायचं असं उषा ने ठरवलं होतं, तिला सर्व काही सांगायचं ठरवलं होतं.


तसं ती तिच्याशी बोलायला तिच्या जवळ जाते, " उमा अगं कामात आहेस का गं ? जरा बोलायचं होतं..?? " उमा काही तरी ऑफिसच्या कामात मग्न असते.


तिला माहित असतं आई ला काय बोलायचं आहे ते, " अगं उमा ते तुला अनेक स्थळ आलेले पण माझ्यामुळे तुला सतत नकार मिळत गेला...!" उषा नाराज होऊन बोलते.


" हा मग आई... त्यात काय झालं !!" उमा बोलते.

तिला ह्या गोष्टी मायनेच ठेवत नसतात, तिच्यासाठी तिला तिची आई महत्वाची असते समाज नाही.


" अगं पण हे असं, म्हणून मि तुला सांगायला आली आहे.. मि तुझी आई नाही गं...!" उषा बोलते.


" अगं माहित आहे गं आई .... तु का मला हे स्पष्टीकरण देते..? " उमा जरा मुद्दामच तिच्यावर चिडते.


" अगं पण मि स्त्री ही नाही आणि पुरुष ही नाही.. मि मि मि...!" तेवढ्यात उमा उषाच तोंड बंद करते.


" बस झालं आई, तुझी ओळख सांगायची मला किंवा समाजाला सांगायची गरज नाही ! मला सर्व माहित आहे आणि त्याने मला काही फरक पडत नाही. " आणि उमा तिला घट्ट मिठी मारते.


" मि खुप खूश आहे की मला तुझ्या सारखी मुलगी लाभली आणि इतकं समजून घेते काही न बोलता.!" उषा बोलते.


" आणि मि खुप नशीबवान आहे मला तुझ्यासारखी आई मिळाली..!" उमा बोलते.



काही महिन्यांनी तिला स्थळ येत, आणि उमा च लग्न एका चांगल्या घरात होतं. तिला एक सोन्यासारखी मुलगी पण होते, पण एक उषा मात्र ह्या जगात आता नाही आहे. आणि त्याची म उणीव तिला कायम जाणवते.



.... समाप्त....



0

🎭 Series Post

View all