Login

ओंजळीत माझ्या सुखाचे चांदणे...१

कथामालिका
ओंजळीत माझ्या १

ओंजळीत माझ्या
सुखाची चाहूल
मनात विचारांचे
उठले काहूर....

'अरे, मला आज काहीच कसं सुचत नाही रे."

"अग, सुचेल काही तरी. आपल्याजवळ अजून दोन दिवस आहे तयारीसाठी."

"पण अद्वैत मला ना ही कनस्पेटच आवडली नाही. 'ओंजळीत माझ्या सुखाचे चांदणे' यात काहीतरी मिस वाटतंय. या विषयावर मी कशी कविता करू ?"

"केतकी काय होतंय तुला? इतक्या सुंदर कवितांची रचना करणारी मुलगी का मागे हटते हळूच मला कळत नाही."

केतकीच्या डोळ्यात अश्रू आले. असे म्हणतात ना. भुतकाळ आपली कधीच पाठ सोडत नाही आणि वर्तमान काळातही त्याचे पडसाद उमटतातच.

"काही नाही."

"नको ना त्या आठवणीत गुंतू. आता समोर असलेल्या भविष्याचा विचार कर. मी तुला मागेच माझे प्रपोजल दिले होते. तू माझ्या सोबत संसार ....

"अद्वैत ! काय बोलत आहे? मी जशी आहे तशीच राहू दे मला."

"साॅरी, केतकी. मला तुला हर्ट करायचे नव्हते. पण यातून तुला सावरावेच लागेल."

"अरे, पण घरच्यांनी माझ्यावर खूप आरोप केले. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. तर तू का?"

"कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे."

"अद्वैत, आपण कोणत्या क्षेत्रात काम करतो ते तरी बघ. त्यात आपल्या वयाचा विचार करायला नको का?"

"चल मी जाते. माझ लेक्चर आहे आता. यापुढे स्टाफ रूम मध्ये असे विषय काढत जाऊ नकोस.

केतकी तिथून निघून वर्गावर जाते पण तिचे लक्ष शिकवण्यात नसतेच. त्यामुळे ती अर्ध्या दिवसाची रजा टाकून घरी निघून जाते. भुतकाळाच्या काळ्या छायेत, शशांकच्या प्रेमात ती एक एक दिवस कसाबसा ढकलत होती.

इकडे अद्वैतचे मन थाऱ्यावर नव्हते. पण तिच्या घटस्फोटाचे प्रकरण कळल्यापासून अद्वैत अस्वस्थ झाला होता. सह महिन्याच्या वर होऊन गेले. तो केतकीच्या होकाराची वाट बघत होता. पण केतकी होकार काय त्याविषयी बोलायला सुध्दा तयार नव्हती. समाजाच्या भितीमुळे ती होकार देत नव्हती.

केतकी एका सामान्य कुटुंबातील मुलगी. तिचे वडील सुधीरराव एका साधारण बॅकेत नोकरी करत होते आणि आई सरिता घरगुती जेवणाचे डबे बनवत होती.

केतकी घरातील सर्वात मोठी मुलगी. तिच्या पाठीवर एक बहीण आणि एक भाऊ भाऊ होता. सगळ काही व्यवस्थित होते. केतकीने मराठी विषयात एम.ए. लिटरेचर केले होते. नोकरी करून घरात हातभार लावायचा विचार करून काही महाविद्यालयात तिने नोकरीसाठी अर्ज सुध्दा केला होता. पण नोकरी लागायच्या आधीच शशांकचे स्थळ सांगून आले. पण तिला इतक्यात लग्न करायचे नव्हते.

"आई, मला सध्या एक दोन वर्षं लग्न नाही करायचे ग."

"अग, केतकी एकदा मुलाला बघून तर घे. मग होकार नकार कळवू. छान इंजिनीअर झालेला आहे. पुण्यात नोकरी करतो. तुला सुध्दा पुढे मागे पुण्यातील चांगल्या काॅलेजमध्ये‌ नोकरी मिळेलच. तेव्हा विचार कर."

पण केतकीने नकार दिला. पण शशांकने तिचा फोटो बघताच तो तिच्या प्रेमात पडला. निळसर डोळे, काळेभोर लांबसडक केस, चेहऱ्यावर आत्मविश्वासाची छाप असे केतकीचे व्यक्तीमत्व होते. फक्त फोटो पाहून तो तिला भेटण्यासाठी आतुर झाला होता.

अखेर तो क्षण आला. केतकीची इच्छा नसतानाही चहा पोह्यचा कार्यक्रम झाला. केतकीला सुध्दा शशांक पहिल्याच भेटीत पसंत आला. उंचपुरा, गहुवर्णीय दिसणाऱ्या शशांकची आणि तिची नजरानजर झाली आणि पसंती आली. दोघांच्याही घरून होकार असल्याने लवकरच लग्नाची तारीख जाहीर केली. तीन महिन्यानंतरचा मुहूर्त ठरवला गेला. सनई चौघड्यांच्या निनादात दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले. शशांकच्या आयुष्यात तिने प्रवेश केला होता. सहजीवनाची नवीन स्वप्नं बघत ते एकरूप झाले. हळुहळु ती शशांकच्या घरात रमून गेली. तिच्या सासु सासऱ्यांची ती लाडकी लेकच बनली. बघता बघता लग्नाला सहा महिने होऊन गेली. त्यामुळे तिने नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यात तिचे सिलेक्शन सुध्दा झाले. नोकरीमध्ये रूळत असतांनाच सासुबाईंना नातवाचे वेध लागले. त्या सतत तिच्या मागे लागून तिला हैराण करू लागल्या.

केतकीने तिचे स्पष्ट मत सांगितले. "आई, आम्ही तीन वर्षांचे प्लॅनिंग केले आहे. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ हवा आहे. त्यामुळे अलकाताई शांत बसल्या.

बघता बघता तीन वर्ष निघून गेले. केतकी आणि शशांक आपापल्या आयुष्यात खुष होते. पण केतकीच्या सासुबाई अलकाताईंनी या गोष्टीची परत आठवण करून दिली.

केतकीनेही या विषयावर शशांकशी बोलायचे असे
ठरवले. ठरल्याप्रमाणे त्यांनी ही गोष्ट मनावर घेतली. ते एके दिवशी घरी न सांगता डॉक्टरांकडे जाऊन आले. काही टेस्ट केल्या. पण आता मात्र त्यांना बाळ होण्यासाठी अडचणी येत होत्या. केतकीची गर्भपिशवी नाजूक असल्याने सध्यातरी गर्भधारणा होऊ शकत नाही. असे डॉक्टरांनी सांगितले. त्यासाठी ट्रीटमेंट सुरू करायला सांगितले. पण त्यानंतरही केतकी आई होऊ शकेल. याची गॅरंटी डॉक्टरांनी दिली नाही.

केतकी आणि शशांकला खूप टेन्शन आले होते.‌ आईला काय सांगणार? अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

🎭 Series Post

View all