ओंजळीत माझ्या ३
एके दिवशी केतकी आणि अलकाचे खूप मोठे भांडण झाले. त्या भांडणात अलका ताईंने तिचा खूप अपमान केला. त्यामुळे शामराव आणि शशांक खूप दुःखी झाले. त्या आता एकही शब्द ऐकून घेत नव्हत्या. त्यामुळे केतकीच्या तोंडून सुध्दा अपशब्द निघाले. आईचा झालेला अपमान सहन न झाल्याने त्याचाच राग धरून शशांकने तिला हात धरून घराच्या बाहेर काढले.
पाहुया पुढे....
अलकाताईंच्या मनासारखे झाले होते. केतकी कायमचे घर सोडून निघाली होती. शामरावांनी खूप मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. केतकीने सुध्दा अलका ताईंच्या हातापाया पडल्या. माफी मागितली. पण यावेळी शशांकच्या रागाचा विस्फोट झाला होता. त्याने यावेळी आईची बाजू उचलून धरली होती. शशांकने तिची कपड्यांची बॅग, आणि काही सामान बाहेर आणून फेकल.
"आता काय करायचं? कुठे जायचं? केतकीला काहीच सुचत नव्हते. कारण माहेरी ती जाऊ शकत नव्हती. कारण माहेरी कोणत्या तोंडाने जाणार? अचानक मला असं माहेरी आलेले पाहून सगळ्यांच्याच मनात किती प्रश्न निर्माण होतील. तिने तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि दोन तीन दिवस तिच्या घरी राहायला गेली. पण किती दिवस राहणार? पण घर मिळेपर्यंत तिला राहावेच लागणार होते. आठ दिवसांतच तिने दोन खोल्यांचे घर शोधले. पण जशा पाहीजे तशा सुविधा असलेले घर मिळालेच नाही. शेवटी काही दिवस तिथे राहून नवीन घर शोधू असे ठरवले.
इकडे शशांक सुध्दा डिस्टर्ब झाला होता. केतकीची सारखी आठवण त्याला येत होती. अचानक एके दिवशी केतकी घरी आली.
"आता कशाला आलीस?"
"माझं काही सामान राहिले होते ते घेण्यासाठी आली आहे. "
"घेऊन जा बाई. तुझ्या आठवणी सुध्दा या घरात नको आहे."
तिने शामरावांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि तब्येतीची विचारपूस केली.
"बाबा, शशांक कसे आहेत ? त्यांना म्हणावं की दुःखी राहू नका. दुसरं लग्न करून घ्या. "
त्यानंतर तिने स्वयंपाक घरात जाऊन स्वतः चे काही भांडे काढले आणि गोणीत भरायला सुरुवात केली.
"हे काय करते. माझ्या स्वयंपाक घरात लुडबुड करत आहे. हा पसारा कशासाठी काढला?"
"आई, आता मी नवीन घरात राहायला जाणार आहे. मला नको का सामान आणि मी फक्त माझ्या माहेरून दिलेला संसार नेत आहे. बाकी कशालाच हात लावत नाही. "
बघता बघता तिने स्वयंपाक घरातल्या सामानांच्या
गोण्या बांधल्या. स्वतः च्याच कपाटातून महत्वाची कागदपत्रे आणि कपडे, बेड घेऊन ती निघून गेली.
गोण्या बांधल्या. स्वतः च्याच कपाटातून महत्वाची कागदपत्रे आणि कपडे, बेड घेऊन ती निघून गेली.
अलकाताईंच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला होता.
तेवढ्यात शशांक संध्याकाळी घरी आला आणि आईची बडबड ऐकून कंटाळून गेला.
तेवढ्यात शशांक संध्याकाळी घरी आला आणि आईची बडबड ऐकून कंटाळून गेला.
"शशांक तू तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली का ? मला ती आता या घरात परत आलेली नको आहे. " अलकाताई
"म्हणजे ? ती घरी आली होती?"
"हो, तर. तिने तिचा संसार नेला."
"संसार नेला म्हणजे!"
"शशांक, अरे तिने भाड्याने नवीन घर घेतले आहे. पण नवीन भांडी, गॅस आणि काही सामान घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. मग तिने तिच्या माहेरून आलेला तिचा संसार घेऊन गेली." शामराव
"मग माझी आठवण नाही आली का तिला? माझ्याबद्दल काही चौकशी केली का?"
"हो, अरे पोटतिडकीने तुझी चौकशी करत होती. पार सुकून गेली रे पोर."
शशांकच्या डोळ्यात पाणी आले. एकीकडे आईचा हट्ट आणि दुसरीकडे केतकीने दिलेली शपथ. पुरता अडकला होता.
"बाबा, केतकीच्या सुखाची ओंजळ आज माझ्या मुळे रिती झाली आहे. "
"आणि आईमुळे तुझी ओंजळ."
" तुम्ही काय बोलता ?"
"हो अलका, तुझ्या एका निर्णयामुळे आपल्या कुटुंबाची वाताहत झाली आहे. शशांकचा संसार पणाला लागला आहे. अजूनही सावर स्वतः ला. अग..."
"बस. मी घटस्फोटाचे कागदपत्र तयार करायला सांगितले आहे. ते लवकरच मिळतील. तेव्हा शशांक त्यावर मला तुझ्या सह्या हव्या आहे. त्यानंतर तुझ्या त्या वांझ ...."
"आई..... बास झालं आता. किती आरोप करणार आहेस आता?"
"बाबा, आईला समजावून सांगा ना."
" अरे, तिच्या हट्टापायीच तर सगळं विस्कटत चालले आहे. काय करावे सुचतच नाही."
शशांकचे मन मात्र दुखावले होते. काय करावे सुचत नव्हते. एक आई स्वतः च्या मुलांचं संसार स्वतः च्या हाताने मोडायला निघाली होती.
पाहुया पुढच्या भागात काय होते....
© अश्विनी मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा