ओंजळीत माझ्या ५
अद्वैत केतकीच्या घरून निघून जातो. पण त्याच्या मनात आता निराशेचे ढग जमा होऊ लागले. त्याच्या जीवनातही अंधारच होता. पण केतकीला त्याचे म्हणणे पटत नव्हते. समाजाच्या भितीमुळे ती ठोस निर्णय घेऊ शकत नव्हती. अद्वैतने बनवलेली खिचडी आणि कढी तिने खाल्ली . पण मनात अपराधी पणाची भावना निर्माण झाली होती. "दुपारपासून ते आपल्या सोबत होते. तरी एका शब्दाने सुध्दा त्यांना खिचडी खाण्यासाठी आग्रह केला नाही. आपण असे नव्हतो. पण आता त्यांना काय वाटत असेल. एक फोन करते आणि साॅरी म्हणतेच."
तिने अद्वैतला फोन लावला. पण तो फोन उचलत नव्हता. बहुतेक गाडी चालवत असेल. या विचाराने ती थांबली. मग कवितेची डायरी हातात घेतली. अजून कविता पुर्ण करायची राहिली होती. उद्या खरच आपण कविता म्हणू शकेल की नाही. याची तिला भिती वाटत होती.
पण कसेबसे दोन कडवे पुर्ण केले. तो पर्यंत दिवेलागणीची वेळ झाली होती. तिला अद्वैतचा विसर पडला होता. त्यानेही काॅलबॅक केला नव्हता. पण अचानक एक मेसेज आला.
"साॅरी. यापुढे मी तुमच्या आयुष्यात डोकावणार नाही. मला असे वाटले होते की,
"आयुष्याच्या अंधारातून उजळून जाऊ
आपले भरकटलेले जीव
घेऊ विसावा क्षणभरासाठी
मन तुझ्याकडेच धाव....
आपले भरकटलेले जीव
घेऊ विसावा क्षणभरासाठी
मन तुझ्याकडेच धाव....
सोड अबोला, नको त्रागा
आपण आता आनंदाने जगू या
अंधारलेल्या आयुष्याला
दिशा प्रकाशाची दाखवू या....
आपण आता आनंदाने जगू या
अंधारलेल्या आयुष्याला
दिशा प्रकाशाची दाखवू या....
"केतकी, खरच पुन्हा मला माफ करा."
तिने डोळे मिटले. अबोल मनाला अश्रुंची सोबत केली. सासर, माहेर आणि समाज यात ती अडकली होती. पण सासरच्या लोकांनी तिला केव्हाच दूर केले होते. माहेरी जायची सोय नव्हती. त्यामुळे मार्ग काहीच सापडत नव्हता. आपाले खरे कारण जर कळले तर अद्वैत देखील आपल्याला सोडून जाईल ही भिती तिला सतावत होती. म्हणून तिने एक मेसेज अद्वैतला केला.
"मला तुम्हाला भेटायचे आहे. आता माझ्या घराजवळच्या कॅफे मध्ये येता का? प्लीज या."
पण त्याने मेसेज वाचलाच नाही. म्हणून तिने परत फोन केला. पण तो फोन उचलत नव्हता. आता ती घाबरली होती. आपण दिलेला नकार आणि अपमान तो पचवू शकला नाही तर... नाही नाही. तो उदास झाला तर कुठे जायचा हे एकदा त्याच्या बोलण्यातून कळले होते. पण तो भेटेल की नाही ? तो आपल्या सोबत बोलेल की नाही ? आपल्याला समजून घेईल की नाही?
केतकी घरातून निघाली आणि घाईघाईने निघाली. रोडवर येताच रिक्षा पकडली आणि गणपतीच्या मंदिरात पोहोचली. इथेच तो भेटणार हे तिला पक्कं ठाऊक होतं. थोडी शोधाशोध केल्यानंतर मंदिराच्या परिसरातच तो बसलेला दिसला.
"अद्वैत, साॅरी.
"अरे, केतकी तुम्ही इथे. तुम्ही का आल्या. तुमची तब्येत बरी नाही ना मग...."
"हो, पण तुम्ही माझ्या मेसेजला रिप्लाय दिला नाही. म्हणून मी स्वतः इथे आली."
"काही हरकत नाही. आज पासून आपल्या वाटा वेगळ्या आहेत. मी तुमच्या होकाराची परत कधीही वाट बघणार नाही."
"अद्वैत, मी तुमचे काहीही न ऐकता गैरसमज करून घेतला होता. माझ्या घरी तुमचा अपमान झाला. पण आपण कोणताही निर्णय घेण्याआधी माझ्या भुतकाळाचे सत्य तुम्हाला कळलेच पाहिजे असे मला वाटते."
"केतकी माझा तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे."
"नाही. पण जे काही आहे. तुम्हाला ते खरं कळायलाच हवं."
"ठीक आहे. त्या आधी मला सुध्दा तुम्हाला काही सांगायचे आहे."
"एक काम करू या. आपण माझ्या घरी जाऊ या. म्हणजे निवांत बोलता येईल."
"ठीक आहे. चला जाऊ या."
अद्वैत लगेच तयार झाला. घरी येईपर्यंत साडेसात वाजले होते.
आता केतकीचे टेन्शन कमी झाले होते. मुख्य म्हणजे अद्वैत तिला भेटला होता.
"या, सर बसा."
"सर मी तुम्हाला काय सांगते ते नीट ऐका. मी एक घटस्फोटीत महिला आहे. त्याच कारण म्हणजे मी कधीही आई होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या सासुबाई माझ्या नवऱ्याचे दुसरे लग्न करून देणार आहे."
"बस इतकच कारण आहे का!"
"अहो, इतकच म्हणजे किती मोठ कारण आहे माझ्यासाठी ते. एका स्त्रीसाठी आई होणं म्हणजे जगातील सर्वात मोठी देणगी आहे आणि देवाने ते दान माझ्या पदरात टाकलेच नाही."
ती खाली बसली ; पदराच्या आड डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी !
"केतकी मॅडम. तुम्ही ठीक आहात ना! सांभाळा स्वतः ला.
"हो...."
"अहो, आपण आपल्या लोकांसाठी किती त्याग करत असतो. पण त्याची किंमत शुन्य असते. खरच प्रेम हे असच असत. निस्वार्थीपणे केलेल. ज्यात अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो. "
"पण, माझ्याबाबतीत अपेक्षाच जास्ती होत्या."
"आणि माझ्याही बाबतीत."
"म्हणजे?"
आपण दोघेही समदुःखी आहोत. असे म्हणायला काही हरकत नाही.
काय अपेक्षा आहेत. पाहुया पुढच्या भागात...
क्रमशः
क्रमशः
©अश्विनी मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा