Login

ओंजळीत माझ्या सुखाचे चांदणे...६

कथा मालिका
ओंजळीत माझ्या ६

"अहो, आपण आपल्या लोकांसाठी किती त्याग करत असतो. पण त्याची किंमत शुन्य असते. खरच प्रेम हे असच असत. निस्वार्थीपणे केलेल. ज्यात अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो. "

पुढे.....

"पण, माझ्याबाबतीत जरा जास्त अपेक्षा होत्या आणि का नाही करणार? त्यात त्यांचा स्वार्थ तर होताच. पण माझ्यातली स्त्री सुध्दा पुर्ण होणार होती. पण मी कधीच आई होऊ शकत नाही. हे कळल्यानंतर सगळ विस्कळीत झाले आणि हेच सत्य आहे."

"केतकी, ही गोष्ट खरच खूप हर्ट होण्यासारखीच आहे. पण तेच तेच उगाळत बसून आपला संघर्ष कमी होणार नाही. कारण माझेही अर्धै आयुष्य असेच निघून गेले. माझा संसार खुप सुखाचा सुरू होता. नवीन नवीन संसार होता. पण ती माझ्यावर खोटे प्रेम करत होती. माझ्या माघारी माझी बायको ..... शी ! तिचे दुसऱ्याच कोणत्या मुलावर प्रेम होते. तिने मला फसवले आणि तीन महिन्यांतच ती मला सोडून गेली. ती मला पूर्णपणे उद्धवस्त करून गेली. मला आयुष्यभराचे दुःख देऊन गेली. खरंतर आपण समदुःखी आहोत. आपल्या मनातल्या भावनांना कोणीच समजून घेतले नाही. मी सुध्दा एकटाच आहे आणि तुम्ही सुध्दा... म्हणूनच मी तुम्हाला लग्नाची मागणी घातली‌ होती. आता निर्णय तुमचा आहे."

"पण आपले कुटुंब .... आपला समाज..."

"अहो, कोणते कुटुंब ! कोणता समाज ! जे कुटुंब आपल्या सोबत कधीच नव्हते. जो समाज आपल्या कधीच सोबत नव्हता."

"पण तरीही मला थोडा वेळ हवा आहे."

"ठीक आहे केतकी मॅडम. मला असे वाटते आपण आपल्या आयुष्यातील दुःखाची झालर दूर सारून आनंदाचे क्षण जंगले पाहिजे."

"पण तरीही.... आपलं महाविद्यालय.... आपले विद्यार्थी.... "

"अहो, ते येतील आणि जातील. हवं तर आपण लग्न करून दुसऱ्या शहरात जाऊन नवीन नोकरी शोधू या."

"सगळ मान्य आहे. तरीही मला थोडा वेळ हवा आहे."

"केतकी जरा शांत बसतेस. हे घे पाणी."

"अद्वैत सर , आपण या विषयावर नंतर बोलू. प्लीज आता मला फार त्रास होतो आहे."

"ओके. तुम्ही आराम करा. हवा तेवढा वेळ घ्या. तसाही उद्या तुमचा दिवस आहे. तुम्हाला कवितेसाठी "बेस्ट ऑफ लक."

तेवढ्यात केतकीचा फोन वाजतो.

"हॅलो, केतकी कशी आहेस?"

"आई, मी ठीक आहे. बोल काय म्हणतेस?"

"अगं तुझ्याविषयी काही बाही कानावर येत आहे. अगं आमचा तरी विचार करायचा ना !"

"आई काही बाही म्हणजे काय ग?"

"अगं ते.... ते.... तुझ कोणातरी सोबत अफेअर चालू आहे. हे काय चाललंय तुझं? हे खरं आहे का?"

"आई, काहीही काय बोलतेस ?"

"अगं पण आम्हांला तर ऐकूनच धक्का बसला."

"आई, प्लीज फोन ठेव आता."

नेमक अद्वैतच्या हातातून गाडीची चाबी खाली पडते‌‌.

"आत्ताही तुझ्यासोबत कोणी आहे का?

"नाही ग. का?

"काहीतरी पडल्याचा आवाज झाला म्हणून विचारले."

"नाही ग आई. तुझ आपलं काहीतरीच." असे म्हणत केतकीने फोन कट केला."

"अद्वैत सर, काय झाले आहे बघीतले‌ ना तुम्ही. माझी सगळीकडे बदनामी होत चालली आहे. म्हणे अफेअर चालू आहे. इथे तर घरचीच माणसे आपल्यावर बोट उचलत आहे. आपली मैत्री सुध्दा लोकांच्या नजरेत खुपत आहे. इथून पुढे आपण न भेटलेल बर. माझ्या चारित्र्यावर कोणी संशय घेत असेल तर मला जगायचेच नाही."

"केतकी, जगायचे नाही म्हणजे? लाख मोलाचे आयुष्य असे वाया घालवायचे का? हे बघ जग असंच असतं आणि राहणार. ते आपल्याला सुखाने जगू सुध्दा देणारच नाही. म्हणून आपले आयुष्य एकाकी जगायचे आहे का?"

"ते मला काही माहित नाही. पण यापुढे आपण न भेटलेले बरे. काॅलेजमध्ये सुध्दा तुम्ही माझ्यासोबत अंतर ठेवूनच वागत जा. प्लीज अद्वैत सर. तुम्ही या आता."

"पण केतकी..."

अद्वैत निघून जातो. केतकीच्या मनावर दडपण आले होते. "इतके दिवस मी कशी आहे? कशी राहते ? मला काही अडचणी आहेत का? याचा कधीच कोणी विचार केला नाही. मी फक्त एका पुरूषाशी मैत्री केली. गप्पा मारल्या तर अफेअर आहे. किती विचित्र आहे सगळं ! माझं आयुष्य मी कधीच सुखाने जगू शकणार नाही का? मला काहीच अधिकार नाही का? अद्वैतच्या निमित्ताने माझ्या आयुष्यात परत आनंद येत होता. तर लोकांना तो सुध्दा सहन होत नाही. "

आता तर तिची झोप उडाली होती. आपल्याला आता काही तरी निर्णय घ्यावाच लागणार. तिने मन कठोर केले आणि येत्या काही दिवसांत नवीन नोकरी शोधावीच लागेल. बर उद्याची कविता एकदा डोळ्याखालून घालू या. उगाचच आपल्या दुःखाची झालर दूर सारून आनंदाचे क्षण साजरे करू या."

पाहुया पुढच्या भागात काय होते.....

©अश्विनी मिश्रीकोटकर