Login

ओंजळीत माझ्या सुखाचे चांदणे....७

कथामालिका
ओंजळीत माझ्या ७

आता तर केतकीची झोपच उडाली होती. आपल्याला आता काही तरी निर्णय घ्यावाच लागणार. तिने मन कठोर केले आणि येत्या काही दिवसांत नवीन नोकरी शोधावीच लागेल. बघू या. बर उद्याची कविता एकदा डोळ्याखालून घालू या.

पाहुया पुढे...

केतकीची कविता पुर्ण झाली होती. पण विचारांचे चक्रही डोक्यात सुरू झाले होते. आता उद्याचा दिवस झाला की मग बघु या. झोपायला तिला बराच उशीर झाला होता.

केतकी दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर निघाली. मनाची चलबिचल सुरू झाली होती. ‌तिला अन्न गोड लागत नव्हते. आजही ती न खाता पिता निघाली होती. दहा वाजता कविसंमेलन सुरू होणार होते. ती नियोजित ठिकाणी पोहोचली. पण कार्यक्रम सुरू व्हायला थोडा वेळ होता.‌ एरवी आवर्जून समोर जाऊन बसणारी केतकी आज मात्र अगदी शेवटी एका कोपऱ्यात जाऊन बसली. जवळपास अर्ध्या तासानंतर कार्यक्रम सुरू झाला. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर भाषणे झाली. त्यानंतर एका मागोमाग एक कवी कवयित्री येऊन आपले सादरीकरण करत होते. दुपारचे दोन वाजत आले. तिचे नाव पुकारले होते. पण विचारांच्या तंद्रीत तिचे लक्षच नव्हते. एकदा दोनदा नाव घेऊनही ती उठली नाही म्हणून अद्वैत तिच्या जवळ आला.

"केतकी मॅडम तुमचे नाव घेत आहे. तुम्हाला सादरीकरण करण्यासाठी स्टेजवर बोलवत आहे."

"तुम्ही इथे कसे?"

"आत्ता ते महत्त्वाचे नाही. तुम्ही जा स्टेजवर."

ती उठली आणि स्टेजवर गेली.

अतीव दुःखाचे चांदणे
कोरून चंद्र प्याले
निमिषात जाणीवेच्या
मन आक्रंदीत झाले....

ओंजळीत माझ्या सुखाची ‌..
कशीबशी कविता तिने सादर केली आणि सरळ ती हाॅलमधून बाहेर पडली. अद्वैत तिच्याकडे बघतच होता. तिचे मन थाऱ्यावर नाही. हे जाणून होता. त्यामुळे तो सुद्धा तिच्या मागे गेला. दोन दिवसांपासून तिची तब्येत बिघडली होती. आज तर तिच्यावर मानसिक ताण पडत होता आणि पुन्हा एकदा तिला चक्कर आली. पण यावेळी ती बराच वेळ शुध्दीवर आली नाही. त्यामुळे तिला हाॅस्पीटलला ॲडमिट करावे लागले. अद्वैत तिच्या सोबतच होता.

"डॉक्टर काय झाले त्यांना?"

"अहो, तुम्ही त्यांचे पतीचं ना ! अशी कशी काळजी घेता. त्यांचे बी पी शुट झाले आहे. हिमोग्लोबीन सुध्दा कमी वाटत आहे आणि त्यांना दोन तीन दिवस तरी ठेवावे लागणार आहे. आधी तुम्ही ही औषधी घेऊन या. "

"पण त्या शुध्दीवर कधी येतील?"

"लवकरच येतील शुध्दीवर. तुम्ही आधी औषधी घेऊन या‌. आम्ही त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. तुम्ही काळजी करू नका."

अद्वैत लगेच औषधी आणायला गेला.‌ त्याने औषधी आणून दिली. पण आता काय करायचे काहीच सुचत नव्हते. यांना इथे एकटे कसे सोडायचे? यांच्या जवळ कोणी तरी हवेच आणि माझ्या शिवाय कोणाला सांगू मी. त्यांच्या आईला सांगू का? नको .... त्यांच्या मनात आधीच केतकी मॅडमविषयी शंका येत आहे. मलाच त्यांची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.

अद्वैत येरझारा घालत होता.

"सिस्टर कशा आहेत त्या?"

"अहो, त्यांना सलाईन लावले आहे. होईल लवकर त्या बऱ्या. पण अजूनही शुध्दीवर नाही आल्या."

दोन तास होऊन गेले होते. पण तरीही केतकी शुध्दीवर आल्या नव्हत्या. संध्याकाळचे साडेचार वाजत आले होते.

तेवढ्यात नर्स बाहेर आली.

"अहो, सर तुम्हाला डॉक्टरांनी भेटायला बोलावले आहे. "

" डॉक्टर, काय झाले? काही टेन्शनच काम तर नाही ना. केतकी मॅडम बऱ्या आहेत‌ ना."

"तुम्ही रोज सोबत राहता ना. तरीही त्यांची तब्येत बरी नाही. हे सुध्दा कळलं नाही का तुम्हाला!"

"साॅरी. आम्ही फक्त चांगले...."
अद्वैतच वाक्य अर्धवटच राहिले.

"डॉक्टर, पेशंट शुध्दीवर आला आहे. "

"हो ठीक आहे. चला मिस्टर अद्वैत. "

"कशा आहात केतकी? बर वाटतंय का आता?"

"हो डॉक्टर. ‌ पण मी इथे कशी? मला कोणी आणले?"

"अहो, कोणी म्हणजे ? तुमच्या मिस्टरांनी."

"सिस्टर त्यांना आत बोलवा."

अद्वैतला बघताच केतकी ने मान फिरवली.

"हे काय तुमचं काही बिनसलं आहे का? अहो, आभार माना तुमच्या मिस्टरांचे त्यांनी तुम्हाला वेळेवर दवाखान्यात आणले आणि हे बघा तुम्ही अजुनही पुर्णपणे बऱ्या झाल्या नाहीत. तेव्हा उद्याचा दिवस तुम्हाला अंडर ऑफजर्वेशन ठेवत आहोत. "

"पण डॉक्टर मी बरी आहे आता. मला जावेच लागेल." अचानक ती उठून उभे राहण्याचा प्रयत्न करू लागली. पण परत तिला चक्कर आली. तेवढ्यात अद्वैतने तिला सावरले.

" केतकी मॅडम तुमचा बी पी लोक झाला आहे. अजुनही तुम्हाला बर वाटत नाही. तेव्हा घरी जाण्याची घाई करायची नाही. पुर्ण आराम करा."

"मिस्टर अद्वैत त्यांना मऊ खिचडी, सूप आणि फळ खायला देऊ शकता. काळजी घ्या. आम्ही आहोतच."

डॉक्टर निघून जातात.

"अद्वैत सर तुम्ही मला इथे आणले त्यासाठी खरच खूप धन्यवाद . पण आता तुम्ही जा. मी घेईल माझी काळजी. "

"साॅरी केतकी. मी तुम्हाला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. तुम्ही आराम करा. मी येतो फळ वगैरे घेऊन."

केतकीला शांत झोप लागते. केतकी अद्वैतच्या प्रेमाला होकार देते की नाही. पाहुया पुढच्या भागात....

© अश्विनी मिश्रीकोटकर