ओंजळीत माझ्या ८
अद्वैत फळ आणायला बाहेर जातो आणि केतकीला मात्र शांत झोप लागते.
पाहुया पुढे.....
तेवढ्यात डीन सरांचा फोन येतो.
"केतकी मॅडम, अभिनंदन. यावेळी सुध्दा तुम्ही आपल्या महाविद्यालयाचे नाव गाजवले. पण तुम्ही निकाल लागेपर्यंत थांबल्या का नाही? बक्षीस घेण्यासाठी सुध्दा नव्हत्या! यावेळी सुध्दा तुम्ही कविसंमेलनात बक्षीस मिळवले आहे. बर ते जाऊ द्या. उद्या तुमचा सत्कार ठेवला आहे. तेव्हा वेळेवर या आणि ते अद्वैत सर सुध्दा आले नाही. त्यांनाही फोन करत होतो आता."
"हॅलो केतकी मॅडम. तुम्ही काहीच बोलत का नाही."
"सर, केतकी मॅडमचा फोन माझ्याकडे राहिला आहे. "
"मग त्या कुठे आहेत ? त्या तुमच्या सोबत आहोत का?"
"सर त्या दवाखान्यात ॲडमिट आहे."
"काय झालं त्यांना ? आता कशा आहे त्या? कधी ॲडमिट केले? कोणत्या दवाखान्यात?"
"सर, त्यांचे बी पी शुट झाले होते. पण आता त्या ठीक आहे. पण अजून दोन दिवस तरी दवाखान्यात ठेवावे लागणार आहे. "
"ठीक आहे. पण त्यांच्या सोबत तुम्ही आहात ना. मी रात्री येतो भेटायला."
"हो सर."
ठरल्याप्रमाणे डीन सर दवाखान्यात येऊन केतकीला भेटायला येतात.
"केतकी मॅडम कशा आहात? बर वाटतेय ना आता ? बहुतेक उद्या सुट्टी होऊन जाईल."
"ओके. तुम्हाला काही लागलं तर नक्की कळवा !"
"सर नर्स आहेत त्यामुळे काळजीच काम नाही."
"अद्वैत सर, जरा बाहेर येता."
"सर तुम्ही काळजी करू नका. मी आहे त्यांच्या सोबत."
"मला तेच म्हणायचे होते. त्यांच्या घरून कोणी येण्यासारखे नाही का?"
"नाही सर. त्यांनी कोणालाच सांगितले नाही. तुम्ही काळजी करू नका. मी आहे सोबत. मी फक्त उद्याच्या दिवस काॅलेजमध्ये येणे जमणार नाही. "
"मी समजू शकतो. तुम्हीच त्यांचे एकमेव आणि चांगले कलिग आहात."
"चला मी येतो. टेक केअर."
अद्वैत सरांना निरोप देतो आणि केतकी साठी खिचडी आणायला जातो.
इकडे केतकीच्या डोळ्यात पाणी आले. खरच मी चुकले अद्वैत सरांना समजून घेण्यात. ती विचारात इतकी हरवली की अद्वैत तिच्या समोर खिचडी घेऊन उभा आहे हे सुध्दा कळले नाही.
"केतकी मॅडम, गरमागरम खिचडी आणली आहे. खाऊन घ्या."
"नको मला."
"अहो, असं करून कसं चालेल."
"प्लीज... थोडस खाऊन घ्या."
त्याचा चेहरा बघताच तिने डोळ्यातले पाणी पुसले आणि उठून बसली. पण एका हाताला सलाईन असल्याने तिला नीट खाता येत नव्हते. मग अद्वैतने तिला स्वतः च्या हाताने भरवले. इतकी काळजी घेणारा, आपल्यासाठी स्वतः चा अख्खा दिवस आणि वेळ घालवणारा. पण आपण किती दुखवले.
"साॅरी,"
"कशाबद्दल?"
"असच. बर तुम्ही काही खाल्लं आहे का?"
तो काहीच बोलला नाही.
"अद्वैत, तुमची दिवसभर धावपळ झाली आहे. तेव्हा प्लीज काहीतरी खाऊन या."
अद्वैतने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
"अद्वैत, प्लीज. नाही तर उद्या तुम्हाला सलाईन लावावे लागेल आणि माझ्या जागी तुम्ही असाल."
एक गोड स्माईल देत बोलली.
एक गोड स्माईल देत बोलली.
केतकीच्या या बोलण्याने अद्वैत सुध्दा थोडासा हसला. त्यानेच डोळ्याने तू काळजी करू नकोस असे भासवले.
दोघांच्याही मनात एक भिती डोकावत होती. उद्या काॅलेजमध्ये दोघेही नाही. उगाचच चर्चा रंगणार. आपणच बोलण्याची संधी देणार.
"मी काय म्हणते अद्वैत सर. रात्रभर इथे थांबण्याची गरज नाही आणि उद्या तुम्ही काॅलेज बुडवण्याची सुध्दा. मी ठीक आहे आता. मी माझी काळजी घेऊ शकते. "
"किती दिवस टाळणार मला. आपल्या दोघांनाही एकमेकांच्या आधाराची, प्रेमाची, विश्वासाची गरज आहे. समाज काय म्हणेल? हाच विचार जर करत बसलो तर ...."
केतकीच्या मनावर दडपण आले होते. तिच्या डोळ्यात चटकन पाणी आले. मन आतल्या आत आक्रंदत होते. छातीत धडधड वाढली. अचानक तिला त्रास व्हायला लागला. अद्वैत डॉक्टरांना बोलवायला गेला.
डॉक्टरांनी तिला चेक केले. पटकन एक इंजेक्शन देऊन तिला स्टेबल केले.
"केतकी तुम्ही एवढ्या हायपर का होत आहात? काही टेन्शन आहे का ? असच जर टेन्शन घेत राहिल्यास तर अवघड होईल सगळ."
"तसही जगून काय करणार?"
"म्हणून मरण हेच सोल्यूशन आहे का ? अद्वैत सर सांभाळा तुमच्या मिसेसला. नाही तर...केस हाताबाहेर जाईल."
"हो डॉक्टर."
डॉक्टर निघून जातात.
"केतकी आय ॲम साॅरी. मी यापुढे तुमच्याकडे हा विषय काढणार नाही. तुम्ही विश्रांती घ्या आता. पण मरणाच्या गोष्टी करू नका."
तो सुद्धा नातेवाईकांसाठी असलेल्या बाजुच्या बेड वर झोपला. दोघांच्या मध्ये अंतर कमी होत. पण मनातल अंतर वाढत गेलं होतं. अद्वैतने स्वतः ला सिध्द करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. पण सगळे व्यर्थच गेले. दवाखान्यातल्या भयाण शांततेत वास्तवाचे भान ठेवून दोघेही झोपण्याचा प्रयत्न करू लागली. त्यांचे शरीर थकलेले होते. पण मनातले वादळ शमतच नव्हते. केतकी अंग चोरुन झोपली होती. आजपर्यत अशी वेळच आली नव्हती. एका ओळखीच्या पण परक्या पुरूषाबरोबर एकत्र..... बराच वेळाने त्यांना झोप लागली. सकाळी जाग आली ती बाहेरच्या आवाजाने.
पाहुया पुढच्या भागात केतकी अद्वैतच्या प्रेमाला हो म्हणते की नाही.....
©® अश्विनी मिश्रीकोटकर