ओंजळीतील प्राजक्त -भाग 1
© डॉ समृद्धी रायबागकर, अमरावती
"राधाक्का....," जाईने हाक मारत फाटक उघडले.
"या ठमाबाई," प्रसन्न हसत राधाक्काने तिचं स्वागत केलं.
"पुन्हा ठमाबाई?, मी ना खरेच बोलणार नाही हं राधाक्का तुमच्यासोबत," जाई फुरगुटून म्हणाली.
"राग तर नाकाच्या शेंड्यावर घेऊनच फिरते आमची लाडोबा," राधाक्का हसत म्हणाल्या.
"अरे लाडोबा काय, ठमाबाई काय, मी काय लहान राहिले का आता? 'जाई', किती सुंदर नाव आहे माझे, पण तुम्ही ना ऐकतच नाही," जाई तक्रार करू लागली.
"बरं बाई, या जाई मॅडम, तुमचा पारिजातक वाट बघतोय तुमची."
पारिजातकाचं नाव काढताच जाईचा लटका राग पळून गेला आणि खुदकन हसत ती राधाक्का ला बिलगली.
राधाक्काचा छोटा बंगला आणि त्यासमोर फुलांनी बहरलेली बाग सगळ्या एरियात फेमस होती. अगदी छोटीशी होती तेव्हापासून जाई पारिजातक वेचायला यायची.
बागेत इतरही फुलझाडं बहरलेली होती पण तिला पारिजातकाचं फार वेड.
रोज अगदी भल्या पहाटे राधाक्काकडे पारिजातकाचा सडा वेचायला ती जायची. किती घेऊ नि किती नाही असं तिचं व्हायचं.
बघता बघता तारुण्यात पदार्पण केले पण जाईची पारिजातकाबद्दलची ओढ यत्किंचितही कमी झाली नाही.
लहान असतानाही कुणी जर पारिजातकाचा सडा वेचायला आले तर ती चिडून भांडून रागावून बोलायची.
माझ्याशिवाय दुसऱ्या कुणी नाही वेचायची ही फुलं हा तिचा हट्ट.
पण ती इतकी लाघवी होती की राधाआक्काच्या गळ्यांतील ताईत बनली होती.

एकदिवस जाई पारिजातक वेचत असताना आवाज आला,"एक्सक्युज मी."
जाईने वळून बघितले तर एक हँडसम हंक, रुबाबदार, उंचपुरा, अगदी लक्ष वेधून घेणारा तरुण फाटकाबाहेर उभा होता.
"मला थोडी फुलं हवी आहेत, घेऊ का?," तो विचारत होता.
"राधाक्का...," जाईने आवाज दिला.
"नमस्ते काकू, मी अनय, या एरियात आम्ही नवीनच राहायला आलोय. समोरच्या चौकात तो कोपऱ्यावरचा बंगला आहे ना, तिथे. आज थोडी फुले हवी होती, घेऊ का?, "अनय परिचय देत म्हणाला.
"अरे घे ना. ये आत ये. तुला हवी ती आणि हवी तेवढी फुलं घेऊन जा हं," राधाक्का म्हणाली.
त्याचे अदबीने बोलणे, वागणे राधाक्काला एकदम आवडून गेले होते.
"खूप सारी नको आहेत फक्त पारिजातकाची फुलं तेवढी नेतो," अनय उद्गारला.
जाईने एक तीव्र कटाक्ष त्याच्याकडे टाकला पण राधाक्काने हो म्हटल्यामुळे तिला काही बोलता येईना.
राधाक्का देखील त्याची आणखी विचारपूस करत होती. त्याच्याबद्दल, त्याच्या घराबद्दल, नोकरीबद्दल. आणि तो देखील नम्रतेने उत्तरे देत होता.
"अनय, ये रे इकडे. ही आमची जाई. जवळच राहते इकडे. लहानपणापासून येते परिजातकाचा सडा वेचायला.
आमचा पारिजातक आणि जाई यांची फार गट्टी आहे बरं का," राधाक्का उत्साहात बोलत होत्या.
आमचा पारिजातक आणि जाई यांची फार गट्टी आहे बरं का," राधाक्का उत्साहात बोलत होत्या.
जाईचे फुगलेले गाल बघून त्यांना हसायला येत होते, 'वयाने मोठी झाली पण अल्लडपणा अगदी तसाच आहे पोरीचा,' राधाक्का विचार करत होत्या.
"हॅलो," अनयने जाईला म्हटले. त्यावर उत्तर म्हणून जबरदस्तीचे हसू जाईच्या चेहऱ्यावर होते.
तिच्याकडे बघून त्याने स्मितहास्य केले आणि फक्त ओंजळीभर फुलं वेचून समाधानाने निघूनही गेला पण तिला मात्र राग आला आता आपल्या पारिजातकात वाटेकरी आला म्हणून.
"हे काय राधाक्का, का हो म्हटलंत तुम्ही? आता दररोज आला तो तर?" इति जाई.
"अगं, येऊ देत ना. कितीसारी फुलं असतात. नेली त्याने तर काय बिघडतंय."
जाई गप्प झाली. मनातून खट्टू झाली.
"लहान असती तर कचकच भांडली असती त्याच्याशी. लहानपणी बाकीच्यांना पळवून लावायचे तसे यालाही पळवून लावले असते.
पण राधाक्का ना...उगाच कुणालाही येऊ देतात," जाई हळूच पुटपुटत होती.
पण राधाक्का ना...उगाच कुणालाही येऊ देतात," जाई हळूच पुटपुटत होती.
राधाक्का सुद्धा वाट बघत होती जाई काही बोलते का अनयला. पण तिची चुप्पी बघून त्यांनाही आश्चर्य वाटले होते.
खरंतर त्या दोघांना सडा वाचताना बघून त्यांना तीव्रतेने जाणवले होते की दोघांचा जोडा चांगला दिसतोय. जमायला हवं यांचं.
पारिजातकावर सोपवूया हे काम असा विचार करत त्या मंद हसल्या.
नाही म्हटले तरी अनयचा रुबाबदार देखणेपणा आणि वागण्यातला नम्रपणा त्या काही मिनिटात जाईच्या मनात स्थान मिळवू बघत होता. हे तिच्या आणि राधाक्कांच्या लक्षात आले होते.
"पारिजातकाला खूप हाताळलेलं नाही आवडत. अगदी अलवारपणे झाडापासून अलगद खाली पडतात तसेच हळुवारपणे ती वेचावी पण लागतात," जाई स्वतःशीच बोलत होती.
"म्हणून मी कुणाला फुले वेचायला नाही म्हणत असते. धुसमुसळेपणा नाही सहन होत त्याला," अचानक ती राधाक्काला म्हणाली.
"म्हणून मी कुणाला फुले वेचायला नाही म्हणत असते. धुसमुसळेपणा नाही सहन होत त्याला," अचानक ती राधाक्काला म्हणाली.
"अगं पण अनय ने कुठे धसमुसळेपणा केला. तो बिचारा चुपचाप आला, अगदी ओंजळीभर फुले घेतली आणि निघूनही गेला," इति राधाक्का.
जाई विचारात पडली. अनय खरंच नाजूकपणे वागला होता तिच्या पारिजातकासोबत.
तिला विचारात बघून राधाक्का पुन्हा एकदा आश्वासक हसल्या आणि अनयची जादू चालणार बहुदा इथे याचा आनंद त्यांना झाला.
'माणसांची पारख आहे आपल्याला.
अनयचे वागणे बोलणे घरंदाज आहे.
चौकशी करून ठरवते त्याला रोज येऊ द्यायचे की नाही? त्याला जाई आणि पारिजातकासोबत वेळ घालवू द्यायचा की नाही?', राधाक्काने मनाशी ठरवले.
अनयचे वागणे बोलणे घरंदाज आहे.
चौकशी करून ठरवते त्याला रोज येऊ द्यायचे की नाही? त्याला जाई आणि पारिजातकासोबत वेळ घालवू द्यायचा की नाही?', राधाक्काने मनाशी ठरवले.
क्रमशः
(कशी फुलेल जाई आणि अनयची प्रेमकथा? नक्की वाचा,पुढील 3 भागांत)
(कशी फुलेल जाई आणि अनयची प्रेमकथा? नक्की वाचा,पुढील 3 भागांत)
© डॉ समृद्धी अनंत रायबागकर, अमरावती
#अष्टपैलूस्पर्धा2025
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा