चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )
शीर्षक : ऑनलाईन भूलभुलैय्या
नाशिकच्या एका फ्लॅटमध्ये नीलम आणि तिचं कुटुंब राहत होतं.
सासू-सासरे, नवरा — अमोल आणि नीलम.
सासू-सासरे, नवरा — अमोल आणि नीलम.
अमोल एम.एन.सीमध्ये नोकरीला होता. सकाळी नऊला घराबाहेर पडायचा आणि रात्री यायला उशीर व्हायचा.
घरात सासू आणि सासरे आपल्या कामात मग्न असायचे. त्यांचे पूजा-पाठ, सोसायटीमधले मित्र -मैत्रिणी असे काही सुरू असायचे.
नीलमच्या लग्नाला एकच वर्ष झाले होते म्हणून तिची एवढी काही ओळख नव्हती झाली.
ती गृहिणी होती. वेळ मिळाला की ती मोबाइलवर सोशल मीडियावर फिरत असे. तिला एकटेपणा जाणवायचा; पण ती कुणाला सांगत नव्हती.
एके दिवशी फेसबुकवर तिला रोहन नावाच्या मुलाचा मेसेज येतो.
रोहन : हाय मॅडम, तुमचा प्रोफाइल खूप इंटरेस्टिंग वाटतोय. मैत्री कराल का?
नीलमला रोजच असे मेसेज यायचे म्हणून तिने लक्ष नाही दिले.
दुसऱ्या दिवशी परत मेसेज येतो तेव्हा नीलम विचार करते, 'हा सभ्य दिसतोय.'
मग ती उत्तर देते, "हाय... पण मी जास्त अनोळखी लोकांशी बोलत नाही."
रोहन : पूर्ण आदर ठेवून बोलतोय. फक्त मित्र म्हणून. काही चुकीचा उद्देश नाही.
अशाप्रकारे हळूहळू त्यांचा संवाद सुरू होतो.
काही दिवस गेले, ते रोज बोलत होते. रोहन रोज चौकशी करू लागलेला.
काही दिवस गेले, ते रोज बोलत होते. रोहन रोज चौकशी करू लागलेला.
रोहन : आजचा दिवस कसा गेला?
नीलम : सामान्यच. घरकाम... स्वयंपाक...
रोहन : तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो का? तुम्ही मैत्रीण म्हणून खूप छान वाटता.
नीलमला वाटलं, 'घरात कुणी फारसं बोलत नाही. हा किमान ऐकून तर घेतो.'
तिचा विश्वास बसायला लागला होता. त्यामुळे ती जरा मोकळेपणानं बोलायला लागली.
रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी — सासूच्या अपेक्षा, नवऱ्याचा व्यस्त स्वभाव, तिचे छंद — सगळं ती त्याला सांगू लागली होती.
एका दिवशी रोहन म्हणाला, "आपण फक्त चॅटच करत राहायचं का? एखाद्या कॅफेत भेटलो तर जास्त छान होईल."
नीलम थोडी संकोचली आणि म्हणाली, "नको मी लग्न झालेली आहे."
रोहन म्हणाला, "अरे, मी काही वाईट नाही बोललो. फक्त कॉफी प्यायली तर कुणाचं काय जाणार आहे?"
बराच विचार करून नीलम तयार झाली आणि अखेर ते दोघं कॅफेत भेटले.
रोहन व्यवस्थित कपडे घातलेला होता आणि बोलण्यात पण छान गोडवा होता. तो फक्त मैत्रीचं नातं टिकवेल असं तिला वाटलं.
रोहन व्यवस्थित कपडे घातलेला होता आणि बोलण्यात पण छान गोडवा होता. तो फक्त मैत्रीचं नातं टिकवेल असं तिला वाटलं.
हळूहळू त्यांच्या भेटी वाढल्या. कधी कॉफी, कधी लंच...
नीलम रोहनवर विश्वास ठेवू लागली होती.
नीलम : खरं सांगू का रोहन, कधी कधी खूप एकटं वाटतं. नवरा कामात असतो. सासू-सासरे आपापल्या जगात.
रोहन : मी आहे ना! तू मला काहीही सांगू शकते.
नीलमने मन मोकळं करायला सुरुवात केली. तिला वाटलं होतं की हा माणूस खरंच आपल्याला समजून घेतो.
रोहन : मी आहे ना! तू मला काहीही सांगू शकते.
नीलमने मन मोकळं करायला सुरुवात केली. तिला वाटलं होतं की हा माणूस खरंच आपल्याला समजून घेतो.
एका दिवशी कुरिअर आले. सुंदर पॅकिंगमध्ये एक छोटसं गिफ्ट.
त्यात परफ्युम आणि एक छोटा म्युझिक बॉक्स होते.
नीलम : वा, रोहन! खूप सुंदर गिफ्ट आहे; पण हे कशाला?
त्यात परफ्युम आणि एक छोटा म्युझिक बॉक्स होते.
नीलम : वा, रोहन! खूप सुंदर गिफ्ट आहे; पण हे कशाला?
रोहन : अगं फ्रेंडला गिफ्ट नाही देऊ शकत का? तुझ्या हसण्यापेक्षा सुंदर काहीच नाही.
नीलमला ऐकून थोडं विचित्र वाटलं.
नीलम : मी फक्त मित्र म्हणून तुला ओळखते, प्लीज वेगळं काही समजू नकोस.
रोहन : अगं तसं नाही. फक्त आपुलकीने दिले आहे.
काही दिवस गेले.
रोहनचा स्वभाव बदलायला लागला होता. तो वारंवार विचारू लागला —"आज तू कुठे गेलीस?"
रोहनचा स्वभाव बदलायला लागला होता. तो वारंवार विचारू लागला —"आज तू कुठे गेलीस?"
नीलम म्हणाली, "घरीच आहे."
रोहन म्हणाला, " खोटं बोलू नकोस. मला सगळं माहिती आहे."
रोहन म्हणाला, " खोटं बोलू नकोस. मला सगळं माहिती आहे."
नीलम चकित झालेली.
ती म्हणाली, " काय म्हणतोस? तुला कसं माहिती?"
रोहन हसत म्हणाला, "मला सगळं माहितीये. तुझ्या घरातल्या सगळ्या हालचाली मी पाहू शकतो. ते गिफ्ट आठवतायत का?कॅमेरा लावून पाठवला आहे मी त्यात."
नीलमच्या अंगावर काटा आला.
नीलम : तू असं कसं करू शकतो? मी तुला मित्र मानलं.
रोहन (धमकीच्या सुरात) : मित्रच आहे ना.; पण आता मी जे बोलेन ते करावं लागेल. नाही तर तुझे फोटो, तुझे घरचे व्हिडिओ... सगळं मी लीक करीन.
तिने रोहनने दिलेले सगळे गिफ्ट जाळून टाकले.
नीलम रात्रभर झोपली नाही.
ती मनात म्हणाली, 'जर खरंच हे फोटो बाहेर गेले, तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. घरच्यांना काय तोंड दाखवणार?'
ती काही दिवस शांत राहिली. रोहनच्या मेसेजला घाबरत उत्तर द्यायची. तो रोज धमक्या द्यायचा.
एका संध्याकाळी अमोल घरी आला. त्याने पाहिलं की नीलम खूप उदास आणि शांत आहे.
अमोल म्हणाला, "काय झालं गं? काही त्रास आहे का?"
नीलमच्या डोळ्यांत पाणी आलं.
नीलम, "मला तुम्हाला काही सांगायचं आहे; पण भीती वाटतीये."
अमोल, "सगळं सांग खरं खरं. मी तुझ्या सोबत आहे."
नीलमनी सगळं सांगितलं —ऑनलाईन मैत्री, भेटी, गिफ्ट्स आणि फोटोचं प्रकरण.
अमोल रागानं थरथरला.
अमोल, "हे कसले लोक आहेत! तू निरागसपणे मैत्री मानलीस. चूक त्याचीच आहे; पण आता तू लक्षात घे."
अमोल, "हे कसले लोक आहेत! तू निरागसपणे मैत्री मानलीस. चूक त्याचीच आहे; पण आता तू लक्षात घे."
अमोलनं दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार केली. सायबर क्राईम विभागानं लगेच लक्ष घातलं. एक ट्रॅप रचला गेला.
नीलमला रोहनला ठरावीक ठिकाणी बोलवायला सांगितलं.
नीलमला रोहनला ठरावीक ठिकाणी बोलवायला सांगितलं.
तो आला आणि पोलिसांनी त्याला पकडलं. त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, हार्ड ड्राईव्ह जप्त करण्यात आले.
पोलीस अधिकारी म्हणाले, "सर्व डेटा डिलिट केला जाईल. तुम्ही काळजी करू नका."
घरी आल्यावर अमोलनं नीलमचा हात धरला.
अमोल, "नीलम, तुला कदाचित अपराधी वाटतं असेल; पण माझ्यासाठी महत्त्वाचं आहे की तू माझ्यावर विश्वास ठेवून सगळं सांगितलं. आता मी तुला कधीच एकटा पडू देणार नाही."
नीलम रडत म्हणाली, "माफ करा मला. मी आधीच तुम्हाला सांगायला हवं होतं."
"आता सगळं संपलं आहे. पुढे आपण दोघं काळजी घेऊ."
अमोलने म्हणताच नीलमच्या मनावरचा भार हलका झाला.
तिला उमगलं —'मैत्री फक्त योग्य लोकांशीच करावी. ऑनलाईन जग खूप भ्रामक आहे.'
तिला उमगलं —'मैत्री फक्त योग्य लोकांशीच करावी. ऑनलाईन जग खूप भ्रामक आहे.'
नीलमने त्या प्रसंगातून धडा घेतला आणि नवरा-बायकोमधला विश्वास अजून घट्ट झाला.
समाप्त.
©® निकिता पाठक जोग
©® निकिता पाठक जोग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा