ऑनलाईन प्रेम...भाग 2
पण जेव्हा जेव्हा तिला बोलायचं असायचं तो ऑफलाईन रहायचा. तिला असं वाटत होतं की, तो टाळतोय तिला.
तो बोलला नाही की, ती अस्वस्थ व्हायची. त्याला सतत मेसेज पाठवायची, पण तो मेसेजचे उत्तर देत नव्हता.
"समीर काय झालं? का बोलत नाहीस माझ्याशी? बोल प्लीज, तुझं असं गप्प राहणे मला सहन होत नाहीये. दोन मिनिट तरी बोलं."
तो त्याच्या मनात असेल तर बोलायचा, नाही तर नाही ही गोष्ट तिच्या लक्षात आली. सगळं तिला कळतं होतं, पण वळत नव्हतं.
एक दिवस मेसेज आला. पैशाची मागणी झाली. तिला द्यायचे नव्हते, पण त्याने खूप विनंती केली, म्हणून तिने त्याला ऑनलाईन पैसे पाठवले. आता काम असलं की बोलणे, हा त्याचा नित्यक्रम झाला होता; पण तिला त्याचा त्रास होतं होता.
पुन्हा बोलणं सुरू झालं आणि आता मर्यादा पलीकडे सगळं गेलं.
अश्लील बोलणे,शारीरिक संबंध इथपर्यंत बोलणं सुरू झालं. दोघेही एकमेकांपासून बरेच लांब असल्यामुळे भेटू शकत नव्हते, मग बोलून ते त्यांच्या शारीरिक भावना व्यक्त करायचे. तिला न आवडून सुद्धा फक्त त्याच्यासाठी त्याच्या हो ला हो करायची.
तिला फक्त त्याचे प्रेमाचे दोन शब्द हवे असायचे, पण त्याला फक्त शारीरिक सुख.
दिवस सरकत होते. पूजा त्यात गुंतत जात होती. तिचं मन तिच्या ताब्यात नव्हतं, हे चुकीचं आहे कळत असूनसुद्धा ती स्वतःला थांबवू शकत नव्हती. कुठेही लक्ष लागत नव्हतं. जणू काही तिला त्याचं वेड लागलेलं होतं. प्रेमाला वय नसतं. रंग, रूप नसतं, जणू हे सत्य वाटत होतं. दिवसभर मोबाईलवर त्याचे फोटो बघत बसायची.
दिवसागणिक ती मानसिकरीत्या खचत चालली होती. तिच्या मनातली भीती वाढत होती. याने मला ब्लॉक केल तर? याने माझे फोटो वायरल केले तर? नवर्याला कळलं तर? नाही नाही असं व्हायला नको. तिच्या मनातली भीती, त्याचं तिला टाळणं, तिच्या मनातील अस्वस्थता वाढवत होतं.
तिला शारीरिक सुखापेक्षा मन जपण जास्त महत्वाचं होतं.
सतत त्याच्या विचारात असायची. रात्री उशिरापर्यंत त्याच्या मेसेजची वाट बघत असायची. रात्रीचं जागरण, तिची खालावत चाललेली तब्येत, सगळ आटोक्याबाहेर गेलं आणि एक दिवस तिने तिचं आयुष्य संपवलं.
सतत त्याच्या विचारात असायची. रात्री उशिरापर्यंत त्याच्या मेसेजची वाट बघत असायची. रात्रीचं जागरण, तिची खालावत चाललेली तब्येत, सगळ आटोक्याबाहेर गेलं आणि एक दिवस तिने तिचं आयुष्य संपवलं.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
ऋतुजा वैरागडकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा