Login

ऑनलाईन प्रेम...भाग 3 अंतिम

कुणाच्याही जीवाशी असे खेळू नका
ऑनलाईन प्रेम...भाग 3 अंतिम

ऐकून धक्का बसला ना. पुढे अजून धक्कादायक आहे.
तिच्या नकळत ती नेहमी तिच्या हेल्थ इश्यूबद्दल त्याच्याशी बोलायची. तो फक्त ऐकायचा, पण त्याने तिला कधी विचारलं  नव्हतं तिला की काय झालं.

"समीर ऐक ना.."

"बोला."

"आज बरं वाटतं नाही आहे, खूप अस्वस्थ व्हायला लागलं."

"ह्म्म काळजी घ्यायची ना." त्याच्या बोलण्यात फक्त औपचारिकता असायची.

एकदा तिला वाटलं होतं, त्याला सगळी सत्य परिस्थिती सांगावी; पण हिम्मत होतं नव्हती. कारण तिला त्याला त्रास द्यायचा नव्हता. ती खूप साधी, सरळ आणि हळवी होती.
तिच्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास झालेला तिला चालत नव्हता.

ती आत्महत्या करून निघून गेली, पण तिच्या मागे बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.


पूजाने आत्महत्या का केली.
चौकशी सुरू झाली. मोबाईल स्ट्रेस करण्यात आला. शेवटचा मेसेज, शेवटचा कॉल सगळं चेक करण्यात आलं.

मोबाईलमधून मिळालेल्या माहितीनुसार समीरला चौकशीसाठी बोलावण्यात आलं.

पूजाचा नवरा, समीर आणि पोलीस इन्स्पेक्टर तिघेही बसले होते. इन्स्पेक्टरने चौकशी सुरू केली.

"तुझा पूजाशी काय संबध होता."

"ती माझी मैत्रिण होती."

"फक्त मैत्रीण?"

"हो."

"फक्त मैत्री होती तर, त्यापुढे मर्यादा ओलांडल्या कश्या गेल्या?"

"आम्ही फक्त चॅटिंगवर बोलायचो, त्यापुढे असं काहीही नव्हतं."

"पण तुझ्यामुळे तिला मानसिक त्रास झाला आणि तिने आत्महत्या केली." पूजाचा नवरा लगेच बोलला.

"नाही सर, असं नाही आहे."

"असचं आहे, काय माहीत होतं रे तुला तिच्याबद्दल. तुला काहीच माहीत नव्हतं. ती बिचारी....उरलेले सहा महिने तिला आनंदात घालवायचे होते. ती आनंदात रहावी, म्हणून आमचेही तसे प्रयत्न असायचे.
शेवटचे क्षण तिला मनसोक्त जगायचं होतं, पण हा एक महिना...हा एक महिना तिच्या आयुष्याचा काळ ठरला.

तिला जगायचं होतं रे... थोडे दिवस का होईना तिला जगायचं  होतं. तू...तू...घात केलास तिच्या जीवाचा. कॅन्सर झाला होता तिला. शेवटच्या स्टेजवर होती ती. सहा महिने होते तिच्याकडे. हे सहा महिने आम्हाला मनसोक्त जगायचं होतं. तिला मला सगळं द्यायचं होतं पण तू...तू आलास आणि सगळं उध्वस्त केलंस.

पूजाचा नवरा रडायला लागला.

पूजाला कॅन्सर झाला होता, हे ऐकून समीरला धक्का बसला. त्याच्या मनाला इतका जबर धक्का बसला की, त्यात त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि शेवटी त्याला मनोरुग्णालयात ठेवण्यात आलं.

मोबाईलमुळे लोकं जवळ आली, असे आपण म्हणतो. कारण मोबाईलमुळे दोन तीरावरील माणसे एकमेकांना बघू शकतात आणि बोलू शकतात, पण त्याचा कुणीही असा दुरुपयोग करायला नको. आपल्या घरात इतकी प्रेम करणारी माणसे असतात, तरी माणसाला बाहेरच्या प्रेमाची गरज का पडावी. विवाहबाह्य संबंध हा कॉमन विषय झाला आहे. का लोकांची मानसिकता बदलत चालली आहे? मनोवृत्तीही बदलत चालली आहे. गरज आहे विचार करण्याची हो ना?