Login

ऑनलाईन वाली लव्हस्टोरी पार्ट 2

Its a lovestory of two people who are living in different countries.


अस्मिता पुढचं शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या शहरामध्ये जाते.तिच्या वडिलांना जाऊ द्यायचं नसतंच मुळी पण लग्न जवळजवळ ठरल्यासारखंच आहे त्यामुळे त्यांनी पन शेवटी परवानगी दिली.

अमेयचे मेसेजस कॉल्स चालूच होते. अस्मितालाही ते attension आवडत होत तिला खूप special वाटत होता. तिला हवा तसा राजकुमार तिला भेटला होता.प्रत्यक्ष भेटला तसा नव्हताच पण ती खूप खुश होती.

2 वेगळ्या देशांमध्ये राहत असल्यामुळे time diffrerance होता. जेव्हा तिकडे सकाळ व्हायची तेव्हा अस्मिता कडे रात्र.त्यामुळे त्यांना एकमेकांसोबत बोलण्यासाठी अमेयला सकाळी लवकर उठाव लागे तर अस्मिताला रात्री उशिरा झोपावं लागे.

दोघे दिवसरात्र बोलायचे एकमेकांच्या आवडीनिवडी, त्यांचे स्वप्न, त्यांच्या इच्छा अपेक्षा सगळंसगळ बोलायचे. दोघांनाही एकमेकांना भेटायची ओढ लागली होती. पण अस्मिताला अजूनही असं वाटायचं की याने प्रत्यक्ष मला बघीतला तर कदाचित हा लग्नाला नकार देईल. तस ती पुन्हापुन्हा अमेयला सांगतही होती की माझे फोटोस खुप सुंदर येतात पण प्रत्यक्षात मी एवढी सुंदर नाही. Photogenic फेस आहे माझा फक्त बस एवढच. So तू ये आधी आपण दोघेच भेटू तू मला बघ आणि मग आपण पुढचं ठरवू.

पण अमेय तेव्हा ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता तो प्रेमात होता. प्रेम आंधळं असतं ते म्हणतात न ते अस. तो दिवस रात्र कधी पण कॉल करत असे आणि अस्मिता हॉस्टेल वर असल्यामुळे ती तो उचलू शकत होती पण जर कधी ती lecture मध्ये असेल आणि कॉल रिसिव्ह नाही करू शकली तर अमेय चे 50+ मिसकॉल असायचे.

एवढं वेड कसकाय असू शकतो कुणी कुणासाठी ते पण कधीही न भेटलेल्या व्यक्तीसाठी असं अस्मिता अमेयला विचारायची तेव्हा अमेय म्हणायचा मला तुला गमवायचा नाही आहे मला तूच बायको म्हणुन हवी आहेस.

असेच बोलता बोलता 6 months होऊन गेले. आणि अजून 2 month ने अमेय येणार होता. अस्मिताचे interviews स्टार्ट झाले होते. अमेय आणि अस्मिताच्या घरच्यांची इच्छा नव्हती की तिने ते द्यावे कारण 2 month मध्ये अमेय येणार होता आणि त्यांचं लग्न होणार होत. पण अस्मिताला कोणतीही आस लावून बसायचं नव्हत. नाही झाल सगळं ठरल्याप्रमाणे तर उगाच नाराज होऊन बसण्यापेक्षा मी माझं carreer करेल असं ठरवलं होत तिने.

पण जे नको व्हायला हवा तेच झाल अस्मिता आजारी पडली होती तिला खुप temrature होते तिने blood टेस्ट ही करायला टाकली होती अमेयने हट्ट धरला म्हणून.तिने हआजार असल्याच घरी सांगितलं नव्हत पण तरी दुसऱ्या दिवशी तिच्या घरचे तिला घरी घेऊन जाण्यासाठी समोर उभे होते. तिला वाटले नव्हते अमेय घरच्यांना सांगेल हे.... त्यामुळे तिला एकही इंटरव्यू देता आला नाही.


अमेय इंडिया मध्ये येण्याची date fix झाली. तो एकटाच येणार होता. आणि अस्मिता त्याला भेटायला रेल्वेस्टेशनला जाणार होती आणि त्याला घरी ड्रॉप करणार होती आणि असेच झालेही. पण हे दोघांच्याही घरी माहित नव्हतं..

जेव्हा पहिल्यांदा दोघांनी एकमेकांना बघितला तेव्हा अस्मिता ला मनोमनी वाटले की हा तर फोटोस मध्ये विडिओ कॉल वर जसा दिसायचा त्यापेक्षा 1000 पटीने जास्त handsome आणि fair आहे. आम्ही दोघे सोबत छान दिसू का?

आणि अमेयने काही खास रिस्पॉन्स नाही दिला. खूप थंड reaction होत त्याच means आपण एखादया व्यक्तिसोबाचत 9-10 महिने दिवसरात्र गप्पा मारत आहोत.त्याला भेटण्यासाठी सात समुद्र ओलांडून आलो आहोत. त्याला बघुन काहीतरी तर special reaction द्यायला हवं होत न..नाही काही तर एखाद फुल or कॉफी वगरे घेऊच शकलो असतो न पण त्याने तिला घरी ड्रॉप करायला लावले.

अमेयच्या मनात काय चालू आहे अस्मिताला कळेच न. अस्मिताची heartbeat खूप फास्ट झाली होती पण ती कशामुळे काय कळेच न.. ड्राईव्ह करताना तरी हा काही बोलेलं असं तिला वाटले. पण तो काही बोललाच नाही. गाडी घराच्या आधी पार्क करायला लावली घरच्यांना आम्ही सोबत दिसू नये म्हणुन तआणि तो गेला त्याच्या घरी.

अस्मिताला कळलेच नाही काय झाले ते. हा असा का वागला याला मी आवडले नाही का? मी हे विचारायला हवा होत का ? पण असं मी direct कस विचारणार. तुला मी आवडले की नाही सांग? . Messages वर कॉल वर बोलायला किती सोपं जायचं सगळ. मग आता बोलायला एवढं अवघडल्यासारखं का होतयं.. डोक्यामध्ये असंख्य विचारांचं काहूर झाल होत.

अमेय असा का वागला असेल काय होत त्याच्या मनात जाणून घेऊया पुढच्या भागात... 

🎭 Series Post

View all