Login

ऑनलाईन वाली लव्हस्टोरी पार्ट 3

Its a lovestory of 2 people who are living in different countries.

अस्मिता घरी आली खूप गोंधळलेली होती. तिला वाटलं संपल सगळ. घरच्यांना ही आपण सांगून देऊ काय झाल ते.जे होत ते चांगल्यासाठीच होत. त्याला नसेल आवडले मी so its ok. Lets move on.. तिच्या मनात हे विचार चालूच होते तेवढ्यात अमेय चा मेसेज आला. आम्ही येतोय उद्या तुला बघायला means कांदेपोहे च्या प्रोग्राम ला.

अस्मिता परत शॉक झाली 1-2 तासभरापूर्वी जे झाल ते काय होत मग. मी काहीतरी एक्सपेक्ट करत होते की तू काहीतरी कॉम्प्लिमेंट देशील. काहीतरी गिफ्ट आणशील, एखाद फुल वगरे आणशील, प्रपोस वगैरे करशील. गप्पा मारशील.काहीतरी तर बोलशील, कॉफी ला सुद्धा नाही म्हणालास .. असं का?

त्यावर अमेय बोलू लागला अग खूप थकलो होतो ग मी. 2 flights change करून मग टॅक्सी ने रेल्वेस्टेशन तिथून मग इथे असा almost 30 hour's चा हेक्टिक प्रवास करून पोहचलो होतो मी. त्यात मला वॉशरूम ला ही जाण्याची urge होती.

अस्मिता ला हसू की रडू तेच कळत नव्हत. माझा तुझ्या वागण्याचा विचार करून करून जीव गेला असता अमेय.. त्यावर तो म्हणला छान दिसत होतीस तू. आणि मग त्यांचं बोलणं सुरु झाल उदया सारी की ड्रेस, फॉर्मल की जीन्स घालणार. कोण कोण येणार वगैरे वगैरे..

तिने घरी सांगितलं अमेय घरी पोहचला आणि उद्या तो येतोय आपल्याकडे.(आम्ही भेटलो हे सांगितले नाही ह) तसा officially फोन करतील च तुम्हाला त्याच्या घरचे. आणि फोन आला तसा सगळ्या घरच्यांची आवराआवर, मामा काकांना फोन करून बोलावण वगैरे चालू झालं.

दुसऱ्या दिवशी अमेयला गुलाबजामून आवडता म्हणून अस्मिताने मिठाई मध्ये पप्पानां ते आणायला सांगितले. सगळी तयारी झाली होती. अस्मिताही छान तिच्या आईची पैठणी घालून रेडी झाली होती. नेहमीपेक्षा तिचा चेहरा खूपच खुललेला होता.नेहमी या सगळ्याचा तिला राग येई चिडचिड होई तिची पण आज जो कुणी येणार होता त्याला ती चांगलं ओळखत होती 8-9 महिन्यापासून त्याच्याशी बोलत होती त्याच्या प्रेमात पडली होती. घरातला वातावरणच खूप बदललं होता सगळ प्रसन्न वाटत होत.घरामध्ये सगळे काका काकू, मामा मामी, भाऊ सगळेच जमले होते .

मामी आणि मम्मीने छान पोह्यांची तयारी करून ठेवली होती. तेवढ्यात अमेय च्या घरच्यांच्या 2 गाड्या येतात आणि अस्मिता त्याला किचनच्या खिडकीतून बघायचा प्रयत्न करत असते. अमेय मस्त ब्लॅक फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट घालून आला होता, गोरापान असल्यामुळे ब्लॅक कलर खूप सूट होत होता त्याच्यावर. कुणीही एका नजरेत प्रेमात पडेल त्याच्या अशी पर्सनॅलिटी दिसत होती त्याची, मोठमोठ्या हिरोंना देखील मागे पाडेल असा दिसत होता तो... बाकी बायकांच सुद्धा मुलगा छान आहे हं.. हे त्याचे मामा असावे ते काका असं सगळं बोलणं दबक्या आवजात चालू होत kitchen मध्ये.

सगळी बैठक बसते. सगळ्यांची ओळख वगैरे होते. मग प्रवसाबद्दल बोलणं होत. कांदेपोहे खाऊन होतात. आणि मग अस्मिता सगळ्यांसाठी चहा घेऊन जाते. आणि चहा देऊन परत येते. सगळ्यांचा चहा घेऊन झाला की अस्मिताला बोलवण्यात येत आणि ती पण त्या बैठकीत सासुंजवळ बसते. मग नाव शिक्षण वगैरे typical question answer होतात. अस्मिता चे मामा देखील अमेय ला question विचारतात आणि शेवटी अमेयला विचारण्यात येत तुला काही विचारायचं असेल तर विचार त्यावर अमेय म्हणतो माझं फायनल आहे decision तुम्हालाच जे काय विचारायचं ते विचारून घ्या.

त्या दोघाना एकांतात काही बोलायचं असेल तर टेरेस वर जावून बोलून या असं सांगण्यात येत. ते जातातही खूप खुश असतात दोघेही. ज्या दिवसाची ते आतुरतेने वाट बघत होते तो finally आला होता.जो हात हाती घेण्यासाठी तो परदेशातून इथे आला होता तो हात आज त्याच्या हातात होता.. :)


पार्ट 1 :
https://irablogging.com/blog/online-wali-lovestory-

पार्ट 2:
https://irablogging.com/blog/online-wali-lovestory-part-2



कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आणि हे माझं पहिलच लिखाण ते कस वाटलं ते ही कळवा. काही चुकलं असेल तर माफ करा. काही suggestion असतील तर नक्की कळवा... तुमची अस्मिता.. !!

🎭 Series Post

View all