सुमित ने लॅपटॉप उघडला आणि हवे असलेले किराणा सामान बघायला सुरुवात केली. एका ऑनलाईन किराणा वेबसाईटवरुन तो घरातल्या वस्तू विकत घेत होता .ते घेऊन झाले आणि नंतर तो भाजीच्या आणि फळांच्या साइटवर गेला .आणि त्यातही काय काय हवे ते सुमाला विचारून ,तो विकत घेत होता. ऑर्डर पूर्ण झाली आणि आता आठवडाभर भाजी आणि किराणा त्याच्याकडे बघायला नको ,असं म्हणून दोघांनीही निश्वास टाकला. दोघेही नोकरी करणारे सोमवार ते शनिवार कुठे जाऊन काही विकत घ्यायला वेळच नाही. त्यामुळे आणि रविवारी बाजारात गेले तर तो गर्दी आणि गोंधळाला कोण सामोरे जाणार ,त्यामुळे ते घरबसल्या ,दर शुक्रवारी रात्री ऑर्डर द्यायचे आणि रविवारी सकाळी त्याप्रमाणे सर्व सामान घरपोच यायचे .
राधाला नवीन कुर्तीज आणि काही दागिने घ्यायचे होते. तिने नेहमीप्रमाणे एकेक फॅशनच्या साईट उघडायला सुरुवात केली, आणि त्यात साधारणतः स्क्रोल करून जे जे आवडत गेले त्याला अॅड टू कार्ट केले आणि पुन्हा एकदा ते बघितलं ,त्यातले जे फायनल होते त्याची ऑर्डर प्लेस म्हणून बटन दाबले ,कार्डने पेमेंट केले आणि झाली खरेदी .दुकानांमध्ये जायला नको ,ते कपडे बघायला नको, काही शोधायला नको घरबसल्या कसं सारं काही मिळतं असं म्हणून तिने आनंदाने लॅपटॉप बंद केला .
मनीष ला मोबाईल मध्ये रिमाइंडर आले, त्याला लाईटचे ,पाण्याचे, फोनचे ,मुन्सिपालटी चे बिल भरायचे होते त्याने फटाफट नेट बँकिंग बटनं दाबली ,आणि जी काही बिले भरायची होती , त्या सर्वांचं पेमेंट करून तो मोकळा झाला. किती सोपं झालंय ना आता हे सगळं लाईनीत उभे राहायला नको ,तिथल्या कर्मचाऱ्यांशी वाद विवाद नको, घरबसल्या बिले भरणे होते आणि त्याच्या पावत्या आरामात मिळून जातात .
वनिताला आज वर्क फ्रॉम होम होते, आणि आणि वेदांत तर गेले कित्येक दिवस वर्क फ्रॉम होमच होते, त्याच्या ऑफिसमध्ये आठवड्यातून एकदाच जावे लागत होते. आणि बाकी पाच दिवस घरात बसूनच काम करावे लागत असे .किती सारी सोय आहे ना रोज बस ,ट्रेन ,रिक्षा किंवा स्कूटर चालवत ऑफिसमध्ये जायला नको घरबसल्या काम होते आणि त्याचा मेहनताना/ पगारही व्यवस्थित मिळतो आणि जास्त एनर्जीने काम करता येते आणि त्यामुळे कामही चांगल्या प्रतीचे होते .
मंडळी ही झाली चार उदाहरणे आत्ताच्या स्मार्ट युगातल्या घरबसल्या सारे काही या संकल्पनेची. खरंच किती सोपं झालंय ना आजकाल माणसांना एकमेकांशी बोलणे ,कम्युनिकेशन किंवा प्रत्यक्ष भेटणे याची गरज वाटेनाशी झालेली आहे. आणि मोबाईल कॉम्प्युटर यांनी आपल्या आयुष्य व्यापून टाकलेले आहे .हवी असलेली प्रत्येक गोष्ट घरबसल्या म्हणजे अगदी खाण्यापिण्याच्या वस्तू मागवायच्या असल्या तरीसुद्धा ,त्यासाठीही बऱ्याच साईट्स उपलब्ध असतात. घरपोच डिलिव्हरी अगदी छोट्या मोठ्या गावातही उपलब्ध आहे. माणसाला माणसाचा खरच कंटाळा आलेला आहे का त्याला दुसऱ्या जिवंत माणसाशी प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा, ऑनलाइन संपर्क करणे सोपे वाटत आहे का ?नातेवाईक मित्रमंडळी यांना भेटणे त्यांच्या सुखदुःखात सामील होणे ,त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवणे, एकमेकांना मिठी मारणे किंवा प्रेमाने स्पर्श करणे शेकंहॅड करणे ह्या गोष्टी सुद्धा आता हळूहळू ऑनलाईन होणार का? आता एखाद्या दुःखद प्रसंगी हात जोडून भावपूर्ण श्रद्धांजली असे टाकले तर आपले समोरच्याचे दुःख कमी होणार आहे का? त्याचे खरोखरच सांत्वन होणार आहे का ?वाढदिवसाच्या दिवशी फोनवर बोलून शुभेच्छा देण्याऐवजी नुसतं हॅपी बर्थडे फेसबुक किंवा व्हाट्सअप वर टाकून मायेचा ओलावा येणार आहे का?
खरोखरच आपण मधल्या पिढीने आणि आपल्या पुढच्या पिढीने याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे .फक्त आता एकच गोष्ट आहे की जी ऑनलाइन मिळत नाही ती म्हणजे निसर्ग अनुभवणे पर्यटनाला जाणे आणि वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे बघणे .पण त्यातही काही महाभाग आहेतच कुठेही जायचं असेल तर ,अनपेक्षितपणे प्रवास करणे त्यात काही अडचणी येणे, याचा अनुभव घेण्यापेक्षा आधीच इंटरनेटवर सगळं बुकिंग तयार करतात तिथे जाऊन काय काय बघणार आहे काय काय इंटरेस्टिंग आहे हे सुद्धा इंटरनेटवरच ठरवतात बरं का! खरोखरच आता हे घरबसल्या सारे काही वेळ एवढे फोफावणार आहे की पुढे पुढे कदाचित माणसाला बघणे एकमेकांना बघणे भेटणे आणि बोलणे हा सुद्धा एक इव्हेंट ठरत जाईल .
असो ,कालाय तस्मै नमः. माझा हा लेखसुध्दा मी आॅनलाईन घरबसल्या पोस्ट करत आहे. टायपिंग मोबाईलवर बोलून केलय.
ते कागदावर लिहिणे ,रफ —फेअर करणे,संपादकांना पाठवणे ,मग साभार परत हे दिवस गेले ,लिहिलेले लगेचच लाखो लोकांपर्यत प्रकाशित होऊन पोचतेही.

भाग्यश्री मुधोळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा