भाग २
शुभ्रा: अगं, ही अजूनही कुठे राहिली आहे? एवढा वेळ झाला, तरी अजून काही हिचा पत्ता नाही!
मोहिनी: म्हणूनच मी सांगत होते ना, हिला नेहमी एक तास आधीचा वेळ सांगायला पाहिजे. ही नेहमीच उशीर करते.
शुभ्रा: अगं बावळट, विसरलीस का ग ? हे सगळं तिनेच अरेंज केलं आहे.
मोहिनी: अरे यार, हो! मी तर विसरलेच होते.
अनिका: अरे, तुम्ही दोघी काय भांडताय? आपण तिच्याच गावी जात आहोत. तिच्या आईकडून फोनवर हजार सूचना येत असतील तिला, 'हे करा, ते करा,' वगैरे. आणि मॅडम तर काय, नेहमीप्रमाणे आपल्याच धुंदीत मस्त असतील.
शुभ्रा: हो, अगदी खरं! मॅडमला काही बॅग पॅक करण्याची गरजच वाटत नसेल. कारण तिकडे सुद्धा तिचे सामान असेलच आणि तिकडे काय मॅडमचे नखरे वेगळे असतील.
अनिका: पण मला एक गोष्ट अजूनही कळत नाही. तिच्या आईनी अचानक तिला इतक्या तातडीने का बोलावलं असेल? आणि तेही आपल्याला सोबत घेऊन? काहीतरी वेगळं प्रकरण असलं पाहिजे.
शुभ्रा: हो ना मलाही तोच प्रश्न पडला आहे. तिला नेहमी काहीतरी उद्योग करण्याची सवय आहे. कदाचित तिचे इथले उद्योग कळले असतील म्हणून तर नसेल बोलवले?
मोहिनी: कदाचित हो अरे यार मला ही ओढणी सांभाळायचाच वैताग आलाय.आजोबा थोडे खास्ट आहेत म्हणून ओढणी ओढून घेतली आहे; नाहीतर सरळ क्रॉप टॉपच घालून आली असती मी...
शुभ्रा: हो का आणि मग काय? आजोबानी तुझ्या त्या क्रॉप टॉपसकट तुला चांगलं धो-धो धुतलं असतं.
हे ऐकून तिघी खळखळून हसू लागतात.
तेवढ्यात ती येते. तिघी तिच्याकडे बघून स्तब्ध होतात, कारण मॅडमनी आज चक्क साडी नेसली होती. अशा टिपिकल इंडियन आउटफिटमध्ये तिला आजपर्यंत कोणी पहिलेच नव्हते.
गडद जांभळ्या रंगाची साडी, त्याला पिवळा रंगाचा काठ, एका हातात घड्याळ, तर दुसऱ्या हातात जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या बांगड्या. कपाळावर नाजूकशी लाल टिकली, त्या चॉकलेटी डोळ्यांत निळसर काजळाची रेघ, आणि ओठांवर चेरी रंगाची लिपस्टिक. मुळात गोरी असल्यामुळे तिच्या नैसर्गिक सौंदर्याला उठाव देणारा साधेपणा होता. तरीही समोरच्याला जागीच स्तब्ध करण्याची ताकद मॅडममध्ये होती.
मॅडमची चाल एकदम धडाकेबाज होती, कारण ती पोलीस ऑफिसर होती.
बाहेर जरी वाघिणीसारखी असली, तरी घरातील कडक शिस्तीमुळे ती घरात नेहमी मांजरीसारखी वागत असे. खऱ्या अर्थाने ती वाघिण होती, पण ती बाहेरच्या जगात. तिच्या घरातलं रूप मात्र वेगळंच होतं. तिच्या लहानपणापासूनच तिच्या वागण्याला शिस्त, कष्ट, आणि जबाबदारी शिकवली गेली होती.
तिचे बाबा कर्नल होते. आर्मीतील कडक शिस्त त्यांनी आपल्या मुलांवरही लादली होती.
तिचा मोठा भाऊ कमांडो म्हणून कार्यरत होता.हे कोणालाच माहित नव्हते.
ती कामात इतकी गुंतलेली होती, की जगाचं भान तिला फारसं राहत नव्हतं.

उर्वी तिघींकडे आली आणि चेहऱ्यावर हसू ठेवतच म्हणाली,
“काय गं? एवढं काय तर्क लावून बघता आहात माझ्याकडे? इतकी भारी दिसते का मी?”
“काय गं? एवढं काय तर्क लावून बघता आहात माझ्याकडे? इतकी भारी दिसते का मी?”
शुभ्रा डोळे विस्फारून म्हणाली, “अगं फक्त भारी शब्द पुरेसा नाही. तू तर एकदम आयटम बॉम्ब दिसतेय.”
मोहिनीने खट्याळपणे म्हणली, “हो, ना कधी तुला असे पहिलेच नाही.आत तर काय आजूबाजूची सर्व पोर तुलाच बघत बसतील आता तर आमचा पत्ता कट”
तिचे बोलणे ऐकून तिघी जोरजोरात हसू लागल्या. उर्वीच्या चेहऱ्यावर त्या क्षणी खरे हसू नव्हतं. तिच्या डोळ्यांत जणू काहीतरी दडपण, काहीतरी चिंता उमटत होती.
त्या चौघी स्टेशनकडे निघाल्या. रस्त्यात वातावरण हलकंफुलकं असलं तरी उर्वी मात्र सतत विचारात गढलेली होती. तिच्या खिशात ठेवलेला तो पांढरा कागद पुन्हा पुन्हा तिच्या लक्षात येत होता. ती खूण… आईचं अचानक बोलावणं हे सगळं कुठेना कुठे जोडलेलं आहे का?
स्टेशनवर पोहोचल्यावर ट्रेनसाठी वाट पाहताना अनिका म्हणाली,
“उर्वी, खरं सांग ना तुझ्या आईने अचानक का बोलावलं?
“उर्वी, खरं सांग ना तुझ्या आईने अचानक का बोलावलं?
तेवढ्यात ट्रेनचा हॉर्न ऐकू आला तश्या चौघी आपापल्या सीटवर बसल्या .बसल्यावर बाहेरचं दृश्य झपाट्यानं मागे सरकत होतं. शेतं, झाडं, ओसाड टेकड्या आणि दरवेळी एखादं छोटंसं स्टेशन आलं की तिथे धावपळ करणारे लोक. पण या सगळ्यातही चौघींच्या गप्पा रंगल्या होत्या.
मोहिनी: “अगं उर्वी, खरं सांग, तुझं गाव नक्की कसं आहे? आपल्याला काय काय बघायला मिळणार?”
उर्वी हलकंसं हसली, पण तिच्या आवाजात आपुलकी होती.
“माझं गाव म्हणजे जुन्या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं आहे. समुद्र जवळ असल्यामुळे तिथे नेहमी गार वारा असतो. चहूबाजूंनी नारळाची झाडं आणि सगळ्यात भारी म्हणजे माझं जुनं घर. ते वाड्यासारखंच आहे. मोठं अंगण, लाकडी खिडक्या, लाल कौलारू छप्पर आणि त्या घरातल्या प्रत्येक भिंतीवर माझ्या बालपणीच्या आठवणी कोरलेल्या आहेत.”

अनिका डोळे मोठे करत म्हणाली, “वा! म्हणजे हि ट्रीप खरच मस्त होणार आहे. पण तुझ्या आईने एवढ्या घाईगडबडीत का बोलावलं, हे अजूनही माझ्या लक्षात येत नाही.”
उर्वी काही क्षण शांत राहिली. मग खिडकीबाहेर बघतच हळू आवाजात म्हणाली,
“आईचा गावात प्रचंड मान आहे. लोक तिच्या प्रत्येक शब्दाला मान देतात. पण तिच्या आवाजात काल जे ऐकलं ते वेगळंच होतं. आई घाबरलेली वाटली. आयुष्यभर मी तिला ठाम पाहिलंय, पण काल तिनं मला जणू भीतीपोटी बोलावलं आहे असे वाटलं.”

शुभ्रा लगेच म्हणाली, “म्हणजेच काहीतरी नक्कीच आहे.
मोहिनीने थोडं वातावरण हलकं करत खोडकरपणे विचारलं“गावात गेल्यावर आपल्याला नारळपाणी, पोहे-शिरा, आणि गरमागरम भजी मिळणार ना? आधीच सांगून ठेवते, मी खूप खाणार आहे!”
हे ऐकून सगळ्या हसल्या. पण उर्वी मात्र पुन्हा खिडकीबाहेर पाहत राहिली. गावाची आठवण, आईचा आवाज, आणि खिशात दडवलेला तो पांढरा कागद तिचं मन अक्षरशः त्यातच गुंतले होतं.
“गाव माझ्यासाठी आठवणीचं ठिकाण आहे पण यावेळी ते धोक्याचं ठिकाण ठरणार का?”हा प्रश्न तिच्या डोळ्यांसमोर सतत फिरत होता.
आईने शिकवलं होतं “कर्तव्याचं ओझं मनावर घेतलंस, तर माणूस कधीही हरवत नाही.”
काल फोनवर आईने हेच वाक्य पुन्हा उच्चारलं होतं.तेव्हाच उर्वीच्या अंगावर काटा आला होता.
ट्रेन थांबताच चौघी उतरल्या. स्टेशन छोटं होतं जुन्या पिवळसर भिंतींवरून रंग सोललेला, लोखंडी बाकांवर झोपलेले प्रवासी, आणि चहाच्या टपऱ्यावर उसळलेला वाफाळत्या चहाचा गंध म्हणजे आहाहा
चारोळी:
वाफाळत्या कपात दडलेली कहाणी,
गप्पांत गुंततात आठवणी जुनी.
टपरीवर भेटतात सख्या साऱ्याजणी,
चहाचा सुगंध उलगडतो जीवनगाणी.
गप्पांत गुंततात आठवणी जुनी.
टपरीवर भेटतात सख्या साऱ्याजणी,
चहाचा सुगंध उलगडतो जीवनगाणी.
----जान्हवी
ट्रेन हळूहळू गावाच्या छोट्या स्टेशनवर थांबली. गाडी थांबताच गडबड नाही, गोंगाट नाही. फक्त झाडांमधून येणारा वाऱ्याचा सुसाट आवाज आणि खारट हवेत मिसळलेला मातीचा गंध.
उर्वी, शुभ्रा, अनिका आणि मोहिनी उतरल्या.
“हे काय गावे आहे? एकदम निवांत!” शुभ्रा हसत म्हणाली.
“निवांत नाही गं, आपल्याला रोजचं शहराचं गडबडीतलं आयुष्य पाहायची सवय झाली आहे म्हणून आपल्याला हे गाव शांत वाटतेय,” अनिका शांतपणे उत्तरली.
“हे काय गावे आहे? एकदम निवांत!” शुभ्रा हसत म्हणाली.
“निवांत नाही गं, आपल्याला रोजचं शहराचं गडबडीतलं आयुष्य पाहायची सवय झाली आहे म्हणून आपल्याला हे गाव शांत वाटतेय,” अनिका शांतपणे उत्तरली.
स्टेशनच्या बाहेर एक जीप उभी होती.
“ताईसाहेब हि तुमच्यासाठीच गाडी पाठवली आहे ,” ड्रायव्हर म्हणाला.
“ताईसाहेब हि तुमच्यासाठीच गाडी पाठवली आहे ,” ड्रायव्हर म्हणाला.
तश्या सर्व पटापट त्या जप मध्ये बसल्या आणि जीप गावाच्या रस्त्यावरून पुढे निघाली. नारळाची झाडं, शेतं, आणि दुरून दिसणारा निळा समुद्र. सर्वजणी खिडकीतून बाहेर पाहत होत्या, तर उर्वी विचारात होती. आईने एवढ्या अचानक बोलावलं होतं का?
थोड्याच वेळात जीप मोठ्या अंगणासमोर थांबली. जुनं पण व्यवस्थित राखलेलं घर. लाकडी खांब, अंगणातली तुळस, आणि बाजूला थंड सावली देणारं आंब्याचं झाड.
शुभ्रा हसत म्हणाली, “वा! हेच का तुझं घर? अगदी सिनेमातीळ घर असल्यासारखे दिसते आहे".
दार उघडलं. आणि समोर आली उर्वीची आई.
पांढऱ्या नव्हे, तर रंगीत नऊवारीत, व्यवस्थित बांधलेला पदर, कपाळावर मोठा लाल टिक्का, डोळ्यांत चमक.त्याच्या चेहऱ्यावर वयोमानानुसार एकही सुरकुती नव्हती उलट त्यांचा चेहरा अभिमानाने आणि कठोरीने भरलेला दिसत होता.

“आलीस का शेवटी?” आईने उर्वीकडे पाहिलं. आवाजात प्रेम होतं, पण त्याहून जास्त आदेशाची झलक दिसून येत होती.
“काय झालं आई?” उर्वीने विचारलं.
“काय झालं आई?” उर्वीने विचारलं.
मैत्रिणींना पाहून आईने हसून आत बोलावलं. सर्व जणी हसत आत आल्या. शुभ्रा,आनिका ला एक रुम दिली तर मोनिका तिच्या आई वडिलांच्या रुम मध्ये राहायला गेली.
तिचे आई वडील मुंबईला राहत होते कधी तरीच गावी येत असे पण उर्वीच्या आईने सर्वांच्या खोल्या व्यवस्थित साफ केल्यामुळे काही अडचण आली नाही सर्व जणी फ्रेश होऊन अंगणात बसल्या होत्या. चहाचा वाफाळता वास घरभर दरवळला.
थोड्या वेळाने सगळ्या अंगणात जमल्या. टेबलावर वाफाळता चहा ठेवलेला. कपातून निघणाऱ्या वाफेत गावचा मातीचा गंध मिसळला होता.
आईने शांतपणे विचारलं, “उर्वी, किती दिवस राहणार आहेस?”
“थोडे दिवस आई, मग पुन्हा कामावर जायचं आहे.”
शुभ्रा लगेच म्हणाली, “कामावर? अगं, तुझे काम इथूनही होऊ शकतं!”
उर्वीने लगेच विषय वळवला. “अगं, माझं काम पोलीस स्टेशन मध्ये फक्त बसायचे नाही आहे.तसेही मी माझे काम सांगायला सुरवात केली तर कंटाळा येईल.”
आईने काही न बोलता तिच्याकडे बारकाईने पाहिलं. तिच्या नजरेत संशय नव्हता पण उत्सुकता मात्र नक्की होती.
“ठीक आहे,” आई शांतपणे म्हणाली. “तुझ्या आयुष्याचे निर्णय तुलाच घ्यायचे आहेत. पण विसरू नकोस तुझ्या मनातला आत्मविश्वास माझ्यासारखाच आहे. मी तुला घडवलंय, तुला हरायला कसं शिकवणार?”आईचे हे वाक्य ऐकताना उर्वीच्या अंगावर शहारा आला.
मैत्रिणी गप्पा मारत होत्या, हसत होत्या. पण तिच्या खिशात दडवलेला तो पांढरा कागद आणि आईचा आवाज ह्यावरून तरी हे सर्व दिसते तसे नाही हे समजून गेले.

तिला खात्री होती ही सुट्टी आनंद व्यक्त करण्यासाठी नाही.तर हि सुरुवात आहे एका धोकादायक मिशनची.
पुढील भागासाठी वाचत राहा – भाग ३ लवकरच …
माझी नवीन कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.
©®जान्हवी साळवे ला फोल्लो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!
तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत.
©®जान्हवी साळवे ला फोल्लो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!
तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत.
©️ कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
उर्वी देशमुख - नायिका
अश्वेत-नायिकेचा भाऊ
कर्नल देशमुख -नायिकेचे वडील
ए.सी.पी. उदय राणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा