भाग ४
रात्र गडद होत गेली होती. गावभरच्या घरांचे दिवे एक-एक करून विझु लागले . समुद्राच्या लाटांचा गडगडाट आणि झाडांच्या फांद्यांमधून वाहणारा वारा दोन्ही मिळून एक प्रकारची शांतता निर्माण करत होते.
जस जसे वेळ जवळ येत होते तस तशे उर्वीचं मन अस्वस्थ होत होते. अंगणात सगळ्या मैत्रिणी गप्पा मारत होत्या, आजी रामनामात गुंग होती आणि आजोबा मित्रांमध्ये व्यस्त होते. पण उर्वीचं मन एका ठिकाणीच अडकलं होतं जुन्या किल्ल्यावर जाणं.
तिने घड्याळाकडे पाहिलं. दहा वाजले होते. अजून दोन तास होते, पण ती थांबू शकत नव्हती. शांतपणे आपल्या खोलीत शिरून तिने जीन्स,डार्क ब्राऊन टॉप आणि त्यावर काळे जॅकेट घातले त्याच्यासोबतच खिशात टॉर्च, मोबाईल आणि छोटंसं पिस्तूल सुद्धा ठेवलं. आईने दिलेली चेतावणी आणि आजोबांची कडक नजर आठवली,पण तिच्या डोळ्यांत आता फक्त निर्धार होता ते सत्य आणि गावातील गुढ जाणून घेण्याचा.
अकरा वाजत आले. घरात हळू हळू आपापल्या खोलीत गेले तिने थोडी वाट पाहून आजूबाजूचा कानोसा घेतला सर्व शांत झालं आह कळताच तिने हळूच खिडकी उघडली आणि मागच्या अंगणातून बाहेर निसटली. रात्रीचा काळोख गावभर पसरला होता. चंद्र ढगांमागे दडला होता, फक्त पावलांखाली जाणवत होता तो मोकळा रस्ता आणि झाडांची कुजबुज सोबत होती.
आधी तिने आपली बुलेट गावापासून थोड्या अंतरावर हातानेच ढकलत नेली. आवाज करायचा नसल्याने तिने हि आयडिया लावली होती. बरेच दूर गेल्यावरच तिने चावी फिरवली. इंजिनच्या आवाजाने तिने इकडे तिकडे पहिले पण काही वेगळे वाटले नाही तसे तिने तिची नजर आता फक्त समोर किल्ल्याच्या रस्त्यावर ठेवली वाऱ्याने केस उडत होते, डोळ्यातील उत्सुकता आणि भीती दोन्ही मिसळून चेहरा चमकत होता. मागे सोडलेले गाव आता अंधाराच्या गर्तेत विरून गेलं होतं, आणि समोरचा रस्ता जणू तिला थेट त्या गुढाकडे नेत होता.
किल्ल्याचा रस्ता चढताना उर्वीच्या बुलेटचा हेडलाईट दगडी भिंतींवर, झाडांच्या बुंध्यांवर झळकत होता. रात्रीची थंड हवा गालावर आदळत होती. किल्ला जसजसा जवळ येत होता तसतसं तिच्या मनातले धडधडणे देखील वाढत होते.
जुनाट तटबंदीच्या सावल्या रस्त्यावर पसरल्या होत्या. शेकडो वर्षांचे ते दगड रात्रीच्या अंधारात आणखी भयंकर भासत होते. प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यावर तिनं गाडी बंद केली. तसे तिथे निरव शांतता पसरली .आता मात्र प्रत्येक आवाज कानावर आदळत होता झाडांची सळसळ, पानांवरून पडणारे थेंब, आणि कधीतरी घुबडाचा अंधार चिरणारा आवाज.
तिने टॉर्च काढला आणि पुढे पाऊल टाकले. किल्ल्याच्या गडद दरवाज्याकडे तिने एक नजर पहिले. जणू काहीतरी दडलेलं असावे असेच तिला वाटले.तिने दरवाज्याची लाकडी कडी उघडली तसे एक किरकिरणारा आवाज संपूर्ण परिसरात घुमला.
आत पाऊल ठेवताच गार वाऱ्याची झुळूक अंगावर आली. जुन्या दगडी भिंतींवर शैवाल आणि जमिनीवर पडलेली पानं तिच्या बुटाखाली चुरचुरली. टॉर्चच्या उजेडात ती एका लांबलचक अंगणातून जात होती.
अचानक..कुठेतरी वरच्या मजल्यावर लोखंडी साखळी वाजल्यासारखा आवाज झाला. उर्वी जागीच थिजली. तिने तिच्या हातातील टॉर्च सगळीकडून फिरवला,पण काहीच दिसले नाही.
तिनं स्वतःला सावरलं आणि पुढे सरकली. एका वळणावर पोचताच तिचा टॉर्च अचानक बंद पडला. काळोखात तिचा श्वास अडखळला. घाईघाईने स्विच दाबू लागली. काही क्षणांनी खुबूड-खुबूड आवाज करत टॉर्च पुन्हा लागला… पण समोर जे दिसलं त्याने तिचा श्वासच रोखला भिंतीवर मोठ्या अक्षरांत लाल रंगात लिहिलं होतं :
“इथे येणाऱ्याचा परतावा नसतो.”
“इथे येणाऱ्याचा परतावा नसतो.”
तिच्या डोळ्यांत धास्ती दाटली. तिने पिस्तूल घट्ट पकडलं. पाऊल मागे वळवायचं का याचाच विचार करत होती, तेवढ्यात मागून कुजबुजल्यासारखा आवाज आला
“उर्वी…”
“उर्वी…”
तिने पटकन मागे वळून पाहिले. टॉर्चचा उजेड अंधाऱ्या भिंतींवर फिरवत होती पण कुणी नव्हतं. तिच्या श्वासाचा वेग वाढला. छाती धडधडू लागली. हातातलं पिस्तूल घट्ट पकडत ती सावकाश मागे सरकली.
क्षणभर तिला वाटलं कदाचित भ्रम असेल. पण पुन्हा तोच आवाज, यावेळी आणखी जवळून “उर्वी... परत जा...”
तिच्या अंगावर काटा उभा राहिला. टॉर्चचा प्रकाश पुढे टाकला, तेव्हा जुन्या भिंतींवरून काहीतरी हलल्यासारखं दिसलं. जणू कोणीतरी तिच्या पुढेच उभं आहे, पण टॉर्चच्या उजेडापूर्वीच अंधारात विरून गेलं.
ती दोन पावलं पुढे सरकली. पायाखाली काहीतरी दगड घसरल्याचा आवाज झाला आणि किल्ल्याच्या अंगणातल्या रिकाम्या जागेत तो आवाज दुप्पट मोठा झाला.
अचानक वाऱ्याची झुळूक आत आली आणि एका जुन्या खोलीचा लाकडी दरवाजा त्या हवेने जोरात आपटला गेला धडाम! त्या आवाजानं ती दचकलीच. टॉर्च हातात तिने घट्ट पकडला आणि स्वतःला सावरत ती त्या दरवाज्याजवळ गेली तसे दरवाज्याच्या फटीतून वाऱ्यासोबत एक विचित्र गंध बाहेर येत होता धुरकट, ओलसर आणि कुजलेला जणू शेकडो वर्षांपासून काहीतरी तिथे बंदिस्त आहे.
तिनं तो दरवाजा हलकासा ढकलला.तर आत काळोखात एक लांबलचक जिना खाली उतरत होता.
उर्वी थोडा क्षण थांबली. तिच्या मनात आईची चेतावणी, आजोबांचा कडक आवाज हे सगळं आठवलं. पण तिच्या डोळ्यांत आता भीतीपेक्षा निर्धार जास्त होता.
तिने त्या जिन्यावर पहिले पाऊल टाकले तसे वरच्या तटबंदीवरून तिच्याकडे निरखून पाहणारी एक अंधुक आकृती गालात हसली.
जस जसे ती खाली उतरत होती तस तसे ती आपल्या हातातील पिस्तूल हातात घट्ट पकडत होती. वातावरणात एक विचित्र दडपण आले होते जणू अंधार स्वतः तिच्याकडे बघतोय.
खाली उतरताच तिला मोठं दालन दिसलं. भिंतींवर प्राचीन शिलालेख कोरलेले, काही ठिकाणी गंजलेली शस्त्रं टेकलेली होती. दालनाच्या मध्यभागी मात्र लालसर दिव्याच्या उजेडात जमिनीवर वर्तुळासारखं काहीतरी चिन्ह कोरलेलं होतं.
ती विजेच्या वेगानं वळली. पिस्तूल सरळ पुढे रोखलं. टॉर्चच्या प्रकाशात काही क्षण रिकामी भिंत दिसली पण पुढच्या क्षणी सावल्यांमधून एक उंच, रुबाबदार आकृती पुढे आली.
काळ्या टॅक्टिकल ड्रेसमध्ये, चेहऱ्यावर अर्धवट मास्क, डोळ्यांत गडद धार. हातात अत्याधुनिक रायफल, कंबरेला कॉम्बॅट नाईफ. चालण्यात एक करारीपणा.
तो शांतपणे पुढे येत होता. पावलांचा आवाजही जणू अंधार गिळत होता.
उर्वी थिजून त्याच्याकडे पाहत राहिली. टॉर्चचा प्रकाश त्याच्या डोळ्यांवर पडताच ते डोळे तिच्यावर रोखून पाहत आहे असे नजरेस पडले तसे तिने टॉर्च थोडा खाली केला तो तिच्या दोन पावले मागे थांबला. काही क्षण निवांत तिच्याकडे बघितलं. मग शांत, पण धारदार आवाजात म्हणाला “इथे राहणं तुझ्यासाठी सुरक्षित नाही.”
उर्वीचा श्वास अडखळला. ती शब्द गोळा करत असतानाच त्यानं रायफल खांद्यावर टाकली, पाऊल वर्तुळाजवळ ठेवत कडक आवाजात म्हणाला “मी शॅडो आहे आणि तुला अजून कळलेलं नाही, तू ज्या खेळात उतरली आहेस, त्यातून बाहेर पडणं केवळ अशक्य आहे.त्यामुळे आताच ठरव आणि माघार घे”पुन्हा तुला चान्स मिळणार नाही.
त्या शब्दांनी तेथील वातावरण आणि उर्वी दोघेही एकदम गरम झाले. उर्वीच्या चेहऱ्यावर भीती आणि हट्ट यांचं विचित्र मिश्रण उमटले. तिच्या डोळ्यांत ज्वाला पेटली होती.
किल्ल्याच्या दालनात फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज घुमत
उर्वीचा संयम सुटायच्या बेतात होता. तिने त्याच्यावर पिस्तूल रोखलं आणि म्हणाली,
“माझ्याशी हे असे खेळ खेळू नकोस. मी कोण आहे हे माहित आहे तुला?”
उर्वीचा संयम सुटायच्या बेतात होता. तिने त्याच्यावर पिस्तूल रोखलं आणि म्हणाली,
“माझ्याशी हे असे खेळ खेळू नकोस. मी कोण आहे हे माहित आहे तुला?”
तो शांतपणे तिच्या जवळ आला.“गोळी झाडण्याची काही एक गरज नाही.”
उर्वी त्याचे बोलने ऐकुन प्रचंड चिडली “नाव सांग तू तुझे बाकी मी बघेन पुढे काय करायचे ते.”
उर्वी त्याचे बोलने ऐकुन प्रचंड चिडली “नाव सांग तू तुझे बाकी मी बघेन पुढे काय करायचे ते.”
तिचे उत्तर ऐकून तो गालातच हसला पण ते क्षणिक हसू तिच्या नजरेस देखील पडले नव्हते “माझं नाव तुला माहीत असावे असे सध्या तरी मला वाटत नाही. पण तुझं मला कोड नाव देखील माहीत आहे. ब्राव्हो.”
उर्वीच्या छातीत धडधड दुप्पट झाली. “तुला माझं नाव कसं माहीत?”
तो तिला काही उत्तर न देता भिंतीवरील चिन्हाकडे वळला. "हे फक्त चिन्ह नाही तर हा नकाशा आहे. पुढे काय होणार याचा.”
उर्वीने समोर नजर टाकली तर खरंच, काही रेषा, काही बाण, आणि काही ठिकाणी वर्तुळं काढलेली होती.
तिने सावधपणे त्याला विचारले
“तू इथे काय करतोयस?”
“तू इथे काय करतोयस?”
त्याचा आवाज शांत होता.
“माझंही एक काम आहे. तुला इतकंच सांगतो इथून परत गेलीस तर सुरक्षित राहशील. पुढे गेलीस तर आयुष्य कायम बदलून जाईल.”
“माझंही एक काम आहे. तुला इतकंच सांगतो इथून परत गेलीस तर सुरक्षित राहशील. पुढे गेलीस तर आयुष्य कायम बदलून जाईल.”
उर्वी त्या चिन्हाच्या दिशेने पाहत होती तो पर्यंत तो अंधारातून मागच्या मागे पसार झाला.
तिला काही आवाज येत नाही असे लक्षात आले तसें तिने आजूबाजूला टॉर्च फिरवूनही कोणी दिसत का पहिले तर तिथे आता कोणीच नव्हते.
तिला काही आवाज येत नाही असे लक्षात आले तसें तिने आजूबाजूला टॉर्च फिरवूनही कोणी दिसत का पहिले तर तिथे आता कोणीच नव्हते.
उर्वी काही क्षण स्थिर उभी राहिली. मनात गोंधळ तर उडाला होता हा कोण आहे? मिशनबद्दल ह्याला कसे माहित? मला ओळखतो कसा?
हे प्रश्न तिला खूप अस्वस्थ करत होते हे रहस्य उलगडल्याशिवाय तिला आता चैन पडणार नव्हते.
तुम्हाला पण पडली असतील ना ही प्रश्न??पुढे काय होईल हे वाचण्यासाठी मला फोल्लो करा आणि कमेंट नक्की करा खास करून सायलेंट रिडर्स....
पुढचा भाग लवकरच......
पुढचा भाग लवकरच......
माझी नवीन कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.
©®जान्हवी साळवे ला फोल्लो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!
तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत.
©®जान्हवी साळवे ला फोल्लो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!
तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत.
©️ कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
उर्वी देशमुख - आपल्या कथेची नायिका (मिशनसाठी नाव ब्राव्हो)
शुभ्रा,अनिका,आभा - नायिकेच्या मैत्रिणी
मोनिका -नायिकेच्या काकांची मुलगी
अश्वेत-नायिकेचा भाऊ
कर्नल देशमुख-नायिकेचे वडील
उदय राणे - ए सी पी
उदय राणे - ए सी पी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा