भाग -५
उर्वी काही वेळ तिथेच उभी राहिली. डोक्यात प्रश्नांची सरबत्ती चालू होती. हा माणूस कोण होता? माझे नाव त्याला कसे माहित? आणि तो मास्क घालून आपली ओळख का लपवत होता?
ती उर्वी होती, घाबरण्यापेक्षा तिच्यातली जिज्ञासा वृत्ती तिला नेहमीच स्वस्थ बसून देत नसायची म्हणूनच तिला या मिशनसाठी निवडण्यात आले होते.
ती पुन्हा टॉर्चचा प्रकाश भिंतीवरील चिन्हावर टाकू लागली. वर्तुळाच्या मध्यभागी काहीतरी कोरलेलं होतं. धूळ झटकून पाहिलं, तर ते एक नकाशाचं प्रतीक होतं.
नकाशात किल्ल्याच्या दालनातून बाहेर जाणारे तीन मार्ग दाखवलेले होते. एक सरळ, एक डावीकडे वळणारा, आणि एक खाली उतरणारा.
उर्वीच्या नजरेत खाली जाणाऱ्या मार्गावर ठसे दिसले.त्या धुळीत त्या पाऊलखुणा स्पष्ट दिसत होत्या.
तेवढ्यात तिला कोणाच्या तरी हालचालीचे आवाज येऊ लागले ती लगेच सतर्क झाली तिने आपल्या हातातील पिस्तूल घट्ट पकडलं आणि हळूच जिथून आवाज येत होता त्या पायऱ्यांकडे गेली. खाली गेल्यावर एक अरुंद बोगदा नजरेस पडला. टॉर्चचा प्रकाश पुढे टाकत ती सावधपणे चालू लागली.
काही मीटर चालल्यावर तिला भिंतीवर हाताने काढलेलं चिन्ह दिसलं. बाणासारखं. जणू कोणीतरी इथे जाणूनबुजून खूण करून ठेवली गेली असावी.
“म्हणजे हा मास्क घातलेला माणूस फक्त भीती दाखवायला आला नव्हता. तो काहीतरी शोधत आहे.” उर्वीच्या मनात विचार आला.
थोडं पुढे गेल्यावर बोगदा एका छोट्या दालनात संपला. दालनाच्या मध्यभागी लोखंडी पेटी होती. पेटीला कुलूप लागलेलं. पुर्ण पेटीला गंज चढला होता पण कुलूप मात्र नवीन होतं.
उर्वी गुडघे टेकून त्या पेटीला पाहू लागली. कुलुपाभोवती खुणा होत्या जणू कोणीतरी ते उघडायचा प्रयत्न केला असावा.
तेवढ्यात तिच्या मागील बाजूस पुन्हा पायांचे आवाज ऐकू येऊ आले. उर्वीने लगेच टॉर्च बंद केला आणि अंधारात श्वास रोखून ती भिंतीला लागून उभी राहिली.
पावलं जवळ येऊ लागली.तसें तिने स्वतःला अजून अंधाऱ्या ठिकाणी लपवलं.दालनात दोन सावल्या शिरल्या. दोघांच्या हातात टॉर्च होते. ते एकमेकांशी हळू आवाजात बोलत होते.
“अरे ही काय आहे ती पेटी. मास्टरने सांगितलं होतं.”
“हो, पण आपल्या कडून ते कुलूप अजून उघडलं गेले नाही.”
“अरे ही काय आहे ती पेटी. मास्टरने सांगितलं होतं.”
“हो, पण आपल्या कडून ते कुलूप अजून उघडलं गेले नाही.”
उर्वीचं मास्टर ऐकून कान टवकारलं. “मास्टर? हा मास्टर कोण? आणि ही पेटी त्याच्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे?”
त्यापैकी एकाने पेटी जवळ जाऊन कुलूप उघडायचा प्रयत्न केला. दुसरा सतत आसपास बघत होता.
तेवढ्यात त्याचा टॉर्च उर्वीच्या दिशेने वळला.
तेवढ्यात त्याचा टॉर्च उर्वीच्या दिशेने वळला.
उर्वीने लगेच पिस्तूल काढलं आणि कडक आवाजात म्हणाली “आहेत तिथेच थांबा! हात वर करा.”
तिच्या अश्या अचानक हल्याने दोघे दचकले. क्षणभर सगळं थांबलं असे त्यांना वाटले मग दोघांपैकी एकाने हुशारीने टॉर्च बंद केला. तसें ते दालन पुन्हा काळोखात बुडालं.
पुढच्या क्षणाला हवेत काहीतरी चमकलं.
उर्वी सतर्क होती त्यामुळे तो चाकू आहे हे तिने ओळखले झटकन बाजूला झाली. तसा तो चाकू भिंतीवर आदळला.
उर्वी सतर्क होती त्यामुळे तो चाकू आहे हे तिने ओळखले झटकन बाजूला झाली. तसा तो चाकू भिंतीवर आदळला.
त्या अंधारात तिची पिस्तूल मागे पडली होती. त्यामुळे हळू हळू मागे सरकत तिने पिस्तूल उचललं आणि गोळी झाडली. गोळी भिंतीवर आदळली, पण आवाजाने संपूर्ण दालन हादरलं.
ते दोघेही तिथून पळू लागले टॉर्चचे क्षीण प्रकाश ठसे बोगद्यातून दूर सरकत होते.
उर्वीने श्वास सावरला. तिला माहित होतं ही फक्त सुरुवात होती. पेटीत काहीतरी असं आहे जे सर्वांना हवे आहे.
तिने त्या कुलूपाकडे पुन्हा नजर टाकली.
“हे उघडलं तर मला बहुतेक उत्तरं मिळतील.”
उर्वीने थरथरत्या श्वासात पेटीकडे पुन्हा पाहिलं.
“हे उघडलं तर मला बहुतेक उत्तरं मिळतील.”
उर्वीने थरथरत्या श्वासात पेटीकडे पुन्हा पाहिलं.
तिने टॉर्च परत चालू केला आणि कुलुपाजवळ बारकाईने पाहिलं. ते साधं कुलूप नव्हतं एक खास कोड-लॉक होता. चार फिरते अंक. योग्य क्रम मिळाला तरच ते उघडणार होते.
“याचा अर्थ, पेटीत खरच खूप मौल्यवान अशी गोष्ट आहे.”हा तिच्या मनात विचार आला.
कान टवकारून तिने आजूबाजूला काही ऐकू येतेय का पहिले. आता कोणी तिथे नव्हते त्यामुळे दालन शांत वाटत होते.
उर्वी (हळू आवाजात, स्वतःशीच):
“हे साधं कुलूप नाही आहे.कोड-लॉक… म्हणजे कुणीतरी मुद्दाम इथे दडवून ठेवले आहे.”
उर्वी (हळू आवाजात, स्वतःशीच):
“हे साधं कुलूप नाही आहे.कोड-लॉक… म्हणजे कुणीतरी मुद्दाम इथे दडवून ठेवले आहे.”
तिने भिंतीकडे टॉर्च फिरवला. तिथे खाचेत चार चिन्हं कोरलेली दिसली तारा, त्रिकोण, चंद्र, सूर्य.
उर्वीच्या डोक्यात ती चिन्ह फिरू लागली आणि स्वतःशच म्हणाली
“हेच तर… हेच तर क्ल्यू आहे.”
“हेच तर… हेच तर क्ल्यू आहे.”
तिने कुलूपाचे चिन्ह फिरवायला सुरुवात केली. पहिल्यांदा चुकीचा क्रम लावला क्लिक काहीच झालं नाही.
“चुकलं… शांत हो उर्वी… घाई केलीस तर सगळं बोंबलणार.”
तिने पुन्हा बोटं कुलुपावर ठेवली.
“तारा मग त्रिकोण मग चंद्र आणि शेवटी सूर्य.”
“तारा मग त्रिकोण मग चंद्र आणि शेवटी सूर्य.”
कुलूप हलकंसं क्लिक झालं.
उर्वीने दीर्घ श्वास सोडला.
“झालं अखेर उघडलं.”
“झालं अखेर उघडलं.”
ती पेटी उघडायला लागली, तेवढ्यात त्या अंधारात पावलांचा हलकासा आवाज झाला.
गेल्या काही क्षणांतला ताण अजूनही तिच्या आवाजात होता.
उर्वी कडक आवाजातच म्हणाली
“कोण आहे तिथे?जे कोणी तिथे लपून आहे ते गपमुकाट्याने बाहेर या!”
उर्वी कडक आवाजातच म्हणाली
“कोण आहे तिथे?जे कोणी तिथे लपून आहे ते गपमुकाट्याने बाहेर या!”
पण उत्तर आलं नाही. फक्त शांतता पसरली होती.
तिने पुन्हा पेटीकडे हात नेला. झाकण हळूहळू वर सरकलं. आत नकाशे, फाईल, आणि वर मोठ्या अक्षरांत कोरलेलं नाव PROJECT BLACKFIRE.
उर्वी डोळे मोठे करून ते सर्व पाहत होती
“ब्लॅकफायर…? हे तर खूप आधी बंद झालेलं मिशन आहे ”
“ब्लॅकफायर…? हे तर खूप आधी बंद झालेलं मिशन आहे ”
ती फाईल उचलणार इतक्यात मागून पुन्हा आवाज आला.
“ते तुझ्या साठी नाही आहे.”
“ते तुझ्या साठी नाही आहे.”
टॉर्चचा उजेड डोळ्यांत तिच्याचमकला. तोच मास्क घातलेला माणूस समोर उभा होता.आता ही तो हातात रायफल घेऊनच होता.
उर्वी-
"तू कोण आहेस? माझं नाव तुला माहित आहे म्हणजे तू मला बऱ्याच आधीपासून ट्रॅक करत आहेस."
उर्वी-
"तू कोण आहेस? माझं नाव तुला माहित आहे म्हणजे तू मला बऱ्याच आधीपासून ट्रॅक करत आहेस."
तो दोन पावलं पुढे आला. रायफल हातात होती, पण नजरेत शत्रुत्व नव्हतं एक प्रकारची गंभीरता होती.
"मी तुझा शत्रू नाही, पण मित्रही नाही. आणि हे जे तू उघडलंस ना, त्याची किंमत तुला अजून कळलेली नाही."
उर्वी डोळे बारीक करत त्याला म्हणाली
"मग समजव आणि हे गूढ बोलणं बंद कर. स्पष्ट सांग, या फाईलमध्ये काय आहे?"
"मग समजव आणि हे गूढ बोलणं बंद कर. स्पष्ट सांग, या फाईलमध्ये काय आहे?"
तो थोडा वेळ शांत राहिला, जणू शब्द तोलून मोजून बोलत होता.
"ही फाईल चुकीच्या हातात गेली, तर फक्त तुझं गाव नाही तर पूर्ण देश उद्ध्वस्त होईल."
उर्वी ती फाईल छातीशी घट्ट धरत त्याला म्हणाली
"आणि योग्य हात कोणाचे? तुझे? तुझ्यावर मी विश्वास का ठेवावा?"
"आणि योग्य हात कोणाचे? तुझे? तुझ्यावर मी विश्वास का ठेवावा?"
तो थोडा जवळ आला, टॉर्चचा प्रकाश त्याच्या मास्कवर चमकला.
"कारण मी आधीपासून या मिशनमध्ये आहे. पण माझा मार्ग गुप्त आहे. मी एकटा राहून लढतो.सध्या तरी तुला माझं नाव माहिती असण्याची गरज नाही.फक्त इतकं लक्षात ठेव ही फाईल कुणाकडेही देऊ नकोस. तिच्यासाठी लोक निरपराध लोकांना मारायलाही मागे हटणार नाहीत."
उर्वी पिस्तूल अजून घट्ट पकडत त्याला म्हणाली
"माझ्यावर उपकार केल्यासारखं बोलू नकोस. मी सुद्धा माझं काम स्वतः करू शकते."
"माझ्यावर उपकार केल्यासारखं बोलू नकोस. मी सुद्धा माझं काम स्वतः करू शकते."
तो थोडा हसला, पण ते हसू गूढ होतं.
"तू धाडसी आहेस, उर्वी. पण धाडस आणि हट्ट यात एक बारीक रेष असते. ती ओलांडलीस तर निरपराध लोकांचा बळी जातो."
"तू धाडसी आहेस, उर्वी. पण धाडस आणि हट्ट यात एक बारीक रेष असते. ती ओलांडलीस तर निरपराध लोकांचा बळी जातो."
क्षणभर दोघं एकमेकांकडे पाहत राहिले. थोड्यावेळाने तो आला तसा तिथून निघून गेला
उर्वी काही क्षण जागच्या जागी उभी राहिली. हातातली फाईल तिला जड वाटत होती. “Project Blackfire... मास्क घातलेला माणूसआणि गावच्या किल्ल्यातली ही पेटी... हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे?”
तिने पेटी पुन्हा बंद केली,त्या फाईल मधील काही कागदं जॅकेटमध्ये टाकली, आणि एक नजर त्या नकाशाकडे पाहून वरच्या मार्गाने बाहेर जायला निघाली.
किल्ल्याबाहेर आल्यावर पहाटेची चाहूल लागली होती. पूर्वेकडे मंद उजेड पसरत होता. पक्ष्यांचे आवाज सुरू झाले होते.
उर्वीने आकाशाकडे पाहिलं. तिला कळून चुकलं होतं
हे मिशन आता फक्त तिचं राहिलं नव्हतं. कुणीतरी अजून आहे या खेळात. आणि त्याचं उद्दिष्ट अजून गूढ आहे.
हे मिशन आता फक्त तिचं राहिलं नव्हतं. कुणीतरी अजून आहे या खेळात. आणि त्याचं उद्दिष्ट अजून गूढ आहे.
पुढचा भाग लवकरच......
माझी नवीन कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.
©®जान्हवी साळवे ला फोल्लो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!
तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत.
©®जान्हवी साळवे ला फोल्लो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!
तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत.
©️ कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
उर्वी देशमुख - नायिका
अश्वेत-नायिकेचा भाऊ
कर्नल देशमुख -नायिकेचे वडील
ए.सी.पी. उदय राणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा