Login

ऑपेरेशन सेफ हार्ट भाग -६

ऑपेरेशन सेफ हार्ट
ऑपेरेशन सेफ हार्ट भाग ६

रात्रीचा काळा गालिचा समुद्रावर पसरला होता. आकाशात तारे चमकत होते, पण पाण्यामुळे पृष्ठभागावर त्यांचा प्रतिबिंबही दिसत नव्हता. फक्त लाटा आणि त्यांच्या गडगडाटात मिसळलेली समुद्राची भीषण शांतता. मुंबईच्या किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर एक जुन, गंजलेलं मालवाहू जहाज लाटांवर हलत होते. बाहेरून ते एखाद सोडले गेलेले लोखंडी राक्षस वाटावे असे क्रूर जहाज ते दिसत होते लोकांना बाहेरून वाटायचे कि ते मालवाहू जहाज आहे त्यामुळे त्याच्या स्वच्छतेकडे कोण पाहत बसणार म्हणून लोक तो विषय सोडून देत, पण आत मात्र काहीतरी वेगळच चालल होते.

डेकवर काळ्या कपड्यांत मुखवटा घालून असणारी माणस इकडे-तिकडे धावत होती. हातात बंदुका, लाकडी पेट्या, पिशव्या, आणि लोखंडी साखळ्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक भाव फक्त एकाच गोष्टीचं प्रतीक होता ती म्हणजे क्रूरता.
डेकच्या एका कोपऱ्यात दोन बायका बसलेल्या होत्या, हात बांधलेले, डोळ्यांतून ओघळणारे अश्रू. त्यांच्या मागे तीन लहान मुल, रडत-थरथरत, एकमेकांना धरून बसलेली.
त्यांच्या चेहऱ्यांवरचे भय एखाद्या लांडग्याने झडप घालून जणू पकडले असावे असे , जे पाहणाऱ्याच्या हृदयाला भेदून जाईल.

जहाजाचा कप्तान आपल्या केबिनमध्ये बसून दूरवरून बायनॉक्युलरने किनाऱ्याकडे पाहत होता. तो दाढीवाला, जाडजूड माणूस आपल्या हातातील व्हिस्कीचा एक सिप पित त्याने एका सहकाऱ्याला आवाज दिला.
“उद्या सकाळी बोट किनाऱ्यावर पोहोचली पाहिजे. माल सुरक्षित पोहोचवला नाही तर मास्टर आपलं मटण करेल.”
सहकारी भीतीने मान डोलावून बाहेर गेला.

पण त्याच वेळी… डेकवर अचानक धूर उठला.
“काय झालेय?” कोणीतरी किंचाळल.
गुंड घाबरून इकडे-तिकडे पाहू लागले.

त्या धुरातून एक सावली हळूहळू पुढे आली. उंच, ताठ बांधा. काळा मास्क चेहऱ्यावर. अंगावर टॅक्टिकल जॅकेट. हातात सायलेंसर लावलेली रायफल.
त्याच्या पावलांचा ठोका समुद्राच्या लाटांपेक्षा जास्त ठळक वाटत होता.
तो होता शॅडो.

शॅडो शांतपणे पुढे आला. रायफल खांद्यावरून फिरवली.आवाज न करता दोन अचूक गोळ्या समोर पॉईंट करत चालवल्या तसे पहिला गुंड डेकवर कोसळला, दुसऱ्याने पण त्याच्या मागे लोटांगण घेतले.
बाकीचे सगळे घाबरून पळाले, पण कोणी त्याच्या वर वर करायला पुढे सरावले तर त्य्याचा डायरेक्ट नेम डोक्याच्या मधोमध.

“कंट्रोल घेतलंय,” शॅडोचा आवाज त्याच्या इयरपीसमध्ये घुमला. तो आवाज इतका स्थिर होता की जणू अशी युद्ध ही त्याच्यासाठी रोजच काम होतं.

मात्र त्याच क्षणी त्याच्या कानाशी एक वेगळाच आवाज आला मुलांच्या रडण्याचा.
तो आवाज शॅडोच्या डोळ्यांपासून कानापर्यंत पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावर कठोरता आणखी वाढली.
“मानवी तस्करी” त्याने स्वतःशीच पुटपुटलं.ताईने आवाजाचा क्नोस घेत रायफल मागे घेऊन जिना उतरला.

खालच्या डेकवर पसरलेला अंधार,शेवाळ कुजलेल्या पाण्याचा वास, आणि लोखंडी गजांच्या मागे थरथरणारी मुल.
शॅडोने टॉर्च लावला. त्या उजेडात ती मुलं घाबरून मागे सरकली. त्यांच्या डोळ्यांत प्रश्न होते“हा कोण? वाचवणार की मारणार?”

शॅडोने पिस्तूल काढल आणि सरळ समोरील कुलूपावर गोळी झाडली.कुलूप तुटले.
“जा! वर पळा!” त्याने कठोर आवाजात सांगितलं, पण डोळ्यांत मायेची चमक होती.

मुले दार उघडून पटापट बाहेर पडली, भीतीने थरथरत वरच्या दिशेने धावू लागली.
शॅडो मागे वळणार एवढ्यात त्याच्या गळ्याजवळ थंडगार जाणवल.
एक गुंड चाकू रोखून उभा होता.“हललास तर गळा चिरून टाकीन,” गुंड गुरगुरला.

शॅडोच्या डोळ्यांत मात्र भीती नव्हती. त्याने अचानक पाठीचा जोर देऊन त्या गुंडाला भिंतीवर आपटले तसे त्या गुंडाच्या हातातल्या चाकूचा फटका वळवून त्याच्याच मानेला लागला तसे गुंड किंचाळत कोसळला.

शॅडोचा श्वास अजूनही स्थिर होता. त्याच्या हालचाली वाघासारख्या जलद आणि अचूक अश्या होत्या.

त्याच वेळी…
गावात उर्वी मंदिरातून परत येत होती. सकाळची वेळ. सूर्यकिरण झाडांच्या फांद्यांमधून उतरून जमिनीवर पडत होते.
गावात शांती दिसत होती, पण तिच्या तीक्ष्ण नजरेला कुजबुज ऐकू येत होती.

“काल परत ते काळं जहाज किनाऱ्याजवळ दिसले"
“एक मुलगा गायब झालाय म्हणे.”
“लोक म्हणतात, त्या जहाजावरून कोणी परत येत नाही.”

उर्वीला त्यांचा आवाज येत होता. पण तिच मन मात्र आधीच्या घटनांवर अडकले होते किल्ल्यातली ती फाईल, “प्रोजेक्ट ब्लॅकफायर,” आणि मास्क घातलेला तो अज्ञात माणूस.

आईने तिच्याकडे नजर केली.
“तू जास्त खोलात जाऊ नकोस, उर्वी. हा खेळ तुझ्या कल्पनेपेक्षा मोठा आहे.”

उर्वी थांबली. आईच्या डोळ्यांत नजर रोखून ती म्हणाली “आई, बाबा सैनिक होते. त्यांचेच रक्त माझ्या नसांमध्ये आहे. भीती ही मला शिकवली नाहीस तू. मग आता मागे कशी हटेन?”

आई काही बोलली नाही. पण तिच्या डोळ्यांत मात्र उर्वी बद्दलची काळजी दाटलेली होती.

रात्री किनाऱ्याजवळ हलकासा गोंधळ उडाला.
त्या रात्री किनाऱ्याजवळ गावकऱ्यांना रक्ताच्या डागांसह एक लाकडी बोट सापडली. उर्वी टॉर्च घेऊन तिथे तपास करत होती तर त्या बोटीची पाहणी करताना तिला एक चिठ्ठी मिळाली.
त्यावर फक्त दोन शब्द होते“ब्लॅक फायर.”

उर्वीच्या अंगावर काटा आला.“हीच ती खूण फाईलमध्ये जी पाहिली होती.”

तेवढ्यात दुसऱ्या टोकाला गोळीबार सुरु झाला ती धावत तिकडे गेली. पण पोहोचेपर्यंत तिथे काही गुंड आधीच बेशुद्ध पडले होते.
त्यांच्या जवळ बूटांचे ठसे लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीचे असतात तसे दिसत होते.

उर्वीच्या डोक्यात विचार चमकला “हा तोच आहे… मास्क घातलेला. पण तो आहे तरी कोणाच्या बाजूने ?”तिने सगळीकडे नजर फिरवली तर तिलातेथील ठिकाण आणि ती जागा एकदम शांत जाणवली जसे इथे काहीच झालेच नाही आहे.

दुसऱ्या दिवशी रात्री तिला तिच्या खर्यानी सांगितले कि जंगलात काही तरी घडणार आहे .त्यामुळे उर्वी जंगलात पाळत ठेवत होती.
तिच्या कानाशी अचानक कुजबुज ऐकू आली. काही मुखवटाधारी गुंड कुणाला तरी बांधून नेत होते.
उर्वीने रायफल सरसावली. पण तेवढ्यात दुसऱ्या बाजूने जबरदस्त गोळीबार सुरू झाला.

गुंड गोंधळून इकडे-तिकडे पळाले.
धुरातून पुन्हा तो माणूस दिसला तो विजेच्या वेगाने पुढे येत होता तसे एकामागून एक गुंडांना खाली पाडत होता.
उर्वी झाडामागे लपून हे सगळं पाहत होती. तिनेही काही गुंडांना आपल्या दंडुकेने कंठस्थान केले.

दोघं वेगवेगळ्या कोनातून एकाच शत्रूविरुद्ध लढत होते.
एकमेकांना न ओळखता.

लढाई संपल्यावर क्षणभर शांतता पसरली.
धुरातून उर्वीची नजर शॅडोच्या नजरेला भिडली.
त्या नजरेत अविश्वास होता पण त्याचसोबत एक विचित्र आकर्षणही.

शॅडो काहीही न बोलता मागे सरकला आणि जसा आला होता त्याच वेगाने गायब देखील झाला .उर्वीला त्या ठिकाणी फक्त त्याच्या पावलांचा ठोका आणि बारूदाचा वास हवेत जाणवत होता.

त्या रात्री उर्वी पुन्हा किनाऱ्याजवळ आली.
दूरवर मोठ जहाज दिसत होते. त्या बोटींमध्ये लोकांना जबरदस्ती चढवले जात होते.
तिने टॉर्च बंद केला, रायफल घट्ट पकडली.ती पुढे कॅल करून जाणार तसे अचानक आकाशात लाल फ्लेअर उडाले. समुद्र उजळून गेला.
आणि त्या प्रकाशात तिने पाहिले तर तो मास्कवाला माणूस आधीपासूनच तिथे होता.

गुंडांवर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला.धूर, किंचाळ्या, पाण्याचे फवारे सर्व काही उधळत होते.
उर्वी आणि शॅडो पहिल्यांदा एकत्र लढत होते जरी त्यांना एकमेकांवर विश्वास नव्हता तरी ते आपले टार्गेट एक आहे हेच समजत होते.

त्यांनी काही गावकऱ्यांची सुटका केली पण मुख्य माफिया बॉस बोटीवरून पळून गेला होता.

समुद्रावरची ती भयंकर रात्र शेवटी शांत झाली होती.
गोळ्यांचा आवाज, किंचाळ्या, धुरातले सावलीचे फटके सगळं थांबले होतं.
किनाऱ्याजवळ काही गावकऱ्यांची सुटका झाली होती. त्यांचे हात पाय सोडवून वाळूत बसवलं गेलं.
उर्वीचा श्वास जोराने चालला होता, घामाने भिजलेला चेहरा, हातात अजूनही रायफल घट्ट पकडलेली.

पण तिची नजर थबकली होती त्या एका आकृतीवर तो दोन पावलं लांब उभा होता, अजूनही मास्काने चेहरा झाकलेलाच होता त्याचा. त्याच्या डोळ्यांत काहीतरी होतं कठोरता, गूढता, आणि एक प्रकारचं मौन.

क्षणभर दोघांचे डोळे एकमेकाना भिडले.
ना संवाद, ना ओळख. फक्त समुद्राच्या गडगडाटात एक निःशब्द प्रश्न हवेत घुमला "आपण एकाच बाजूचे आहोत का?"

पण उत्तर न देता शॅडो मागे फिरला. त्याची पावलं वाळूत दडली आणि क्षणात तो धुक्यात विरून गेला.
फक्त त्याच्या मागे राहिला तोच ठसा की कुणीतरी अजून आहे, कुणीतरी मोठं जो काहीतरी जाणतो.

उर्वीने श्वास सावरला.मात्र मनात एक गाठ घट्ट बसली हा माणूस कोण आहे? आणि का सतत माझ्या पुढे दिसतोय?हे शोधायलाच हवे.


माझी नवीन कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.
©®जान्हवी साळवे ला फोल्लो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!
तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम  माझ्यासाठी अमूल्य आहेत.

©️ कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

उर्वी देशमुख - नायिका 

अश्वेत-नायिकेचा भाऊ

कर्नल देशमुख -नायिकेचे वडील

ए.सी.पी. उदय राणे
0

🎭 Series Post

View all