Login

ऑपरेशन व्हाईट शार्क भाग 2

वाचा एक थरारक रहस्य कथा

ऑपरेशन व्हाईट शार्क भाग 2
मागील भागात आपण पाहिले भारतातून काही महत्वाची माहिती चोरीला जाते . ते शोधायला भारतीय एजन्सी प्रयत्न चालू करतात.
पुण्याजवळ असलेल्या गावातून एक ग्रामीण युवती गायब होते . आता पाहूया पुढे .



घररsssss घरर sssss मोबाईल व्हायब्रेट होत होता आणि शेजारी एका सुपर मॉडेलच्या बाहुपाशी राघव विसावलेला होता .

" साला , कोण डिस्टर्ब करतेय नको त्या वेळेला . "

तिसऱ्यांदा घरघर वाजलेला फोन त्याने उचलला आणि फ्लॅश झालेले नाव वाचून शराब आणि शबाब दोन्हींची नशा खाडकन उतरली .


पुढच्या पाचव्या मिनिटाला भारतीय आयबी ऑफिसर राघव शास्त्री आपल्या गाडीजवळ होता . आपले सामान विमानतळावर पोहोचवायची सूचना देत त्याने गाडीला वेग दिला . पुढच्या दहाव्या मिनिटाला त्याने मुंबईच्या विमानतळावर प्रवेश केला . त्याची सहाय्यक ऑफिसर डेजी आधीच हजर होती .


" थँक गॉड स्टार पोहोचला तर . "
ती हसून म्हणाली .

" येस लेट्स चेक इन . "
राघव त्याच्या टीमला म्हणाला .

" वेट चॉकलेट बॉय . प्लेन तासभर उशीरा आहे . हवामानातील बदल झाल्याने . "
अमन तिसरा ऑफिसर म्हणाला .


सखाराम आणि सलीम दोघेही शायरा जिथे राहायची तिथे तिला शोधायला जायचे ठरवत होते . संपूर्ण दिवस आणि रात्रभर तिला सगळीकडे शोधल्यावर त्यांनी हा निर्णय घेतला होता .

" सलीम , सकाळी लवकर निघू . मंजी लवकर पोचू . "
सखाराम म्हणाला .

" मेरी बेटी कहापर होगी ? "
सलीम घाबरलेला होता .



" ओय , होय ! "
राघवने नकळत शब्द उच्चारले आणि सगळ्यांच्या माना एकशे ऐंशी अंशांत वळल्या .

द मेघना माथूर . भारतीय मॉडेलिंग जगतातील वादळ आणि तिच्या मागोमाग आणखी काही सुपर मॉडेल एन्ट्री घेत होत्या .

अमन मात्र मेघनाच्या बॅग सांभाळणाऱ्या मुलीकडे बघत होता .

" मेघना डार्लिंग ! "
किनरा बायकी आवाज आला .

प्रसिद्ध फॅशन डिझायनर पन्ना आणि त्याची टीम येत होती . आता ह्या बाहुल्या आणि ही सगळी त्यांची पिलावळ आजूबाजूला असणारा यार . डेजी वैतागली . शेवटी एकदाचे सगळे विमानात बसले .


" हे हॉटी ? रिमेंबर मी ? "
राघवाच्या शेजारी बसत एमिली म्हणाली .

तासाभरापूर्वी राघव तिच्याचसोबत होता .


" संजू , वॉटर प्लीज . "
मेघना म्हणाली आणि तिची असिस्टंट उठली .
संजू ! अमन दोन वेळा स्वतःशी म्हणाला .


" जिग्नेश भाई , डिझाईन कब भेजेगा ? "
पन्ना चिडून त्याच्या माणसांना विचारत होता .

" चिल डार्लिंग , शो अजून चार दिवसांनी आहे . "
त्याच्या असिस्टंटने समजावले .


विमान आकाशात झेपावले . राघव त्याला मिळालेली माहिती वाचत होता . आंतरखंडीय क्षेपणास्त्राची ब्लूप्रिंट आणि अणुबॉम्ब तयार करायला उपयुक्त युरेनियम चोरीला गेले होते . अत्यंत हुशारीने चोरी झालेली होती .

पोलिसांनी प्रयत्न करुन फक्त चोरलेल्या वस्तू युरोप मार्गे पाकिस्तानात जाणार ही माहिती मिळवली होती . काहीही करून युरोपातून ते सगळे परत घेऊन जायचे होते . सगळे काही पुढील चार दिवसांत होणार होते .


" जयेश भाई , ते व्हाईट शार्क झाले का तयार ? आतून बिलकुल पोकळ पायजे हा ! चार नेकलेस हाय . आज रात्री ते पाठवायचे हाय . "
जिग्नेश चिडला होता .


गळ्यात असले प्राणी घालण्यात कसली फॅशन हेच त्याला समजत नव्हते . त्यात आतमध्ये एक बाटली बसेल अशी मोकळी जागा कशाला ? पण पैसा प्रचंड मिळाला असल्याने तो खुश होता .


दुबई येथे विमान थांबले आणि काही प्रवासी उतरले तर काही नवीन चढले .

" राघव , भारतात चोरलेल्या वस्तू युरोपात कशा पोहोचल्या असतील ? "
अमनने सांकेतिक भाषेत राघवला विचारले .

इथे काहीच बोलायला नको असा इशारा झाल्याने अमन गप्प बसला . विमान बर्न विमानतळावर लँड झाले . सगळेजण बाहेर पडले .

जगभरातील सगळे टॉप ब्रँड ह्या फॅशन वीकमध्ये सहभागी होणार होते . समुद्र अशी मध्यवर्ती संकल्पना घेऊन सादर केला जाणारा हा शो जगभरातील मिडियाचे आकर्षण होता .

" हॅलो राघव , फॅशन शोमध्ये भाग घेतोय का ?"
नयना भास्कर पटकन समोर आली .

" बातम्या शोधणे तुझे काम आहे . "
राघव हसला .

नयना त्याच्याजवळ आली आणि त्याला आलिंगन दिले .
" मी भारत सरकार द्वारे इथे आहे . तुमचे मिशन मला संपूर्ण माहित आहे . "

नयना एवढे बोलून वळणार इतक्यात राघवच्या हाताला रक्त लागले होते .

" प्लीज हेल्प . "
राघव ओरडला .
सगळीकडे गडबड उडाली आणि त्याच गोंधळात नयनाची पर्स गायब झाली होती .


भारतीय पत्रकारावर झालेला हल्ला जगभर ट्रेडिंग होता . नयना भास्कर सेलिब्रिटी असल्याने बातमी जास्त गाजत होती .

" हॅलो मेघना . माय सेल्फ विवान फ्रॉम गल्फ . "

समोरून चालत येणारा देखणा माणूस बघून मेघनादेखील क्षणभर थबकली .
त्याने कार्ड दिले आणि भेटायची विनंती करून तो निघून गेला .


" संजू , माझे कॉस्च्युम नीट लावून घे . मी स्पामध्ये जाऊन येते . "
मेघना सगळ्या सूचना देऊन निघुन गेली .

मेघनासाठी स्पेशल सूट होता .

" हॅलो मी ऍन फ्रॉम मॉस्को . "
समोरून एक सुंदर आवाज आला .

" हॅलो , संजू फ्रॉम इंडिया . मेघनाची असिस्टंट . "
संजूने उत्तर दिले .

रूम सर्व्हिससाठी ऍन काम करू लागली .

" ऍन , व्हॉट इज इट? "
संजूने विचारले .
" दे आर बिल्डिंग अ ह्युज स्टॅच्यु ऑफ समथिंग. "

तिने माहिती पुरवली . ह्या फॅशन शो साठी इतका मोठा पुतळा आणि त्याखाली चाकेदेखील पाहून संजूला ते खटकले .


राघव नयनाला परत भेटायला गेला .

" नयना , हल्ला नेमका तुझ्यावर होता का माझ्यावर . "
राघवने विचारले .
" नॉट शुअर , पण माझा एन्ट्री पास आणि कागदपत्र गायब आहेत . बी केअरफुल . "

नयनाने त्याला सल्ला दिला .

राघव बाहेर पडला आणि कोणीतरी आसपास असल्याचे त्याला जाणवले .


अल्पस पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले भव्य सेवन स्टार हॉटेल , देखण्या इमारती आणि जगभरातून आलेल्या मॉडेल्स , टॉप फॅशन ब्रँड्स सगळे वातावरण अगदी ग्लॅमरने व्यापलेले होते .

रूफ टॉपवर असलेल्या भव्य स्विमिंग टँकमध्ये एक रशियन जलपरी पोहत होती . पोहताना देखील तिचे लक्ष एन्ट्री गेटवर होते . तितक्यात तो येताना दिसला आणि ती हसली .


कोण असेल ही रशियन सुंदरी ?

नयनावर हल्ला करणारा कोण असेल ?

भारतीय टीम हे सगळे रोखू शकेल का ?


पाहूया पुढील भागात
अष्टपैलू 2025 स्पर्धा


🎭 Series Post

View all